इथिओपियाच्या संसदेत संयुक्त अधिवेशनात पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
December 17th, 12:25 pm
आज आपल्या समोर उभे राहण्याचा मला मोठा सन्मान आणि विशेषाधिकार लाभला आहे. सिंहांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथिओपियात येणे हे अत्यंत आनंददायी आहे. मला येथे अगदी घरी असल्यासारखे वाटते कारण, भारतातील माझे गृह राज्य गुजरात हेही सिंहांचे निवासस्थान आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या संसदेतील संयुक्त अधिवेशनाला केले संबोधित
December 17th, 12:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इथिओपियाच्या संसदेत संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. इथिओपियाचा हा त्यांचा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. त्यानिमित्त त्यांना अधिवेशनात भाषण करण्याचा विशेष सन्मान मिळाला.स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 27th, 11:01 am
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, जी. किशन रेड्डीजी, आंध्र प्रदेशचे उद्योग मंत्री, टी.जी. भरतजी, इन-स्पेसचे अध्यक्ष, पवन गोएंकाजी, टीम स्कायरूट, इतर मान्यवर, आणि सभ्य स्त्री-पुरूषहो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
November 27th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद येथे स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की आज देश अंतराळ क्षेत्रात एक अभूतपूर्व संधी असल्याचे पाहत आहे आणि खाजगी क्षेत्राच्या प्रगतीमुळे भारताची अंतराळ परिसंस्था मोठी झेप येत आहे यावर त्यांनी भर दिला. स्कायरूटचे इन्फिनिटी कॅम्पस भारताची नवीन विचारसरणी, नवोन्मेष आणि युवाशक्तीचे प्रतिबिंब आहे यावर भर देत त्यांनी अधोरेखित केले की देशातील नवोन्मेष , युवकांची जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्योजकता नवीन उंची गाठत आहे. आगामी काळात जागतिक उपग्रह प्रक्षेपण परिसंस्थेत भारत आघाडीचा देश म्हणून कसा उदयास येईल याचे प्रतिबिंब म्हणजे आजचा कार्यक्रम आहे असे मोदी यांनी सांगितले. त्यांनी पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका यांना शुभेच्छा दिल्या आणि नमूद केले की हे दोन्ही युवा उद्योजक देशभरातील असंख्य तरुण अंतराळ उद्योजकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. दोघांनीही स्वतःवर विश्वास ठेवला, जोखीम घेण्यास मागेपुढे पाहिले नाही आणि परिणामी आज संपूर्ण देश त्यांचे यश पाहत आहे आणि देशाला त्यांचा अभिमान वाटत आहे यावर त्यांनी भर दिला .मेक इन इंडिया उपक्रमाच्या 11 वर्षपूर्तीप्रसंगी पंतप्रधानांचे अभिवादन
September 25th, 01:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मेक इन इंडिया उपक्रमाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त, भारताच्या आर्थिक प्रवासावर आणि उद्योजकीय परिसंस्थेवर झालेल्या परिवर्तनात्मक परिणामाचा गौरव केला. पंतप्रधानांनी नमूद केले की, मेक इन इंडियाने भारतातील उद्योजकांना प्रचंड बळ दिले असून, त्यातून जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण झाला आहे.उत्तर प्रदेशात ग्रेटर नॉयडा येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 25th, 10:22 am
यूपी इंटरनॅशनल ट्रेड शोमध्ये सहभागी झालेले सर्व व्यापारी, गुंतवणूकदार, उद्योजक आणि तरुण मित्रांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. येथे 2200 पेक्षा अधिक प्रदर्शक आपल्या उत्पादनांचे आणि सेवांचे प्रदर्शन करत आहेत, याचा मला आनंद वाटत आहे. यंदाच्या ट्रेड शोचा भागीदार देश रशिया आहे. म्हणजेच, या ट्रेड शोच्या माध्यमातून आपण काळाच्या कसोटीवर पारखलेली एक भागीदारी आणखी बळकट करत आहोत. मुख्यमंत्री योगीजींना, सरकारमधील इतर सर्व सहकाऱ्यांना आणि हितधारकांना या कार्यक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाला केले संबोधित
