शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
December 23rd, 09:41 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषितम् सामायिक केले-माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली
December 23rd, 09:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंह जी यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. “समाजातील उपेक्षित वर्गाच्या कल्याणाबरोबरच कृषी क्षेत्राची प्रगती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. राष्ट्रनिर्मितीमधील त्यांचे योगदान हा कृतज्ञ देश कधीही विसरू शकत नाही,” मोदी म्हणाले.आसाममधील नामरूप येथील युरिया प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
December 21st, 04:25 pm
ही वीरांची भूमी आहे. सौलुंग सुकाफा, महावीर लचित बोरफुकन, भीमबर देउरी, शहीद कुसल कुवर, मोरान राजा बोडौसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंह आणि वीरांगना सती साधनी यांसारख्या महान व्यक्तींनी ही भूमी पवित्र केली आहे. अशा या वरच्या आसामच्या मातीत मी आदराने नमन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी
December 21st, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. ही भूमी चाओलंग सुखाफा आणि महावीर लाचित बोरफुकन यांसारख्या महान वीरांची भूमी असल्याचे त्यांनी नमूद केले. भीमबर देउरी, शहीद कुशल कुंवर, मोरान राजा बौदोसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंग आणि पराक्रमी सती साधनी यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी यावेळी केला. या शौर्य आणि बलिदानाच्या महान भूमीला, उजनी आसामच्या पवित्र मातीला आपण नमन करत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.2026 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
December 12th, 04:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने 2026 हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना किफायतशीर किंमत देण्यासाठी, सरकारने 2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केली होती की, सर्व अनिवार्य पिकांसाठी किमान आधारभूत किंमत अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर निश्चित केला जाईल. सरासरी गुणवत्तेच्या किसलेल्या खोबऱ्याची किमान आधारभूत किमत प्रति क्विंटल 12,027 रुपये आणि गोटा खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल 12,500 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती परिषद 2025 मध्ये पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद
November 20th, 12:30 pm
ही सगळी उत्पादनं वाया जाणाऱ्या गोष्टींपासून बनवली आहेत साहेब. केळ्यांच्या शेतीमधील टाकाऊ गोष्टींपासून तयार केलेली ही उत्पादनं केळीच्या पिकाचं मूल्यवर्धन करणारी आहेत साहेबतामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
November 20th, 12:16 pm
तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शेतकऱ्यांशी संवाद साधला. नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना अभिवादन करुन पंतप्रधान मोदी यांनी केळी उत्पादनाचे निरीक्षण केले तसेच केळ्यांच्या वाया अवशेषांच्या वापराबद्दल चौकशी केली. शेतकऱ्याने सांगितले की तेथे मांडण्यात आलेल्या सर्व वस्तू म्हणजे केळी पिकाच्या वाया अवशेषांचे मूल्यवर्धन केलेली उत्पादने आहेत. ही उत्पादने भारतभरात ऑनलाईन पद्धतीने विकली जातात का असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारल्यानंतर शेतकऱ्याने होकार दिला. तो शेतकरी पुढे म्हणाला की, तो आणि त्याच्यासोबतचे शेतकरी एफपीओज म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यामातून तसेच व्यक्तिगत योगदानकर्ते म्हणून संपूर्ण तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करत आहेत. या शेतकऱ्यांची उत्पादने ऑनलाईन विकली जातात, निर्यात करण्यात येतात तसेच ही उत्पादने स्थानिक बाजारांमध्ये आणि देशभरातील सुपरमार्केट्समध्ये देखील उपलब्ध आहेत असे त्याने सांगितले. प्रत्येक एफपीओमध्ये किती लोक एकत्र काम करतात या पंतप्रधानांच्या प्रश्नावर, शेतकऱ्याने उत्तर दिले की साधारणतः एक हजार जण यात सहभागी असतात. त्याच्या उत्तराची नोंद घेत पंतप्रधानांनी विचारले की जमिनीच्या एका भागावर केवळ केळीची लागवड केली जाते की त्यामध्ये मिश्र पिके देखील घेतात. वेगवेगळी विशिष्ट उत्पादने हे वेगवेगळ्या भागांचे वैशिष्ट्य असून त्यांच्याकडे जीआय टॅग प्राप्त उत्पादने देखील आहेत.पंतप्रधानांचे तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मधील भाषण
November 19th, 07:01 pm
