पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
September 06th, 06:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
August 21st, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचा दूरध्वनी आला.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मानले जगभरातील नेत्यांचे आभार
August 15th, 07:26 pm
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल जगभरातील नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.जी 7 शिखर परिषदेत पंतप्रधानांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद
June 18th, 02:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे 51 व्या जी 7 शिखर परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी संवाद साधला. विविध मुद्द्यांबाबत विचारांचे आदानप्रदान करत, उभय नेत्यांनी भारत आणि फ्रान्स आपल्या वसुंधरेच्या भल्यासाठी एकत्रितपणे काम करत राहतील यावर भर दिला.आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेतले पंतप्रधानांचे संबोधन
June 07th, 02:00 pm
आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा 2025 या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. युरोपमध्ये ही परिषद प्रथमच आयोजित केली जात आहे. माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन आणि फ्रान्स सरकारने केलेल्या सहयोगाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आगामी संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेसाठीही मी शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा संबंधित आंतरराष्ट्रीय परिषद 2025 ला केले संबोधित
June 07th, 01:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा संबंधित आंतरराष्ट्रीय परिषद 2025 ला संबोधित केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा संबंधित आंतरराष्ट्रीय परिषद 2025 चे युरोपात प्रथमच आयोजन होत आहे याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी या परिषदेतील सहभागींचे स्वागत केले. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ईमॅन्युएल मॅक्रोन आणि फ्रेंच सरकार यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या आगामी महासागरी परिषदेच्या आयोजनासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा देखील दिल्या.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध
April 24th, 03:29 pm
जम्माू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात, अनेक निरपराध लोकांचा बळी गेला त्या घटनेनंतर सहवेदना व्यक्त करण्यासाठी जागतिक नेत्यांची रीघ लागली होती. साऱ्या जगातून मिळालेल्या या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त करतानाच भारत दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या पाठीराख्यांना पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातून हुडकून काढेल असाही निर्धार व्यक्त केला.पंतप्रधान मोदींचा फ्रान्स दौरा: धोरणात्मक भागीदारीला बळकटी आणि AI सहकार्यात आघाडी
February 13th, 03:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स आणि युनायटेड स्टेट्सच्या नुकत्याच पार पडलेल्या राजनैतिक दौऱ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आर्थिक सुधारणा आणि ऐतिहासिक संबंधांचा आदर राखणे या मुद्यांना ठळकपणे केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याने त्याचा भारताची जगासोबतची आघाडी अधिक बळकट करण्यावर लक्षणीय प्रभाव पाडला. या सर्वसमावेशक भेटीने AI चा जबाबदार विकास, आर्थिक सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्याप्रती भारताची वचनबद्धता प्रकट झाली.PM Modi and President of France jointly inaugurate the Consulate General of India in Marseille
February 12th, 05:29 pm
PM Modi and President Emmanuel Macron inaugurated the Consulate General of India in Marseille. The new Consulate will boost economic, cultural, and people-to-people connections across four French regions. PM Modi deeply appreciated President Macron’s special gesture, as both leaders received a warm welcome from the Indian diaspora.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मार्सिले येथील माझारग्युस युद्ध समाधी स्थळाला भेट दिली
February 12th, 04:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज सकाळी मार्सिले येथील माझारग्युस युद्ध समाधी स्थळाला भेट दिली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. दोन्ही नेत्यांनी पुष्पांजली अर्पण करून शहीद वीरांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ आदरांजली वाहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा
February 12th, 03:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या विमानातून पॅरिसहून मार्सिलेला एकत्र प्रवास केला यातून दोन्ही नेत्यांमधील मित्रत्वाच्या बंधाची प्रचीती येते.त्यांनी द्विपक्षीय संबंधांतील सर्व पैलूंवर आणि प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर मार्सिले येथे आगमन झाल्यावर प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाली. गेल्या 25 वर्षांत बहुआयामी संबंधात हळूहळू विकसित झालेल्या भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीबद्दल दोन्ही नेत्यांनी त्यांच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरूच्चार केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीदरम्यान जारी केलेले भारत - फ्रान्स संयुक्त निवेदन