September 25th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन 2025 याचे आज उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व व्यापारी, गुंतवणूकदार, उद्योजक आणि तरुण प्रतिनिधींचे स्वागत केले.या कार्यक्रमात 2,200 हून अधिक प्रदर्शक त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करत आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. रशिया हा या व्यापार प्रदर्शनातील भागीदार देश आहे, जो काळाच्या कसोटीवर उतरलेल्या भागीदारीच्या सबलीकरणावर भर देतो, असे मोदींनी यावेळी अधोरेखित केले.या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शासकीय अधिकारी आणि इतर भागधारकांचे अभिनंदन केले. हा दिवस पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी आला आहे,ज्यांनी राष्ट्राला अंत्योदय - म्हणजे तळागाळातील शेवटच्या व्यक्तीचा उत्कर्ष साधण्यासाठी मार्गदर्शन केले, असे पंतप्रधानांनी नमूद केले.अंत्योदय म्हणजे विकास हा गरिबातल्या गरीबापर्यंत पोहोचणे, सर्व प्रकारच्या भेदभावाचे उच्चाटन करणे, यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि भारत आता जगाला सर्व समावेशक विकासाचे हेच प्रारुप असल्याचे दाखवून देत आहे,असे ते पुढे म्हणाले.गुजरातमधील अहमदाबाद येथे विविध विकास योजनांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 25th, 06:42 pm
तुम्ही सर्वांनी आज छान वातावरण निर्मिती केली आहे. अनेक वेळा माझ्या मनात विचार येतो की मी किती नशीबवान आहे, ज्यामुळे मला लाखो लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभत आहेत. मी तुम्हा सर्वांचे कितीही आभार मानले तरीही ते कमीच आहेत. पहा तिकडे कोणी छोटा नरेंद्र उभा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद, गुजरात येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
August 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, संपूर्ण देश सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाने भरलेला आहे. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आज गुजरातच्या प्रगतीशी जोडलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे. त्यांनी सांगितले की, अनेक प्रकल्प जनतेच्या चरणी समर्पित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे आणि या विकास उपक्रमांसाठी त्यांनी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन केले.उत्तरप्रदेशात सेमीकंडक्टर युनिट स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
May 14th, 03:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आज इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आणखी एक सेमीकंडक्टर युनिट स्थापन करायला मंजुरी देण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या नागरी सेवा दिनी केलेले भाषण
April 21st, 11:30 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी डॉ जितेंद्र सिंह जी, शक्तीकांत दास जी,डॉ. सोमनाथ जी, इतर वरिष्ठ अधिकारी वर्ग, देशभरातून जोडले गेलेले नागरी सेवेतील सर्व मित्र, महिला आणि सद्गृहस्थ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
April 21st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नागरी सेवकांना संबोधित केले. त्यांनी लोक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठीचे पंतप्रधान पुरस्कारदेखील प्रदान केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन केले आणि संविधानाचे 75 वे वर्ष आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती असल्याने या वर्षीच्या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. सरदार पटेल यांनी 21 एप्रिल1947 रोजी नागरी सेवकांना 'भारताची पोलादी चौकट' असे संबोधले होते. त्या संस्मरणीय संबोधनाची आठवण करून देताना, पंतप्रधान मोदी यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणारी आणि अत्यंत समर्पणाने देशाची सेवा करणारी सनदी सेवा, या सरदार पटेल यांच्या दृष्टिकोनावर भर दिला. विकसित भारत निर्माण करण्याच्या भारताच्या संकल्पाच्या संदर्भात त्यांनी सरदार पटेल यांच्या आदर्शांची प्रासंगिकता अधोरेखित केली आणि सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीला आणि वारशाला मनापासून अभिवादन केले.मुद्रा योजनेची दहा वर्षे सक्षमीकरण आणि उद्यमशीलतेची- पंतप्रधान