व्यासपीठावर उपस्थित तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एल मुरुगन जी, तामिळनाडू कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर के. रामासामी जी, निरनिराळ्या कृषी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आलेले सर्व मान्यवर आणि इतर सर्व लोकप्रतिनिधीवर्ग, माझे प्रिय शेतकरी बांधव आणि भगिनी तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्यासोबत सहभागी झालेले देशभरातील लाखो शेतकरी, त्यांनाही मी येथून वणक्कम म्हणतो, नमस्कार करतो आणि सगळ्यात आधी मी तुम्हा सर्वांची आणि देशभरातून जमलेल्या माझ्या शेतकरी बंधू-भगिनींची क्षमा मागतो. मला इथे येण्यासाठी जवळ जवळ एक तास उशीर झाला आहे, कारण मी आज पुट्टपर्थी इथे सत्य साई बाबांच्या कार्यक्रमात होतो, तिथला कार्यक्रम जरा जास्त वेळ लांबला, त्यामुळे मला यायला उशीर झाला, तुम्हा सर्वांची जी गैरसोय झाली, मला दिसते आहे की देशभरातील अनेक लोक इथे थांबून आहेत, याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 ला केले संबोधित
November 19th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी कोईम्बतूरच्या पवित्र भूमीवरील दैवत मरुदमलाईच्या भगवान मुरुगन यांना वंदनही केले.कोईम्बतूरचे ही संस्कृती, करुणाभाव आणि सर्जनशीलता यांची भूमी आहे असे त्यांनी सांगितले. हे शहर दक्षिण भारताच्या उद्योजकीय शक्तीचे एक ऊर्जा केंद्र असल्याचा दखलपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. इथले वस्त्रोद्योग क्षेत्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. कोईम्बतूरचे माजी खासदार सी.पी. राधाकृष्णन हे आता उपराष्ट्रपती म्हणून देशाला मार्गदर्शन करत आहेत, यामुळे आता या शहराला आणखी महत्त्व प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.आंध्रप्रदेश मधल्या पुट्टपर्थी इथे श्री सत्य साई बाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यामधले पंतप्रधानांचे संबोधन
November 19th, 11:00 am
मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडू, केंद्रातले माझे सहकारी राममोहन नायडू, जी. किशन रेड्डी, भूपति राजू श्रीनिवास वर्मा, सचिन तेंडुलकर जी, उपमुख्यमंत्री पवन कल्याण जी, राज्य सरकारमधले मंत्री नारा लोकेश जी, श्री सत्य साईं सेंट्रल ट्रस्ट चे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. जे. रत्नाकर जी, कुलगरू के. चक्रवर्ती जी, ऐश्वर्या जी, इतर मान्यवर आणि स्त्री-पुरुषहो, साईं राम!श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले
November 19th, 10:30 am
भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात “साई राम” उच्चारून केली आणि पुट्टपर्थीच्या पवित्र भूमीवर सर्वांमध्ये उपस्थित राहणे हा अत्यंत भावनिक आणि अध्यात्मिक अनुभव आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. थोड्या वेळापूर्वी बाबांच्या समाधीवर पुष्पांजली वाहण्याची संधी मिळाली असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. बाबांच्या चरणांशी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर अंतःकरण भरून येते यावर त्यांनी भर दिला.पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा करणार दौरा
November 18th, 11:38 am
पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा दौरा करणार आहेत.गुजरातमध्ये देडियापाडा येथे जनजातीय गौरव दिन कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
November 15th, 03:15 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगदीश विश्वकर्मा जी, गुजरात सरकारमधले मंत्री नरेश भाई पटेल, जयराम भाई गामीत जी, संसदेतले माझे जुने मित्र मनसुख भाई वसावा जी, भगवान बिरसा मुंडा यांचा परिवारातले व्यासपीठावर उपस्थित सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे आदिवासी बंधुभगिनी, अन्य सर्व आदरणीय व्यक्ती आणि आत्ता देशात सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमांमधून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याशी जोडले गेलेले अनेक लोक, राज्याराज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री अशा सर्वांना जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला केले संबोधित
