पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य संगत आणि सुज्ञ सल्ल्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
August 25th, 11:09 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य संगतीचे आणि सुज्ञ सल्ल्याचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. या संदेशातून ज्ञानी व्यक्तींची संगत, उदात्त विचारांची चर्चा आणि निस्वार्थ मैत्री हे परिपूर्ण आणि शांततापूर्ण जीवनासाठी आवश्यक पाया आहेत, हा शाश्वत विचार मांडण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुणा आणि समाधान यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
August 24th, 08:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की करुणेमुळे स्वाभिमान प्राप्त होतो तर समाधानामुळे खरा आनंद मिळतो. या भावनेमुळे समाजातील सहकार्याचे आणि सौहार्द्राचे बंध अधिक दृढ होतात.कलम 370 आणि 35(A) रद्द करण्याच्या निर्णयाला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांकडून त्याचे महत्व अधोरेखित
August 05th, 02:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 आणि 35(A) रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आज सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी 5 ऑगस्ट 2019 हा दिवस भारताच्या सर्वसमावेशक विकासाच्या प्रवासातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्याचे म्हटले आहे.चार्टर्ड अकाउंटंट्स दिनानिमित्त पंतप्रधानांकडून सनदी लेखापालांना शुभेच्छा
July 01st, 12:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार्टर्ड अकाउंटंट्स (सनदी लेखापाल) दिनानिमित्त सीए बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या आर्थिक प्रवासात सनदी लेखापालांनी नेहमीच विश्वासू भागीदार म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी नमूद केले. पारदर्शकता आणि व्यावसायिक उत्कृष्टतेच्या बळावर त्यांनी देशाची आर्थिक व्यवस्था अधिक मजबूत केली, उद्योगांना खंबीर साथ दिली, तरुण उद्योजकतेला प्रोत्साहन दिले आणि गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण केला, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.डिजिटल इंडिया उपक्रमाने 11 वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला; ते म्हणाले की या उपक्रमाने प्रशासनाचा कायापालट केला, नागरिकांना सक्षम केले आणि विकसित भारताचा पाया बळकट केला
July 01st, 12:04 pm
प्रशासन, सार्वजनिक सेवा वितरण आणि नागरिकांच्या जीवनावर परिवर्तनशील प्रभाव पाडणाऱ्या डिजिटल इंडिया उपक्रमाने 11 वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला.The aspirations, skills and potential of our youth shape the path to a Viksit Bharat: PM Modi at VBRY programme
June 19th, 05:15 pm
Addressing beneficiaries, industry representatives and stakeholders of the PM Viksit Bharat Rozgar Yojana, PM Modi disbursed incentives worth around ₹2,400 crore and highlighted the government's commitment to empowering India's youth and boosting employment generation. He described PM-VBRY as a bridge between youth and industry, noting that the scheme has supported the creation of 15 lakh jobs and brought nearly 70 lakh first-time employees under social security.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, प्रधान मंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत, 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचे वितरण
June 19th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचे संबंधित लाभार्थी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध भागधारकांशी संवाद साधत, भारतातील युवकांना सक्षम बनवणे आणि देशभरात रोजगारनिर्मितीला अधिक चालना देण्यासाठीची सरकारची कटिबद्धता अधोरेखित केली. यावेळी पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत, 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचे वितरण केले. केंद्र सरकारच्या रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना या पथदर्शी अशा प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अंमलबजावणीतला हा एक महत्वाचा टप्पा ठरला असून विविध क्षेत्रात, समाजिक सुरक्षेची व्याप्तीही यामुळे वाढली आहे. या प्रोत्साहनपर निधीमुळे, देशभरात 15 लाख रोजगारनिर्मिती झाली आहे.Bharat Innovates is becoming a bridge between Indian talent and European capital: PM Modi in Nice, France
June 14th, 04:36 pm
PM Modi and French President Emmanuel Macron jointly inaugurated Bharat Innovates 2026 in Nice, France. Addressing a gathering, PM Modi highlighted India’s deep-tech revolution and the transformative potential of AI, satellite technology, advanced manufacturing and clean energy. He called for trusted, inclusive and human-centric innovation, while reaffirming India’s vision of becoming a global innovation hub.पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘भारत इनोव्हेट्स 2026’ मध्ये झाले सहभागी
June 14th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज फ्रान्समधील नीस येथील पॅलेस डे एक्स्पोझिशन्स येथे 'भारत इनोव्हेट्स 2026' या कार्यक्रमाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. भारत इनोव्हेट्स हा तीन दिवसीय कार्यक्रम, जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नवोन्मेष निधी आणि प्रभावासह भारतीय डीप-टेक स्टार्टअप्स, नवोन्मेषक, संशोधक आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणणारा मंच आहे. जागतिक स्तरावर भारताचे अग्रगण्य डीप तंत्रज्ञान प्रदर्शित करणाऱ्या या कार्यक्रमात जागतिक महत्त्वाच्या 13 महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान स्तंभांमधील 120 पथदर्शी स्टार्टअप्स आणि 20 हून अधिक उत्कृष्ट संशोधन संस्थांच्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले आहे. जगभरातील 350 हून अधिक आघाडीचे गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये दाखल
June 13th, 11:19 pm
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यासाठी त्यांचे फ्रान्समधील नीस येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत अत्यंत अगत्याने आणि विशेष आदरातिथ्याने करण्यात आले, जे भारत आणि फ्रान्समधील मजबूत आणि घट्ट संबंध दर्शवते. हा दौरा भारत-फ्रान्समधील दृढ होत जाणारी भागीदारी आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याच्या सामायिक वचनबद्धतेवर भर देतो.युवा नेतृत्वाखालील विकास आणि बळकट नवोन्मेष परिसंस्थेला चालना देण्यासाठी सरकारच्या भक्कम प्रयत्नांवर पंतप्रधानांचा भर
June 13th, 11:44 am
युवा नेतृत्वाखालील विकासाला चालना देण्यासाठी सरकार ठामपणे कार्यरत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. गेल्या 12 वर्षांतील एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे भारतातील युवकांनी आपल्या आकांक्षांचा आत्मविश्वासाने पाठपुरावा करत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याचे त्यांनी नमूद केले. स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया आणि अटल इनोव्हेशन मिशन यांसारख्या उपक्रमांमुळे नवोन्मेष, उद्योजकता आणि उद्योगशीलतेला प्रोत्साहन देणारी सक्षम परिसंस्था विकसित झाली आहे, असे मोदी यांनी सांगितले. आज भारत हा जगातील आघाडीच्या स्टार्टअप केंद्रांपैकी एक बनला असून, या यशोगाथांपैकी अनेक आपल्या युवा शक्तीकडून लिहिल्या जात आहेत. विशेष म्हणजे, या यशोगाथा लहान शहरे आणि गावांमधूनही घडत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.PM shares a Sanskrit Subhashitam highlighting that Nari Shakti is the cornerstone of nation-building and the true embodiment of power
June 12th, 12:39 pm
PM Modi shared a Sanskrit Subhashitam highlighting Nari Shakti as the cornerstone of nation-building and the true embodiment of power. Reflecting on 12 years of women-led development, he noted the growing role of women across sectors such as financial inclusion, entrepreneurship, education, healthcare, sanitation, housing, science, innovation and governance.पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये देशवासियांना डिजिटल जनगणना 2027 मध्ये सहभागी होऊन ती यशस्वी करण्याचे आवाहन केले.