April 08th, 09:43 pm
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या दशकपूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. “सक्षमीकरण आणि उद्यमशीलता” यांचा हा दहा वर्षांचा प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य पाठबळ मिळाले तर भारताचे लोक चमत्कार करू शकतात, असे त्यांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद
April 08th, 01:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील 7, लोक कल्याण मार्ग इथल्या आपल्या निवासस्थानी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानले, पाहुण्यांचे स्वागत करण्याचे सांस्कृतिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले, तसेच या सर्वांच्या उपस्थितीमुळे घरात येणाऱ्या पावित्र्यावरही त्यांनी आवर्जून भर दिला. यावेळी पंतप्रधानांनी सर्व सहभागींना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आमंत्रित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र यांनी पाळीव प्राण्यांसाठी लागणाऱ्या वस्तू, औषधे आणि सेवांचा व्यवसाय सुरुवे केलेल्या एका उद्योजक लाभार्थ्याशी संवाद साधला. यावेळी प्रधानमंत्र्यांनी या सर्व लाभार्थ्यांना ज्यांनी त्यांच्या कठीण काळात त्यांच्या क्षमतांवर विश्वास दाखवला त्या सर्वांचे आभार मानण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. त्यांनी या लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी कर्ज मंजूर केलेल्या बँक अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्याचे आणि त्यांनी मंजुर केलेल्या कर्जामुळे साधता आलेली प्रगती त्यांना दाखवण्याचा सल्ला दिला. आपल्या अशा कृतींमुळे या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाची पावती त्यांना मिळेलच, आणि सोबतच मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करणाऱ्या व्यक्तींना पाठबळ देण्याच्या त्यांच्या निर्णयावरही त्यांचा स्वतःचा विश्वास निर्माण होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठबळाचे परिणाम त्यांना दाखवले तर त्यामुळे त्यांनाही तुमच्या प्रगती आणि यशात दिलेल्या योगदानाचा नक्कीच अभिमान वाटेल असे पंतप्रधान म्हणाले.अर्थसंकल्पानंतर एमएसएमई क्षेत्राबाबत झालेल्या तीन वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेले मूळ भाषण
March 04th, 01:00 pm
उत्पादन आणि निर्यात या विषयांवर आधारित अर्थसंकल्प वेबिनार सर्वच दृष्टीने खूपच महत्त्वाचं आहे.आपल्याला माहितीच आहे की, हा अर्थसंकल्प आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प होता.अपेक्षेपेक्षा जास्त लाभ हे या अर्थसंकल्पाचं सगळ्यात खास वैशिष्ट्य होतं. अशी अनेक क्षेत्रं आहेत, ज्यामधे तज्ज्ञांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त मोठमोठी पावलं सरकारनं उचलली हे तुम्ही अर्थसंकल्पात पाहिलं आहेच. उत्पादन आणि निर्यातीशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय अर्थसंकल्पात घेतले गेले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पोत्तर वेबिनार्सना केले संबोधित
March 04th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अर्थसंकल्प-पश्चात वेबिनार्सना संबोधित केले.विकासाचे इंजिन या रूपाने एमएसएमई’; निर्मिती, निर्यात आणि अणुउर्जा मोहिमा;नियामकीय, गुंतवणूक तसेच व्यवसाय सुलभता सुधारणा या विषयावर हे वेबिनार्स आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, निर्मिती आणि निर्यात या विषयांवर आधारित अर्थसंकल्प-पश्चात वेबिनार्स अत्यंत महत्त्वाची आहेत. हा अर्थसंकल्प विद्यमान सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलाच सर्वंकष अर्थसंकल्प आहे याचा उल्लेख करून अपेक्षेच्याही पलीकडे साकार हा या अर्थसंकल्पाचा सगळ्यात उल्लेखनीय पैलू आहे हे त्यांनी ठळकपणे नमूद केले. अनेक क्षेत्रांमध्ये तज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजांच्या पलीकडे जाऊन सरकारने पावले उचलली आहेत याकडे मोदी यांनी सर्वांचे लक्ष वेधले.निर्मिती आणि निर्यात यांच्या बाबतीत या अर्थसंकल्पात घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय देखील त्यांनी अधोरेखित केले.भारत टेक्स 2025 मधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 16th, 04:15 pm
