मलेशियात भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 07th, 03:59 pm

सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र, पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे, या सामुदायिक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल आभार मानतो. त्यांनी आत्ताच आपल्या भाषणात भारत-मलेशिया मैत्रीची व्याप्ती आणि भविष्यातील संधी इतक्या सुंदर शब्दांत व्यक्त केल्या, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियातील क्वालालंपूर येथे एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले

February 07th, 03:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियातील क्वालालंपूर येथे एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले. या स्वागतातील उत्साहातून आपल्या परस्पर सामायिक संस्कृतीमधील सुंदर विविधतेचे प्रतिबिंब उमटल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. या सामुदायिक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी त्यांचे प्रिय मित्र पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे आभार मानले. पंतप्रधान अन्वर इब्राहिम आपल्याला विमानतळावर घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी स्वतःच्या गाडीतून आपल्याला या कार्यक्रमात आणले, याचा दखलपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या संबोधनात केला. यातून पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे भारताप्रती आणि इथल्या लोकांसाठी असलेले प्रेम आणि आदराची भावना दिसून येते, असे पंतप्रधानांनी सांगितले.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर

February 05th, 05:35 pm

विकसित भारताच्या दिशेने देशाच्या प्रवासात मागील वर्ष जलद प्रगती आणि विकासाचे वर्ष राहिले आहे. हा काळ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी परिवर्तनाचा कालखंड राहिला आहे. देश योग्य दिशेने जलद गतीने पुढे जात आहे. आदरणीय राष्ट्रपतींनी अतिशय उत्तम पद्धतीने , अतिशय संवेदनशीलतेने हे विषय आपल्यासमोर मांडले आहेत .

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर

February 05th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार प्रस्तावाच्या समर्थनार्थ आपल्या भावना व्यक्त करणे हे आपले भाग्य असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की गेल्या वर्षभरात विकसित भारताच्या प्रवासात वेगाने प्रगती झाली आहे, प्रत्येक क्षेत्रात आणि समाजाच्या सर्व घटकांमध्ये परिवर्तन झालेले दिसून येत असून देश योग्य दिशेने वेगाने पुढे जात आहे. राष्ट्रपतींनी हे विषय अतिशय संवेदनशीलतेने आणि स्पष्टपणे मांडले आहेत असे मोदी यांनी अधोरेखित केले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 29th, 10:15 am

काल राष्ट्रपतींचे अभिभाषण हे 140 कोटी देशवासीयांच्या आत्मविश्वासाचे प्रतिबिंब होते, 140 कोटी देशवासीयांच्या परिश्रमांचा लेखाजोखा होते आणि 140 कोटी देशवासीयांपैकी विशेषतः तरुणांच्या आकांक्षा अधोरेखित करणारे अत्यंत अचूक अभिभाषण होते. तसेच सर्व खासदारांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या अनेक बाबी राष्ट्रपतींनी काल सभागृहासमोर मांडल्या. अधिवेशनाच्या प्रारंभीच आणि 2026 च्या सुरुवातीलाच राष्ट्रपतींनी खासदारांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्यांनी राष्ट्रप्रमुख म्हणून आपल्या भावना अतिशय सोप्या शब्दांत मांडल्या आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की सर्व माननीय खासदारांनी त्या अतिशय गांभीर्याने घेतल्या असतील. हे अधिवेशन खरोखरच अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 21व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ पूर्ण झाला आहे आणि दुसऱ्या चतुर्थांशाची सुरुवात होत आहे. 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठीचे महत्त्वाचे 25 वर्षांचे पर्व आता सुरू होत आहे. या शतकाच्या दुसऱ्या चतुर्थांशातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला जी या देशाच्या अशा पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, ज्या सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा क्षण भारताच्या संसदीय इतिहासात गौरवाचा क्षण म्हणून नोंदला जात आहे.

