रोजगार मेळ्या अंतर्गत नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 24th, 11:30 am
सन 2026 ची सुरुवात तुमच्या आयुष्यात नव्या आनंदाची सुरुवात घेऊन येत आहे. वसंत पंचमी कालच साजरी झाली असून, तुमच्या आयुष्यातही नव्या वसंताची सुरुवात होत आहे. हा काळ तुम्हाला संविधानाबद्दलच्या तुमच्या जबाबदाऱ्यांशीही जोडणारा आहे. योगायोगाने, या काळात देशात प्रजासत्ताकाचा महोत्सव सुरू आहे. काल 23 जानेवारी रोजी आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी केली आणि उद्या 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आहे. त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. आजचा दिवस ही विशेष आहे. आजच्याच दिवशी आपल्या संविधानाने ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते. आजच्या या महत्त्वाच्या दिवशी देशातील 61 हजारांहून अधिक युवक आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. आज तुम्हा सर्वांना सरकारी सेवांसाठी नियुक्तीपत्रे मिळत आहेत. ही नियुक्तीपत्रे म्हणजे राष्ट्रनिर्माणासाठीचे आमंत्रणपत्र आहे. हे विकसित भारताच्या उभारणीला गती देणारे संकल्पपत्र आहे. तुमच्यापैकी अनेक जण देशाची सुरक्षा अधिक मजबूत करतील, आपल्या शिक्षण आणि आरोग्यसेवा व्यवस्थेला अधिक सक्षम करतील. काही युवक आर्थिक सेवा आणि ऊर्जा सुरक्षेला बळकटी देतील, तर काही युवक आपल्या सरकारी कंपन्यांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतील. मी आपणा सर्व युवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो.अलीकडच्या काळात रोजगार मेळावा ही एक संस्था म्हणून विकसित झाली असून, या माध्यमातून लाखो तरुणांना विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्तीपत्रे मिळाली आहेत: पंतप्रधान
January 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 18व्या रोजगार मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, 2026 हे वर्ष नागरिकांच्या जीवनात नवे आनंद घेऊन सुरू झाले असून, त्याच वेळी नागरिकांना त्यांच्या घटनात्मक कर्तव्यांशी जोडणारेही ठरत आहे. हा काळ प्रजासत्ताकाच्या भव्य उत्सवाशी संबंधित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.The fact sheet on India's growth is a success story of the Reform-Perform-Transform mantra: PM Modi in Rajkot
January 11th, 02:45 pm
PM Modi inaugurated the Vibrant Gujarat Regional Conference for the Kutch and Saurashtra region in Rajkot. Recalling the devastating earthquake in Kutch and drought in Saurashtra, the PM said these regions are now emerging as major drivers of Aatmanirbhar Bharat and India’s rise as a global manufacturing hub. He highlighted the achievements India has made over the past 11 years.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोटमध्ये कच्छ आणि सौराष्ट्र विभागांसाठी व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेचे केले उद्घाटन
January 11th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या राजकोट येथे कच्छ आणि सौराष्ट्र क्षेत्रासाठी व्हायब्रंट गुजरात या प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी नमूद केले की, 2026 वर्षाच्या सुरुवातीनंतरचा त्यांचा हा गुजरातचा पहिलाच दौरा आहे. त्यांनी अधोरेखित केले की, आज सकाळीच त्यांनी भगवान सोमनाथांचे दिव्य दर्शन घेतले आणि आता ते राजकोटमधील या भव्य कार्यक्रमात सहभागी होत आहेत. विकास भी, विरासत भी हा मंत्र सर्वत्र घुमत आहे, असे त्यांनी नमूद केले.हैदराबादमधील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
November 26th, 10:10 am
“भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी जी, सफ्रान समूहाशी संबंधित सर्व मान्यवर, आणि उपस्थित बंधू-भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
November 26th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन केले. आजपासून भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे, सफ्रानच्या या नव्या सुविधेमुळे भारत जागतिक एमआरओ अर्थात देखभाल, दुरुस्ती आणि संधारण केंद्र म्हणून उदयाला येईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे देखभाल, दुरुस्ती आणि संधारण सुविधा केंद्र युवकांसाठी उच्च तंत्रज्ञानाधारित हवाई वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपण 24 नोव्हेंबर रोजी सफ्रानच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाशी संवाद साधला होता आणि त्यांच्याबरोबर याआधीही झालेल्या चर्चेत भारताबद्दलचा त्यांचा विश्वास आणि आशा दिसून आली होती, असे पंतप्रधान म्हणाले. सफ्रानची भारतातील गुंतवणूक देखील त्याच गतीने कायम राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांची सफ्रानच्या टीमचे नवीन सुविधेबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मुंबईत मेरीटाईम लीडर्स परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 29th, 04:09 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, शांतनु ठाकूर जी, कीर्तिवर्धन सिंह जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, नौवहन आणि इतर उद्योगांशी संबंधित नेते, इतर मान्यवर, स्त्री-पुरुष हो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला केले संबोधित
