Prime Minister condoles the loss of lives in the mishap in Sivaganga, Tamil Nadu

December 01st, 10:23 am

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the loss of lives due to a mishap in Sivaganga district of Tamil Nadu. Shri Modi also wished speedy recovery for those injured in the mishap.

राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

November 03rd, 05:15 pm

राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

November 03rd, 10:49 am

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना देखील त्यांनी केली आहे.

राजस्थानातील फलोदी जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दुःख

November 02nd, 10:17 pm

राजस्थानातील फलोदी जिल्ह्यातमध्ये अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना लवकर आराम मिळो, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथल्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

November 01st, 01:59 pm

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथल्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली आहे.

आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील आग दुर्घटनेतील मृतांबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

October 24th, 09:02 am

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली.

तामिळनाडूतील चेन्नई येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

September 30th, 09:48 pm

तमिळनाडूतील चेन्नई येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील बाधितांसाठी पीएमएनआरएफ मधून पंतप्रधानांनी केले सानुग्रह अनुदान जाहीर

September 28th, 12:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या प्रत्येकाच्या वारसांना आज पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधी मधून 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. जखमींना सहाय्यापोटी 50,000 रुपये देण्यात येणार आहेत.

कर्नाटकातील हसन येथील अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त

September 13th, 08:36 am

कर्नाटकातील हसन येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली देहरादूनला भेट, उत्तराखंडमधील पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या आढावा घेण्यासाठी घेतली बैठक

September 11th, 06:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी देहरादूनला भेट देऊन, ढगफुटी, पाऊस आणि भूस्खलनाने बाधित उत्तराखंडमधील भागांतील पूरस्थितीचा आणि नुकसानीचा आढावा घेतला.

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी

September 09th, 05:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी पंजाबला भेट दिली आणि पंजाबमधील बाधित भागात ढगफुटी, पाऊस आणि भूस्खलनामुळे उद्भवलेली पूर परिस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला.

पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशात पूर आणि मुसळधार पावसामुळे प्रभावित भागाची केली हवाई पाहणी

September 09th, 03:01 pm

हिमाचल प्रदेशात ढगफुटी, पाऊस आणि भूस्खलनामुळे उद्भवलेली पूर परिस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी हिमाचल प्रदेशला भेट दिली.

महाराष्ट्रातील पुणे येथे झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

August 11th, 04:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पुणे येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीला आराम पडावा अशी कामना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील गोंडा येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल व्यक्त केला शोक

August 03rd, 01:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील गोंडा इथल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानी बद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या निकटवर्तीय नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य देण्याची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी इथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल व्यक्त केला शोक

July 24th, 11:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल आज तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) प्रत्येक मृतांच्या जवळच्या नातेवाइकाला 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे.

पिथौरागढ, उत्तराखंड येथील रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

July 15th, 10:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.

जरातमधील वडोदरा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त

July 09th, 12:49 pm

गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या प्रकृतीत लवकरसुधारणा व्हावी यासाठी मोदींनी प्रार्थना केली आहे.

उत्तर प्रदेशातील संभल येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त

July 05th, 10:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील संभल येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.

तेलंगणातील संगारेड्डी येथील कारखान्यात आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

June 30th, 02:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील संगारेड्डी येथील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या वारसाला 2 लाख रुपयांची तर जखमी व्यक्तीला 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात जेजुरी-मोरगाव मार्गावर रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

June 19th, 10:58 am

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात जेजुरी-मोरगाव मार्गावर रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.