दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र व कर्नाटकमधील 12 जिल्ह्यांतील तीन बहुमार्गी प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, भारतीय रेल्वेच्या मार्गांमध्ये 389 किलोमीटरची वाढ
February 14th, 12:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या तीन (3) प्रकल्पांना तसेच 18,509 कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या एकंदर खर्चाला काल मंजूरी दिली. हे प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत-केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया
February 01st, 01:38 pm
आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे; यातून देशातील महिलांच्या शक्तीचे सशक्त प्रतिबिंब झळकते. महिला अर्थमंत्री म्हणून निर्मलाजींनी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा अर्थसंकल्प अफाट संधींचा राजमार्ग आहे. हा अर्थसंकल्प वर्तमानातील स्वप्ने साकार करतो आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करतो. हा अर्थसंकल्प 2047 च्या विकसित भारताच्या दिशेने उंच भरारीचा एक मजबूत पाया आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अर्थसंकल्प 2026-27 विषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया
February 01st, 01:00 pm
आज मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 विषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य माध्यमाव्दारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असून त्यात देशातील सक्षम महिलांच्या भावनांचे प्रतिबिंब दिसत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सलग नऊ वेळा सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री असून, हा एक विक्रम आहे असे त्यांनी अधोरेखित केले. हा अर्थसंकल्प म्हणजे अनंत संधींनी परिपूर्ण असा एक महामार्ग असून भारताच्या वर्तमानातील स्वप्ने पूर्ण करणारा तसेच उज्वल भवितव्याची पायाभरणी करणारा आहे, असे ते म्हणाले. हा अर्थसंकल्प वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या संकल्पाकडे झेप घेण्यास देशाची तयारी करत आहे, असे त्यांनी म्हटले.