October 29th, 04:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला संबोधित केले तसेच सागरी क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचे (ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरम) अध्यक्षपद भूषवले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी ग्लोबल मेरीटाईम लीडर्स परिषदेला उपस्थित सर्व सहभागींचे स्वागत केले. हा कार्यक्रम 2016 मध्ये मुंबईत सुरू झाला आणि आता तो जागतिक शिखर परिषद म्हणून विकसित झाला आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 85 हून अधिक देशांचा सहभाग असणे, ही गोष्ट एक मजबूत संदेश देत आहे , यावर मोदी यांनी भर दिला. या कार्यक्रमात आघाडीच्या प्रमुख नौवहन कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी , स्टार्टअप्स, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांच्या उपस्थितीची त्यांनी दखल घेतली. छोटी बेटे असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे नमूद करत ते म्हणाले की, अशा सर्वांच्या सामूहिक दृष्टिकोनामुळे शिखर परिषदेची ऊर्जा आणि समन्वय लक्षणीयरीत्या वाढला आहे.नवी दिल्लीत, भारत मंडपम येथे, वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
September 25th, 06:16 pm
‘वर्ल्ड फूड इंडिया’ या कार्यक्रमामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन! आजच्या या आयोजनात आपले शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार आणि ग्राहक, हे सर्व एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. ‘वर्ल्ड फूड इंडिया’ हा नव्या संपर्कांचा, नव्या संवादांचा आणि सर्जनशीलतेची एक पर्वणी ठरला आहे. मी थोड्याच वेळापूर्वी येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांना भेट देऊन आलो आहे. आनंदाची गोष्ट अशी की या प्रदर्शनात पोषणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, तेलाच्या वापरात बचत करण्यावर भर दिला आहे आणि पॅकबंद उत्पादनांची गुणवत्ता आणि पोषकता वाढवण्यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण आयोजनासाठी मी आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मनःपूर्वक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमाला केले संबोधित
September 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2025 निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार, नवोन्मेषक आणि ग्राहक हे सर्वजण या कार्यक्रमात एकाचवेळी उपस्थित असून , त्यामुळे वर्ल्ड फूड इंडिया नवीन संपर्क, नवीन जोडणी आणि सर्जनशीलतेचे व्यासपीठ बनले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपण नुकतीच प्रदर्शनांना भेट दिली आहे असे सांगून पोषण, तेलाचा कमीत कमी वापर आणि पॅकेज केलेल्या उत्पादनांचा आरोग्यदायीपणा वाढवणे यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी कार्यक्रमातील सर्व सहभागींचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.भारत -जपान आर्थिक मंचाच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 29th, 11:20 am
मी तुमच्यापैकी अनेकांना वैयक्तिकरित्या ओळखतो. गुजरातमधील माझ्या मुख्यमंत्री काळात तसेच दिल्लीला आल्यानंतरच्या काळात भेटलो आहे. तुमच्यापैकी अनेकांशी माझे निकटचे संबंध आहेत. आज तुम्हाला सर्वांना भेटण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद झाला आहे.भारत-जपान आर्थिक मंचाच्या बैठकीत पंतप्रधान सहभागी
August 29th, 11:02 am
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या यशावर, विशेषत: गुंतवणूक, वस्तुनिर्माण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यावर प्रकाश टाकला. जपानी कंपन्यांना भारतात आपला व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी आमंत्रित करताना, त्यांनी नमूद केले की, भारताच्या विकासगाथेने त्यांच्यासाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्याच्या अशांत जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विश्वासू मित्रांमधील आर्थिक भागीदारी अधिक दृढ करणे अधिक प्रासंगिक असल्याचे ते म्हणाले. राजकीय स्थैर्य, धोरणात्मक अंदाज, सुधारणांप्रति बांधिलकी आणि व्यवसाय सुलभतेच्या प्रयत्नांमुळे भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूकदारांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला असून, जागतिक संस्थांनी भारताच्या पतमानांकनात नुकत्याच केलेल्या सुधारणेत ते योग्यरित्या प्रतिबिंबित होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
