सुप्रसिद्ध निबंधकार आणि चरित्रकार श्री विनोद भट्ट यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले
May 23rd, 03:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध निबंधकार व चरित्रकार श्री विनोद भट्ट यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. पंतप्रधान म्हणाले, श्री. विनोद भट्ट हे एक शब्दप्रभू होते. विनोद आणि व्यंगचित्रकारिता त्यांच्याकडे स्वाभाविकपणे आले होते. त्याच्या कार्यामुळे अनेक चेहऱ्यांवर हसू येतच राहतील. त्यांचे निधन दुःखदायक आहे. त्यांच्या सर्व चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.