November 15th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. माँ नर्मदेची पवित्र भूमी आज आणखी एका ऐतिहासिक प्रसंगाची साक्षीदार होत आहे असे सांगून, मोदी यांनी भारताची एकता आणि विविधता साजरी करण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची 150 वी जयंती याच ठिकाणी साजरी करण्यात आली होती, भारत पर्वाची सुरुवात झाली होती याची आठवण करून दिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या भव्य सोहळ्यासह भारत पर्वचा समारोप होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले .या शुभ प्रसंगी त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि संपूर्ण आदिवासी पट्ट्यात स्वातंत्र्याची भावना जागृत करणाऱ्या गोविंद गुरुंचे आशीर्वाद देखील या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. व्यासपीठावरून त्यांनी गोविंद गुरुंना आदरांजली वाहिली. थोड्या वेळापूर्वी देवमोगरा मातेच्या मंदिराला भेट देण्याचा आणि पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचे सौभाग्य लाभले असे ते म्हणाले.Bihar has defeated lies and upheld the truth: PM Modi from BJP HQ post NDA’s major victory
November 14th, 07:30 pm
PM Modi addressed the BJP headquarters in Delhi after the NDA’s historic mandate in Bihar, expressing deep gratitude to the people of the state for their unprecedented support. He said that this resounding victory reflects the unshakeable trust of Bihar’s citizens who have “created a storm” with their verdict. “Bihar Ne Garda Uda Diya,” he remarked.After NDA’s landslide Bihar victory, PM Modi takes the centre stage at BJP HQ
November 14th, 07:00 pm
PM Modi addressed the BJP headquarters in Delhi after the NDA’s historic mandate in Bihar, expressing deep gratitude to the people of the state for their unprecedented support. He said that this resounding victory reflects the unshakeable trust of Bihar’s citizens who have “created a storm” with their verdict. “Bihar Ne Garda Uda Diya,” he remarked.उत्तराखंडच्या स्थापनच्या रौप्य महोत्सवानिमित्त निमत्त डेहराडून इथल्या समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा
November 09th, 01:00 pm
9 नोव्हेंबरचा हा दिवस एका दीर्घ तपस्येचे फळ आहे. आजचा दिवस आपण सर्वांसाठी अभिमानाची अनुभूती देणारा आहे. उत्तराखंडच्या देवतुल्य जनतेने अनेक वर्षांपासून जे स्वप्न पाहिले होते, ते अटलजींच्या सरकारच्या काळात, 25 वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते, आणि आता गेल्या 25 वर्षांच्या प्रवासानंतर, आज उत्तराखंड ज्या उंचीवर पोहचले आहे, ते पाहून त्या प्रत्येक व्यक्तीला आनंद होणे स्वाभाविक आहे, ज्यांनी या सुंदर राज्याच्या निर्मितीसाठी संघर्ष केला होता. ज्यांचे पर्वतांवर प्रेम आहे, ज्यांना उत्तराखंडची संस्कृती, इथले नैसर्गिक सौंदर्य, देवभूमीच्या लोकांशी जिव्हाळा आहे, त्यांचे मन आज प्रफुल्लित आहे, ते आनंदित आहेत.डेहराडून येथे उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
November 09th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडूनमध्ये उत्तराखंडच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान , पंतप्रधानांनी 8140 कोटी रुपये मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन केले. या समारोहाला संबोधित करताना, मोदी यांनी देवभूमी उत्तराखंडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांप्रती आदर, सन्मान आणि सेवाभाव व्यक्त केला.Bihar doesn't need ‘Katta Sarkar’: PM Modi in Sitamarhi
November 08th, 11:15 am
PM Modi addressed a large and enthusiastic gathering in Sitamarhi, Bihar, seeking blessings at the sacred land of Mata Sita and underlining the deep connection between faith and nation building. Recalling the events of November 8 2019, when he had prayed for a favourable Ayodhya judgment before inauguration duties the next day, he said today he had come to Sitamarhi to seek the people’s blessings for a Viksit Bihar. He reminded voters that this election will decide the future of Bihar’s youth and urged them to vote for progress.Unstoppable wave of support as PM Modi addresses rallies in Sitamarhi and Bettiah, Bihar
November 08th, 11:00 am
PM Modi today addressed large and enthusiastic gatherings in Sitamarhi and Bettiah, Bihar, seeking blessings in the sacred land of Mata Sita and highlighting the deep connection between faith and nation-building. Recalling the events of November 8, 2019, when he had prayed for a favourable Ayodhya verdict before heading for an inauguration the following day, he said he had now come to Sitamarhi to seek the people’s blessings for a Viksit Bihar.