आज, भारत मंडपम्, दुसऱ्या भारत टेक्स प्रदर्शनाच्या आयोजनाचा साक्षीदार होते आहे. त्यामध्ये आपल्या परंपरांसोबतच विकसित भारताच्या संधींचे दर्शन होते आहे. आपण ज्या रोपाचे बीज रोवले, ते आज वटवृक्ष होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, ही देशासाठी नक्कीच समाधानाची बाब आहे. भारत टेक्स आता एक मोठा जागतिक कार्यक्रम बनू पाहातो आहे. यावेळी मूल्य साखळीची संपूर्ण श्रेणी, त्याच्याशी निगडीत 12 समूह एकाच वेळी इथे सहभागी होत आहेत. अक्सेसरीज, कपडे, यंत्रसामग्री, रसायने आणि रंग देखील यामध्ये प्रदर्शित केले जात आहेत. जगभरातले धोरणकर्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग नेतृत्वासाठी सगहभाग, सहकार्य आणि भागीदारीसाठी, भारत टेक्स हे मजबूत व्यासपीठ होत आहे. या आयोजनासाठी सर्वच भागदारांचे प्रयत्न खूप कौतुकास्पद आहेत, या कामाशी निगडीत असलेल्या सर्व लोकांना मनपासून खूप खूप शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत टेक्स 2025 मंचाला केले संबोधित
February 16th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आयोजित भारत टेक्स 2025 या वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने भरवलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली. आपल्या संबोधनातून त्यांनी भारत टेक्स 2025 या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे स्वागत केले. हे या उपक्रमाचे दुसरे पर्व असून, भारत मंडपम हा यंदाच्या पर्वाचा साक्षीदार असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या वारशाचे दर्शन तर घडलेच, आणि त्याच वेळी विकसित भारताच्या भवितव्याची झलकही पाहायला मिळली, आपल्या भारतासाठी ही अभिमानाची बाब असल्याची भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. भारत टेक्स आता भव्य स्वरुपातील जागतिक वस्त्रोद्योग सोहळा झाला असल्याच्या शब्दांत पंतप्रधानांनी या उपक्रमाचे महत्व अधोरेखीत केले. मूल्यसाखळीच्या परिघाशी जोडलेल्या सर्व बारा घटकांचे प्रतिनिधी यंदाच्या उपक्रमात सहभागी झाले असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. या उपक्रमाच्या निमित्ताने उपयुक्त पुरक साधने , कपडे, यंत्रसामुग्री, रसायने आणि कापडांसाठीचे रंग या आणि अशा इतर घटकांचे प्रदर्शन भरवले असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारत टेक्स हा उपक्रम जगभरातील धोरणकर्ते, या उद्योग क्षेत्रातील अग्रणी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकरता परस्पर सहकार्य आणि भागिदारी प्रस्थापित करण्याच्यादृष्टीने परस्परांसोबत जोडून घेण्यासाठीचा एक मजबूत मंच बनला असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक हितधारकाने केलेल्या प्रयत्नांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याबद्दल संगीतकार चंद्रिका टंडन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
February 03rd, 02:32 pm
संगीतकार चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले. भारतीय संस्कृतीबद्दल चंद्रिका टंडन यांना असलेली आवड आणि उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्या व संगीतकार म्हणून त्यांनी केलेले कार्य, याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रात पुढाकार घेण्यास भारत वचनबद्ध - पंतप्रधान
January 04th, 02:42 pm
भारतीय उद्योजक विशाल सिक्का यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट आंतरिक संवाद ठरल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की नवोन्मेष आणि युवा पिढीसाठी संधी निर्माण करण्यावर भर देऊन कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रात पुढाकार घेण्यास भारत वचनबद्ध आहे. पंतप्रधान आणि विशाल सिक्का या दोघांनी कृत्रिम प्रज्ञेचा वापर आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम तसेच भविष्यातील अनेक अनिवार्य गोष्टी या सर्व बाबींवर सविस्तर व व्यापक चर्चा केली.