Prime Minister Invites Ideas from Students, Parents and Teachers for This Year’s #ParikshaPeCharcha

January 07th, 07:05 pm

As the Class X and XII Board Examinations approach, Prime Minister Shri Narendra Modi will once again interact with students, parents and teachers in the much-awaited annual programme, Pariksha Pe Charcha.

सीबीएसई इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांकडून शुभेच्छा

May 13th, 02:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीबीएसईच्या इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast

March 16th, 11:47 pm

PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद

March 16th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (119 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

February 23rd, 11:30 am

काही वर्षांपूर्वी कुणी विचार केला असेल की या क्षेत्रात स्टार्ट-अप आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोच्या घरात जाईल ? जीवनात काहीतरी रोमांचक आणि थरारक गोष्टी करू इच्छिणाऱ्या आपल्या युवकांसाठी अंतराळ क्षेत्र हा एक उत्तम पर्याय बनत आहे.

परीक्षेचा ताण आणि भीती यावर यशस्वीपणे मात करणाऱ्या आणि या संदर्भात सर्वोत्तम तज्ज्ञ असलेल्या परीक्षार्थी योद्ध्यांचे विचार ऐकूया : पंतप्रधान

February 17th, 07:41 pm

परीक्षेचा ताण आणि भीती यावर यशस्वीपणे मात करणाऱ्या तरुण परीक्षार्थी योद्ध्यांचा समावेश असलेला,‘परीक्षा पे चर्चा 2025’ या कार्यक्रमाचा विशेष भाग 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. या विद्यार्थ्यांचे अनुभव, अभ्यासाची रणनीती आणि परीक्षेचा ताण, चिंता यांचा सामना करून दबावाखाली देखील शांत राहण्याबाबत त्यांनी व्यक्त केलेले विचार या भागात आपल्याला ऐकायला मिळतील.

परीक्षा योद्ध्यांसाठी 'सकारात्मकता' हा सर्वात मोठ्या सहयोगींपैकी एक आहे - पंतप्रधान

February 15th, 05:58 pm

परीक्षेच्या तयारीच्या काळात सकारात्मकतेचे महत्त्व अधोरेखित करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना उद्याचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा विशेष कार्यक्रम पाहण्याचे आवाहन केले.

आरोग्य आणि मानसिक शांतीच्या बाबतीत सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे नाव समोर येते : पंतप्रधान नरेंद्र मोदी

February 14th, 08:15 pm

आरोग्य आणि मानसिक शांतीच्या संदर्भात सद्गुरु जग्गी वासुदेव हे नेहमीच सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असून सर्वांनी उद्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाचा चौथा भाग पाहावा, असे आवाहन केले आहे.

तंत्रज्ञान, परीक्षेदरम्यान गॅझेट्सची भूमिका आणि विद्यार्थ्यांचा स्क्रीनसमोरील दीर्घावधी हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसमोरचे चिंतेचे विषय : पंतप्रधान

February 12th, 02:00 pm

तंत्रज्ञान, परीक्षेदरम्यान तांत्रिक उपकरणांची (गॅझेट्सची) भूमिका आणि विद्यार्थ्यांचा स्क्रीनसमोर अधिकाधिक वेळ घालवण्याचा कल हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसमोरचे चिंतेचे विषय आहेत असे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना उद्या 'परीक्षा पे चर्चा'चा तिसरा भाग पाहण्याचे आवाहन केले.

'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाचे सर्व भाग पाहण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना केले आवाहन

February 11th, 02:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना 'परीक्षा पे चर्चा 2025' चे सर्व भाग पाहण्याचे आणि आपल्या परीक्षा योद्ध्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.

'परीक्षा पे चर्चा'मध्ये मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य या विषयावर 12 फेब्रुवारी रोजी विशेष भाग सादर केला जाईल : पंतप्रधान

February 11th, 01:53 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, 'परीक्षा योद्धे सामान्यपणे ज्या विषयांवर चर्चा करू इच्छितात त्यापैकी एक म्हणजे मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य.म्हणूनच, या वर्षीच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात या विषयावर विशेष समर्पित एक भाग आहे जो उद्या, 12 फेब्रुवारी रोजी प्रसारित होईल,असे मोदी म्हणाले.

'परीक्षा पे चर्चा' चे पुनरागमन आणि ते सुद्धा नव्या तसेच अधिक उत्साहवर्धक स्वरुपात : पंतप्रधान नरेंद्र मोदी

February 06th, 01:18 pm

सर्व परीक्षार्थी त्यांचे पालक आणि शिक्षक यांना 2025 चा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पाहण्याची विनंती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले आहे.

