भारत-युरोपियन युनियन संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन
January 27th, 01:30 pm
या अभूतपूर्व भारत भेटीसाठी आलेले, माझे दोन जवळचे मित्र, अध्यक्ष कोस्टा आणि अध्यक्ष वॉन डेर लेयन यांचे स्वागत करताना मला आनंद वाटत आहे. कोस्टा जी, हे आपली साधी जीवनशैली आणि समाजावरील प्रेमासाठी लिस्बनचे गांधी म्हणून ओळखले जातात आणि उर्सुला जी, या जर्मनीच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री आणि युरोपियन युनियन कमिशनच्याही पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत.सायप्रस आणि भारत यांच्यातील सर्वसमावेशक भागीदारीच्या अंमलबजावणीसंबंधी संयुक्त निवेदन
June 16th, 03:20 pm
सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी 15 ते 16 जून 2025 दरम्यान सायप्रसच्या अधिकृत दौ-यावर आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक स्वागत केले. गेल्या दोन दशकांहून अधिक काळानंतर पहिल्यांदा भारतीय पंतप्रधानांचा सायप्रसला दौरा होत आहे, आणि पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच दौरा आहे. हा एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे उभय राष्ट्रांमधील सखोल,दृढ आणि कायमस्वरूपी मैत्रीला पुन्हा एकदा पुष्टी मिळते. ही भेट केवळ ऐतिहासिक मानली जाते असे नाही, तर संयुक्त धोरणात्मक दृष्टिकोन आणि परस्पर विश्वास आणि आदर यांच्यावर आधारित भविष्यकालीन भागीदारीचे पर्व साजरे करते.