युरोपीय उद्योगांच्या गोलमेज बैठकीत पंतप्रधानांचे संबोधन
May 18th, 05:00 am
सर्वात आधी, मला या गोलमेज बैठकीत आमंत्रित केल्याबद्दल मी पंतप्रधान क्रिस्टरसन यांचे मनापासून आभार मानतो. ही बैठक गॉथेनबर्ग मध्ये आयोजित केली जात आहे, याचा मला आनंद आहे. हे एक असे शहर आहे जे नवोन्मेषासोबतच युरोपच्या उत्पादक वृत्तीचे एक जिवंत प्रतीक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपीय उद्योगांच्या गोलमेज बैठकीला केले संबोधित
May 17th, 12:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मे 2026 रोजी गॉथेनबर्ग येथे 'युरोपियन उद्योगांच्या गोलमेज बैठकीला (ERT) संबोधित केले. व्हॉल्वो समूहाने (Volvo Group) आयोजित केलेल्या या संवाद सत्रात स्वीडनचे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा महामहीम उर्सुला वॉन डेर लेयेन, युरोपियन उद्योगांचे वरिष्ठ नेते आणि आघाडीच्या युरोपियन आणि भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.