August 23rd, 10:10 pm
येथे जागतिक परिस्थिती, भू-अर्थशास्त्र यावर सविस्तर चर्चा झाली आहे आणि जेव्हा आपण जागतिक संदर्भात पाहतो तेव्हा आपल्याला भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद लक्षात येते. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. आपण लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. तज्ज्ञ म्हणत आहेत की जागतिक विकासात भारताचे योगदान लवकरच सुमारे 20 टक्के असणार आहे. ही वाढ, ही लवचिकता, जी आपण भारताच्या अर्थव्यवस्थेत पाहत आहोत, ती गेल्या दशकात भारताने मिळवलेल्या स्थूल-आर्थिक स्थिरतेमुळे आहे. आज आपली राजकोषीय तूट 4.4% पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. आणि हे असे घडत आहे जेव्हा आपण कोविडच्या इतक्या मोठ्या संकटाचा सामना केला आहे. आज आपल्या कंपन्या भांडवली बाजारातून विक्रमी निधी उभारत आहेत. आज आपल्या बँका पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत. महागाई खूप कमी आहे, व्याजदर कमी आहेत. आज आपली चालू खात्यातील तूट नियंत्रणात आहे. परकीय चलन साठा देखील खूप मजबूत आहे. इतकेच नाही तर दरमहा लाखो देशांतर्गत गुंतवणूकदार एस.आय.पी. द्वारे बाजारात हजारो कोटी रुपये गुंतवत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे आयोजित इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला केले संबोधित
August 23rd, 05:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड लीडर्स फोरमसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागतही केले. हा उपक्रम अतिशय योग्य वेळी आयोजित केला असल्याचेही त्यांनी नमूद केले, आणि त्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आयोजकांची प्रशंसाही केली. मागच्या आठवड्यातच आपण लाल किल्ल्यावरून पुढच्या पिढीच्या सुधारणांबद्दल (नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स) भाषण केले होते आणि हा मंच त्याच भावनेला अधिक बळ देत आहे, असे त्यांनी सांगितले.रोजगार मेळाव्यात 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
July 12th, 11:30 am
केंद्र सरकारी आस्थापनांमध्ये तरुणाईला कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याचा आमचा उपक्रम सातत्याने सुरू आहे. आणि आमची ओळखसुद्धा अशीच आहे – ना कागद ना खर्च! (शिफारस किंवा लाचेशिवाय निव्वळ गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारे नोकऱ्या देणे). आज 51 हजारांहून अधिक तरुण-तरुणींना नियुक्तीपत्रे दिली गेली आहेत. अशा रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुण-तरुणींना केंद्र सरकारमध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या आहेत. ही तरुणाई आता राष्ट्रनिर्मितीत मोठी भूमिका बजावत आहे. आजही आपल्यापैकी अनेकांनी भारतीय रेल्वेमध्ये आपले कार्यभार स्वीकारले आहेत. काही मित्र आता देशाच्या सुरक्षेचे रक्षक बनणार आहेत. टपाल विभागात नियुक्त झालेले मित्र गावागावात सरकारच्या सुविधा (योजना) पोहोचवतील. काहीजण ‘हेल्थ फॉर ऑल’ (सर्वांसाठी आरोग्य) या अभियानाचे शिलेदार असतील. अनेक युवक-युवती आर्थिक समावेशनाच्या इंजिनाला अधिक वेग देतील आणि बरेचसे युवक-युवती भारताच्या औद्योगिक विकासाला नवीन चालना देतील. आपले विभाग वेगवेगळे असले, पदे वेगवेगळी असली, तरी ध्येय एकच आहे. आणि ते ध्येय आपल्याला वारंवार लक्षात ठेवायचे आहे –‘राष्ट्रसेवा’! सूत्र एकच – ‘नागरिक प्रथम, Citizen First!’ आपल्याला देशवासियांच्या सेवेसाठी एक मोठे व्यासपीठ लाभले आहे. जीवनाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर मिळालेल्या या मोठ्या यशाबद्दल मी आपणा सर्व तरुणाईचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या नव्या प्रवासासाठी माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याला केले संबोधित