पंतप्रधानांनी एक्झाम वॉरियर्स कला महोत्सवाचे कौतुक केले

January 07th, 07:33 pm

नवी दिल्लीत शांतिपथ येथे एक्झाम वॉरियर्स कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 30 शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीतील सुमारे 4,000 विद्यार्थ्यांनी यात भाग घेऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.

The bond between students and teachers must be beyond syllabus and curriculum: PM Modi

January 29th, 11:26 am

PM Modi interacted with students, teachers and parents at Bharat Mandapam in New Delhi today during the 7th edition of Pariksha Pe Charcha (PPC). PM Modi urged the students to prepare themselves in advance to deal with stress and pressure situations. He said that students should possess the ability of standing firm against adverse situations and challenges.

PM interacts with students, teachers and parents during Pariksha Pe Charcha 2024

January 29th, 11:25 am

PM Modi interacted with students, teachers and parents at Bharat Mandapam in New Delhi today during the 7th edition of Pariksha Pe Charcha (PPC). PM Modi urged the students to prepare themselves in advance to deal with stress and pressure situations. He said that students should possess the ability of standing firm against adverse situations and challenges.

परीक्षेच्या ताणाला यशात रुपांतरीत करून परीक्षा योद्ध्यांना हसत हसत परीक्षा देणे शक्य करणे हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश आहे : पंतप्रधान

December 14th, 11:22 pm

परीक्षेच्या ताणाला यशात रुपांतरीत करून परीक्षा योद्ध्यांना हसत हसत परीक्षा देणे शक्य करणे हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

सीबीएसई बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्‍यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

May 12th, 04:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बारावीच्या परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या सर्व #ExamWarriors चे अभिनंदन केले आहे.

एक्झॅम वॉरियर्स पुस्तिकेचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त ठेवणे हा आहे: पंतप्रधान

February 25th, 09:44 am

एक्झॅम वॉरियर्स पुस्तिकेचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त ठेवणे हा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या ट्विटला ते उत्तर देत होते. एक्झॅम वॉरियर्स पुस्तिका वाचल्यानंतर झारखंड येथील कोडरमा गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित तणावापासून मुक्त वाटले, असे अन्नपूर्णा देवी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले होते.

‘परीक्षा पे चर्चा 2023’ या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद

January 27th, 11:15 am

एवढ्या थंडीत कदाचित पहिल्यांदाच ‘परीक्षा पे चर्चा’ होत आहे. साधारणपणे आपण फेब्रुवारी महिन्यात हा कार्यक्रम करतो. मात्र, आता मनात असा विचार आला, की आपल्या सर्वांना 26 जानेवारीचा लाभही मिळावा. जे बाहेरचे आहेत, त्यांनी या दोन्हीचा एकत्रित फायदा मिळवला ना? कर्तव्यपथावर गेले होते ना? कसं वाटलं? खूप छान वाटलं.. अच्छा, घरी जाऊन काय सांगणार? काही नाही सांगणार? अच्छा मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. मात्र मी एवढं नक्कीच सांगेन की ‘परीक्षा पे चर्चा’ माझीही परीक्षाच आहे. आणि देशातील कोट्यवधी विद्यार्थी माझी ही परीक्षा घेत आहेत. पण मला ही परीक्षा देण्यात खूप आनंद मिळतो. कारण मला तुमच्याकडून जे प्रश्न येतात, लाखोंच्या संख्येनं हे प्रश्न येतात. मुले खूप स्वयंस्फूर्तीने प्रश्न विचारतात. आपल्या समस्या सांगतात, अनेक वैयक्तिक त्रास, अडचणी पण सांगतात.

पंतप्रधानांनी, परीक्षा पे चर्चा 2023 मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधला संवाद

January 27th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चाच्या (पीपीसी) सहाव्या भागात नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. संवादापूर्वी कार्यक्रमस्थळी भरविण्‍यात आलेले विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शनही त्यांनी पाहिले. पंतप्रधानांनीच 'परीक्षा पे चर्चा' ची संकल्पना मांडली असून यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जीवन आणि परीक्षांशी संबंधित विविध विषयांवर पंतप्रधानींशी संवाद साधतात. पीपीसीच्या या वर्षीच्या भागात 155 देशांमधून सुमारे 38.80 लाखजणांनी नोंदणी केली.