February 12th, 03:22 pm
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10-12 फेब्रुवारी 2025 या काळात फ्रान्सला भेट दिली. भारत आणि फ्रान्स यांनी 10 आणि 11 फेब्रुवारी 2025 ला झालेल्या कृत्रिम बुद्धीमत्ता कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्ष पद भूषवले.ब्लेचली पार्क (नोव्हेंबर 2023 ) आणि सेउल (मे 2024) शिखर परिषदांदरम्यान ठरवल्मया गेलेल्या महत्वाच्या मुद्यांबाबत पुढील पाऊलांसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी देशांचे आणि प्रशासनाचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख,लघु आणि मोठे उद्योग,शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी,बिगर सरकारी संस्था,कलाकार आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. जागतिक एआय क्षेत्र सार्वजनिक हितासाठी सामाजिक,आर्थिक आणि पर्यावरणविषयक फलनिष्पत्ती प्रदान करेल याची सुनिश्चिती करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याप्रती त्यांनी आपली कटिबद्धता अधोरेखित केली. एआय कृती शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे अभिनंदन केले. पुढच्या एआय कृती शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार असल्याबद्दल फ्रान्सने भारताचे स्वागत केले.पॅरीस इथे झालेल्या भारत -फ्रान्स मुख्य कार्यकारी अधिकारी मंच येथील पंतप्रधानांचे भाषण
February 12th, 12:45 am
राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ,भारत आणि फ्रान्समधले इथं उपस्थित असलेले उद्योजक सर्वांना माझा नमस्कार, बोजों!पंतप्रधानांनी 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाला केले संबोधित
February 12th, 12:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज पॅरिसमध्ये 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाला संयुक्तपणे संबोधित केले. संरक्षण, एरोस्पेस, महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, जीवन-विज्ञान, निरामय आरोग्य आणि जीवनशैली, तसेच अन्न आणि आदरातिथ्य यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून दोन्ही देशांमधील कंपन्यांच्या विविध गटातील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या मंचावर एकत्र आले होते. .पॅरिस येथे एआय-कृती शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समारोपाचे भाषण
February 11th, 05:35 pm
आजच्या चर्चेतून एक गोष्ट समोर आली आहे - सर्व हितधारकांमध्ये दृष्टिकोन आणि उद्देशांमध्ये एकवाक्यता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस येथे एआय-कृती शिखर परिषदेत केलेले उद्घाटनपर भाषण
February 11th, 03:15 pm
जर तुम्ही तुमचा मेडिकल रिपोर्ट एआय ऍपवर अपलोड केला तर तो तुम्हाला साध्या भाषेत कोणत्याही अडचणीविना तुमच्या आरोग्याची माहिती समजावून सांगू शकतो. पण याच ऍपला जर तुम्ही एका अशा व्यक्तीचे चित्र काढायला सांगितले जी व्यक्ती तिच्या डाव्या हाताने लिहीत आहे तर बहुधा हे ऍप उजव्या हाताने लिहीणाऱ्या माणसाचे चित्र काढेल.याचे कारण म्हणजे ते पूर्णपणे याच ट्रेनिंग डेटावर आधारित आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले पॅरिसमधील एआय-कृती शिखर परिषदेचे सह अध्यक्षपद
February 11th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ यांच्यासह पॅरिसमध्ये एआय कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवले. एक आठवडाभर चालणाऱ्या या शिखर परिषदेची 6-7 फेब्रुवारी या विज्ञान दिनी सुरुवात झाली. त्यानंतर 8-9 फेब्रुवारीला सांस्कृतिक सप्ताहांचे आयोजन झाले. जागतिक नेते, धोरणकर्ते आणि उद्योग धुरीण यांच्या उपस्थितीत एका उच्च स्तरीय कार्यक्रमात तिचा समारोप झाला.पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये पॅरिस येथे दाखल
February 10th, 10:30 pm
काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल झाले. त्यांचे आगमन होताच त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. या भेटीत पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करतील, एआय ॲक्शन समिट आणि इतर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन
February 10th, 12:00 pm
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून मी 10 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहे. पॅरिसमध्ये पोहोचल्यावर, मी तिथे होणार असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविण्यासाठी उत्सुक आहे. या शिखर परिषदेत जगभरातील नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले जगभरातले अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी एकत्र येणार आहेत. या शिखर परिषदेत आम्ही सर्वजण मिळून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञाचा नवोन्मेषास तसेच व्यापक सार्वजनिक हितासाठी सर्वसमावेशक, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने वापर करण्यासंबंधीच्या परस्पर सहकार्याच्या दृष्टिकोनावर विचारांची देवाणघेवाण करणार आहोत.भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल फ्रान्सचे अध्यक्ष आणि आयर्लंडच्या पंतप्रधानांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
January 27th, 11:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ आणि आयर्लंडचे पंतप्रधान मायकेल मार्टिन यांचे भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले.