भारत सरकार आणि फिलीपिन्स सरकार यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या स्थापनेबाबत घोषणा
August 05th, 05:23 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनेंड आर. मार्कोस ज्युनिअर यांनी 4-8 ऑगस्ट 2025 दरम्यान भारताचा दौरा केला. राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांच्यासमवेत फर्स्ट लेडी लुईस अरनेटा मार्कोस, आणि उच्चस्तरीय अधिकृत शिष्टमंडळ होते, ज्यामध्ये फिलीपिन्सचे अनेक कॅबिनेट मंत्री आणि उच्चस्तरीय व्यावसायिक प्रतिनिधीमंडळाचा समावेश होता.फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा: फलनिष्पत्ती
August 05th, 04:31 pm
भारत आणि फिलिपिन्स दरम्यान धोरणात्मक भागीदारी स्थापन झाल्याची घोषणाफिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर.मार्कोस ज्युनियर यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
August 05th, 03:45 pm
आपले आणि आपल्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या द्विपक्षीय संबंधांच्यासंदर्भात एक ऐतिहासिक दिवस आहे. आपण भारत-फिलिपिन्स संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर घेऊन जात आहोत. यामुळे आपल्या संबंधांना एक नवीन गती आणि सघनता मिळेल. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील आपल्या संबंधांना बळ मिळेल. गेल्या काही वर्षांत, आपल्या एकमेकांच्या सर्व क्षेत्रातील संबंधांमध्ये प्रगती झाली आहे. यामध्ये व्यापार, संरक्षण, सागरी, आरोग्य, सुरक्षा, अन्न सुरक्षा, विकास भागीदारी आणि नागरीकांना एकमेकांविषयीचा असलेला जिव्हाळा यांचा समावेश आहे. आज आपण पुढील पाच वर्षांसाठी एक कृती आराखडा बनवत आहोत ही खूप आनंदाची बाब आहे.फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे माध्यमांसाठी निवेदन
August 05th, 11:06 am
सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. या वर्षी भारत आणि फिलिपिन्स आपल्यातील राजनैतिक संबंधांचे पंचाहत्तरवे वर्ष साजरे करत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा ठरतो. आमच्यातील राजनैतिक संबध नवीन असले, तरी आमच्या संस्कृतींमधील संपर्क फार प्राचीन काळापासूनचा आहे. फिलीपिन्सचे रामायण - महाराडिया लावना - हे आमच्यातील शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक संबंधांचे जिवंत उदाहरण आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय फुलांचे चित्र असलेले नुकतेच जारी केलेले टपाल तिकिट आमच्यातील मैत्रीचा सुगंध पसरवत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष महामहीम फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद
August 05th, 02:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष महामहीम फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. फिलीपिन्सचे सतरावे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी महामहीम फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांचे अभिनंदन केले.