July 12th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याला संबोधित केले, यावेळी त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमधील 51,000 हून अधिक नवनियुक्त तरुणांना नियुक्ती पत्रेही वितरित केली. आज या युवा वर्गाची भारत सरकारच्या विविध विभागांमधील नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात होत असल्याचे त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. विविध विभागांमधील आपल्या सेवेची सुरुवात करणाऱ्या युवा उमेदवारांचे त्यांनी अभिनंदनही केले. या सर्वांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी राष्ट्रसेवा हेच त्यांचे परस्पर समान उद्दिष्ट आहे, आणि ते नागरिक प्रथम या तत्त्वावर आधारलेले आहे ही बाबही त्यांनी नमूद केली.नवी दिल्लीत भारत मंडपम इथे जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या पूर्ण सत्रामध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
June 02nd, 05:34 pm
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या 81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेत आपणा सर्व अतिथींचे मी भारतात स्वागत करतो, आपले अभिनंदन करतो. 4 दशकानंतर हा कार्यक्रम भारतात होत आहे. या 4 दशकात भारतात मोठे परिवर्तन झाले आहे. आजचा भारत पूर्वीपेक्षा अनेक पटीने आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. जागतिक हवाई परिसंस्थेत आम्ही केवळ एक मोठी बाजारपेठ नव्हे तर धोरण नेतृत्व, नवोन्मेश आणि समावेशक विकासाचे प्रतीकही आहोत. जागतिक अंतराळ-हवाई वाहतूक या एकत्रित क्षेत्रात भारत आज उगवते नेतृत्व आहे. गेल्या एका दशकातली भारताची नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातली झेप सर्व परिचित आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या 81व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या पूर्ण सत्राला केले संबोधित
June 02nd, 05:00 pm
जागतिक दर्जाची हवाई पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या आणि संपर्कव्यवस्था वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) 81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या (WATS) पूर्ण सत्राला संबोधित केले. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि चार दशकांनंतर हा कार्यक्रम भारतात होत असल्याचे महत्त्व अधोरेखित केले. या काळात भारतामध्ये झालेल्या परिवर्तनीय बदलांवर त्यांनी भर दिला, आणि आजचा भारत पूर्वीपेक्षा अधिक जास्त आत्मविश्वासाने युक्त असल्याचे नमूद केले.भारत केवळ एक मोठी बाजारपेठ नसून, धोरणात्मक नेतृत्व, नवनिर्मिती आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी हवाई वाहतुकीच्या जागतिक परिसंस्थेत भारताच्या भूमिकेला अधोरेखित केले. आज भारत अवकाश-विमान वाहतुकीच्या एकत्रिकरणामध्ये जागतिक नेता म्हणून उदयास येत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. गेल्या दशकात नागरी विमान वाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती झाली आहे, जे सर्वांनाच ज्ञात असल्याचेही त्यांनी सांगितले.एबीपी नेटवर्क इंडिया @2047 शिखर परिषदेतील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
May 06th, 08:04 pm
भारत मंडपमचा हा मंच आज सकाळपासून एक सजीव व्यासपीठ बनला आहे. नुकतीच मला तुमच्या पथकाची काही मिनिटांसाठी भेट घेण्याची संधी मिळाली. ही शिखर परिषद बऱ्याच विविधतेने नटलेली आहे. अनेक माननीय व्यक्तींनी या शिखर परिषदेत रंग भरले आहेत. मला खात्री आहे की तुम्हा सर्वांनाही खूप छान अनुभव आला असेल. या परिषदेत मोठ्या संख्येने तरुण आणि महिलांच्या असलेल्या उपस्थितीत बहुदा त्याचे अनोखेपण सामावले आहे. विशेषतः आमच्या ड्रोन दीदी आणि लखपती दीदींनी त्यांचे अनुभव सामायिक केले. जेव्हा मी नुकताच या सर्व निवेदकांना भेटलो तेव्हा मी पहात होतो की ते त्यांचे अनुभव अत्यंत उत्साहाने सामायिक करित आहेत. त्यांचा प्रत्येक संवाद त्यांच्या स्मरणात होता. याचा अर्थ असा की ही एक खूपच प्रेरणादायी संधी साध्य झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एबीपी नेटवर्क इंडिया@2047 शिखर संमेलनाला केले संबोधित
May 06th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एबीपी नेटवर्क इंडिया@2047 शिखर संमेलनात सहभागी झाले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, भारत मंडपममधील या कार्यक्रमात सकाळपासूनच उत्साहाचा संचार आहे. त्यांनी आयोजकांच्या चमूसोबतच्या संवादाचा उल्लेख केला आणि शिखर संमेलनातील समृद्ध विविधता अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या गतिशीलतेमध्ये योगदान दिलेल्या अनेक मान्यवर व्यक्तींच्या सहभागाची त्यांनी दखल घेतली. सर्व उपस्थितांना अत्यंत सकारात्मक अनुभव आला असेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. शिखर संमेलनात युवा वर्ग आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती अधोरेखित करताना, त्यांनी विशेषतः ड्रोन दीदी आणि लखपती दीदी यांनी सांगितलेल्या प्रेरणादायी अनुभवांकडे लक्ष वेधले. त्यांच्या कथा प्रेरणादायी आहेत, असे त्यांनी नमूद केले.