पंतप्रधानांनी फौजा सिंग यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
July 15th, 11:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फौजा सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.”त्यांचे असाधारण व्यक्तिमत्व आणि अचल निश्चयी वृत्ती आपल्या पिढ्यानपिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे,”असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी त्यांचा एक असाधारण खेळाडू आणि अविश्वसनीय दृढनिश्चयी व्यक्ती म्हणून गौरव केला आहे .