April 26th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' भागात, पंतप्रधान मोदींनी अणू आणि पवन ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी भगवान बुद्धांची शिकवण, 'बीटिंग रिट्रीट' सोहळा, निसर्ग संवर्धन, बांबू क्षेत्र, प्राचीन ग्रंथ आणि 'गणितीय ऑलिम्पियाड कार्यक्रम' यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणनेच्या मोहिमेबद्दलही माहिती दिली आणि सर्वांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.पंतप्रधान 13 एप्रिल रोजी ‘नारी शक्ती वंदन संमेलनाला’ संबोधित करणार
April 12th, 04:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील नारी शक्ती वंदन संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.कृषी आणि ग्राम परिवर्तन या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनामधील पंतप्रधानांच्या संबोधनाचा मराठी अनुवाद.
March 06th, 01:14 pm
अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील तिसऱ्या वेबिनारमध्ये, मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. याआधी, तंत्रज्ञान, सुधारणा आणि आर्थिक विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोन वेबिनार झाले आहेत. आज, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होत आहे. तुम्ही सगळ्यांनी अर्थसंकल्प तयार करण्यात तुमच्या मौल्यवान सूचनांच्या माध्यमातून खूप सहकार्य केले आणि तुम्ही पाहिले असेल, अर्थसंकल्पात तुम्हा सगळ्यांच्या सूचना प्रतिबिंबित झाल्या आहेत, खूप कामी आल्या आहेत. पण आता अर्थसंकल्प सादर झाला आहे, या अर्थसंकल्पानंतर त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ देशाला मिळावा, या दिशेनेही तुमचा अनुभव, तुमच्या सूचना आणि सुलभ रितीने अर्थसंकल्पाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळायला हवा. अर्थसंकल्पातील एकेक पैसा ज्या हेतूने दिला गेला आहे, तो पूर्ण कसा करता येईल? लवकरात लवकर कसा करता येईल? तुमच्या सूचना या वेबिनारसाठी खूप महत्वाच्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कृषी आणि ग्रामीण परिवर्तनावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित
March 06th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'कृषी आणि ग्रामीण परिवर्तन' या विषयावर भर असलेल्या तिसऱ्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाशी संबंधित मागील सत्रांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी नमूद केले की, अर्थसंकल्प तयार करताना भागधारकांनी मोलाचे सहकार्य केले होते. आता, अर्थसंकल्पानंतर हे तितकेच महत्त्वाचे आहे की देशाला त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ मिळावा, आणि या दृष्टीने तुमच्या सूचना आणि हा अर्थसंकल्पोत्तर वेबिनार अत्यंत महत्त्वाचा आहे, यावर मोदी यांनी यावर भर दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी 'शेती आणि ग्रामीण परिवर्तन ' या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करणार
March 05th, 06:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दि. 6 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी, शेती आणि ग्रामीण परिवर्तन या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.भारत-कॅनडा नेत्यांचे संयुक्त निवेदन
March 02nd, 05:05 pm
भारताचे पंतप्रधान महामहिम नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, कॅनडाचे पंतप्रधान राईट ऑनरेबल मार्क कार्नी यांनी 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीत भारताचा अधिकृत दौरा केला. पंतप्रधान कार्नी यांचा पंतप्रधान म्हणून पदभार स्विकारल्यानंतरचा हा पहिलाच भारत दौरा होता तसेच 2018 नंतर कॅनडाच्या पंतप्रधानांची ही पहिलीच द्विपक्षीय भारत भेट आहे. पंतप्रधान कार्नी यांच्यासोबत कॅनडाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ होते, ज्यात वरिष्ठ मंत्री, प्रांतीय नेते आणि आघाडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश होता.कॅनडाच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याचे फलित
March 02nd, 05:04 pm
कॅनडाच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याचे फलितपंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी रोजी केरळ दौ-यावर
January 22nd, 02:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी 2026 रोजी केरळला भेट देणार आहेत. तिरुवअनंतपुरममध्ये सकाळी 10:45 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि आरंभ करण्यात येईल. या कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधितही करतील.