2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

January 29th, 10:00 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज संसद परिसरात 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी नमूद केले की, राष्ट्रपतींचे अभिभाषण हे 140 कोटी नागरिकांच्या आत्मविश्वासाची अभिव्यक्ती, त्यांच्या परिश्रमाचे सिंहावलोकन आणि तरुणांच्या आकांक्षांचे अचूक प्रतिबिंब आहे. राष्ट्रपतींनी अधिवेशनाच्या आणि 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच सर्व संसद सदस्यांसमोर अनेक मार्गदर्शक मुद्दे मांडले आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रप्रमुख म्हणून राष्ट्रपतींनी साध्या शब्दांत व्यक्त केलेल्या अपेक्षा सर्व खासदारांनी निश्चितपणे गांभीर्याने घेतल्या असतील, ज्यामुळे हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे मोदी यांनी सांगितले. त्यांनी यावर भर दिला की, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 21 व्या शतकातील पहिल्या तिमाहीची समाप्ती आणि दुसऱ्या तिमाहीची सुरुवात दर्शवत आहे, यावर त्यांनी भर दिला. 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी पुढील 25 वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत आणि हा अर्थसंकल्प या शतकातील दुसऱ्या तिमाहीतील पहिला अर्थसंकल्प आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले की, देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत, जो भारताच्या संसदीय इतिहासातील एक अभिमानास्पद क्षण आहे.

नवी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर एनसीसी रॅलीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 28th, 04:00 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर, एनसीसी, देशभरातील एनएसएस कॅडेट्स, टॅब्लॉइड कलाकार, नॅशनल स्टेडियमचे सहकारी आणि माझ्या प्रिय युवा मित्रांनो. तुमची मेहनत इथे पाहायला मिळाली. तुम्ही उत्तम समन्वयाने सादरीकरण केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत वार्षिक एनसीसी पीएम रॅलीला केले संबोधित

January 28th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राऊंडवर आयोजित वार्षिक एनसीसी पीएम रॅलीला संबोधित केले. एनसीसी दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, एनसीसी, एनएसएसचे छात्र, चित्ररथ कलाकार, राष्ट्रीय रंगशाळेतील सहकारी आणि देशभरातील तरुण सहभागींनी सादर केलेल्या समन्वित सादरीकरणांमध्ये त्यांचे प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत होते.

Towards 2030: A Joint India-European Union Comprehensive Strategic Agenda

January 27th, 06:48 pm

The Joint India-EU Comprehensive Strategic Agenda, endorsed at the 16th India-EU Summit held on 27 January 2026 in New Delhi, aims to further reinforce the strategic partnership by broadening, deepening and better coordinating EU-India cooperation to deliver mutually beneficial, concrete and transformative outcomes for both partners and for the wider world.

India - EU Joint Statement on the State Visit of European Council President and European Commission President to India and the 16th India-EU Summit

January 27th, 06:15 pm

At the invitation of PM Modi, European Council President António Costa and European Commission President Ursula von der Leyen paid a State Visit to India as Chief Guests for the 77th Republic Day of India. During the visit, the leaders hailed the successful conclusion of negotiations on the landmark India–EU FTA and adopted the “Towards 2030: India–EU Joint Comprehensive Strategic Agenda.”

यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष यांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या करार, घोषणा, इत्यादींची सूची

January 27th, 02:53 pm

2030 च्या दिशेने : भारत -यूरोपीय संघ संयुक्त सर्वसमावेशक धोरणात्मक कार्यक्रम

भारत-युरोपियन युनियन संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन

January 27th, 01:30 pm

या अभूतपूर्व भारत भेटीसाठी आलेले, माझे दोन जवळचे मित्र, अध्यक्ष कोस्टा आणि अध्यक्ष वॉन डेर लेयन यांचे स्वागत करताना मला आनंद वाटत आहे. कोस्टा जी, हे आपली साधी जीवनशैली आणि समाजावरील प्रेमासाठी लिस्बनचे गांधी म्हणून ओळखले जातात आणि उर्सुला जी, या जर्मनीच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री आणि युरोपियन युनियन कमिशनच्याही पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत.

युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

September 17th, 07:09 pm

युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष महामहिम उर्सुला वॉन डेर लेयन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी -7 शिखर परिषदेदरम्यान युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांशी साधला संवाद

June 18th, 03:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस इथे झालेल्या जी -7 शिखर परिषदेदरम्यान युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष, उर्सुला वॉन डर लायेन यांच्यासोबत फलदायी चर्चा केली.

या आठवड्यात भारत जगाच्या दृष्टीतून

March 05th, 11:37 am

जागतिक भागीदारांसोबतच्या चर्चा, भेटीगाठींंमुळे भारतासाठी हा आठवडा व्यस्त राहिल्याचे तसेच देशांतर्गत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रगती करत असल्याचे दिसून आले. युरोपियन कमिशनच्या नेतृत्वाने भारताला भेट दिली, लॅटिन अमेरिकेशी व्यापार चर्चा पुढे सरकली आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी देशात त्यांची उपस्थिती वाढवली. दरम्यान, भारतातील लॉजिस्टिक, आरोग्य सेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रात बदल होत असून त्याचे दीर्घकाळ आर्थिक परिणाम दिसून येऊ शकतात.

संयुक्त निवेदन: नवी दिल्ली येथे 28 फेब्रुवारी, 2025 रोजी झालेली भारत-युरोपीय महासंघ व्यापार आणि तंत्रज्ञान मंडळाची दुसरी बैठक

February 28th, 06:25 pm

भारत-युरोपीय महासंघ (ईयु) व्यापार आणि तंत्रज्ञान मंडळाची दुसरी बैठक दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातर्फे या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. तर युरोपीय महासंघातर्फे तांत्रिक सार्वभौमत्व, सुरक्षा आणि लोकशाही विभागाच्या कार्यकारी उपाध्यक्ष हेन्ना विर्कूनेन, व्यापार आणि आर्थिक सुरक्षितता, आंतर संस्थात्मक नातेसंबंध आणि पारदर्शकता विभाग आयुक्त मारोस सेफ्कोविक तसेच स्टार्ट अप्स, संशोधन आणि नवोन्मेष विभाग आयुक्त एकतेरीना झाहरिएवा यांनी ईयु बाजूने या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले.

नेत्यांचे निवेदनः युरोपीय आयोग आणि युरोपीय कॉलेज ऑफ कमिशनर्स च्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लेन यांची 27-28 फेब्रुवारी 2025 रोजी भारत भेट

February 28th, 06:05 pm

युरोपीय संघ- भारत या धोरणात्मक भागीदारीमुळे त्यांच्या जनतेला आणि व्यापक जागतिक कल्याणासाठी अतिशय भक्कम लाभ मिळाले असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लेन यांनी पुष्टी केली आहे. भारत-युरोपीय संघादरम्यानची 20 वर्षांची धोरणात्मक भागीदारी आणि 30 वर्षांहून जास्त कालावधीचा भारत- युरोपीय आयोग सहकार्य करार यावर आधारित ही भागीदारी एका नव्या स्तरावर नेण्याची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली आहे. अध्यक्ष व्हॉन डेर लेन यांनी 27-28 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या ऐतिहासिक औपचारिक भारत दौऱ्यात युरोपीय संघाच्या आयुक्तांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. युरोपीय संघाच्या आयुक्तांची त्यांचा नवा कार्यकाळ सुरू झाल्यापासून युरोपीय खंडाबाहेरील ही पहिली भेट होती आणि भारत-युरोपीय द्विपक्षीय संबंधांच्या इतिहासात देखील अशा प्रकारची ही पहिलीच भेट होती. दोन सर्वात मोठ्या लोकशाही आणि वैविध्यपूर्ण अनेकत्ववादी समाजासह खुल्या बाजारांच्या अर्थव्यवस्था म्हणून भारत आणि युरोपीय संघाने शांतता आणि स्थैर्य, आर्थिक वृद्धी आणि शाश्वत विकासाला पाठबळ देणाऱ्या प्रतिरोधक बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेला आकार देण्यात आपली बांधिलकी आणि सामाईक हित यांना अधोरेखित केले.

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांसोबत पूर्ण सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रारंभिक भाषण (28 फेब्रुवारी 2025)

February 28th, 01:50 pm

मी तुम्हा सर्वांचे भारतात हार्दिक स्वागत करतो. ईयू कॉलेज ऑफ कमिशनर्सचा एकाच देशासोबत इतक्या व्यापक स्तरावरचा हा सहभाग अभूतपूर्व आहे.

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल उर्सुला वॉन डेर लेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.

July 19th, 11:48 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उर्सुला वॉन डेर लेन यांचे युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे केले अभिनंदन

June 06th, 01:18 pm

युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल दूरध्वनी करून अभिनंदन केले.