गुजरातमध्ये मायक्रॉन सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 28th, 02:45 pm
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा,अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर, उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,जगातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेनंतर आजआपण येथे आणखी एका ऐतिहासिक टप्प्याचे साक्षीदार बनत आहोत. एआय परिषदेने जगाला भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेची ओळख करून दिली, आजचादिवस हा भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाच्या वचनबद्धतेचा आणखीएक वस्तुपाठ आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील साणंद येथे मायक्रोन टेक्नॉलॉजीच्या सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्ट अँड पॅकेजिंग (एटीएमपी) सुविधेचे उद्घाटन
February 28th, 02:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील साणंद येथे मायक्रोन एटीएमपी (असेंब्ली, टेस्ट, मार्किंग आणि पॅकेजिंग) सुविधेचे उद्घाटन केले. व्यावसायिक उत्पादनाची सुरुवात हा जागतिक तंत्रज्ञानातील नेतृत्वाच्या दिशेने भारताच्या प्रवासातला एक ऐतिहासिक टप्पा आहे.Uttar Pradesh is set to emerge as a major hub for the nation’s Semiconductor Ecosystem: PM Modi
February 21st, 05:30 pm
PM Modi participated in the groundbreaking ceremony of HCL-Foxconn Semiconductor Unit in Uttar Pradesh. Speaking via VC, he lauded the ceremony as a historic milestone in India’s journey toward becoming a global semiconductor hub. He remarked that India has accelerated its pace in 2026 and highlighted major milestones such as Viksit Bharat Young Leaders Dialogue, National Startup Day and India Energy Summit. The PM credited the Double-Engine Government for changing the identity of Uttar Pradesh.पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर युनिटच्या भूमिपूजन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले सहभागी
February 21st, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर युनिटच्या भूमिपूजन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला. नवी दिल्ली येथे झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिटच्या अनुषंगाने हा समारंभ म्हणजे जागतिक सेमीकंडक्टर हब बनण्याच्या भारताच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा आहे.रोजगार मेळ्या अंतर्गत नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 24th, 11:30 am
सन 2026 ची सुरुवात तुमच्या आयुष्यात नव्या आनंदाची सुरुवात घेऊन येत आहे. वसंत पंचमी कालच साजरी झाली असून, तुमच्या आयुष्यातही नव्या वसंताची सुरुवात होत आहे. हा काळ तुम्हाला संविधानाबद्दलच्या तुमच्या जबाबदाऱ्यांशीही जोडणारा आहे. योगायोगाने, या काळात देशात प्रजासत्ताकाचा महोत्सव सुरू आहे. काल 23 जानेवारी रोजी आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी केली आणि उद्या 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आहे. त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. आजचा दिवस ही विशेष आहे. आजच्याच दिवशी आपल्या संविधानाने ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते. आजच्या या महत्त्वाच्या दिवशी देशातील 61 हजारांहून अधिक युवक आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. आज तुम्हा सर्वांना सरकारी सेवांसाठी नियुक्तीपत्रे मिळत आहेत. ही नियुक्तीपत्रे म्हणजे राष्ट्रनिर्माणासाठीचे आमंत्रणपत्र आहे. हे विकसित भारताच्या उभारणीला गती देणारे संकल्पपत्र आहे. तुमच्यापैकी अनेक जण देशाची सुरक्षा अधिक मजबूत करतील, आपल्या शिक्षण आणि आरोग्यसेवा व्यवस्थेला अधिक सक्षम करतील. काही युवक आर्थिक सेवा आणि ऊर्जा सुरक्षेला बळकटी देतील, तर काही युवक आपल्या सरकारी कंपन्यांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतील. मी आपणा सर्व युवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो.अलीकडच्या काळात रोजगार मेळावा ही एक संस्था म्हणून विकसित झाली असून, या माध्यमातून लाखो तरुणांना विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्तीपत्रे मिळाली आहेत: पंतप्रधान
January 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 18व्या रोजगार मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, 2026 हे वर्ष नागरिकांच्या जीवनात नवे आनंद घेऊन सुरू झाले असून, त्याच वेळी नागरिकांना त्यांच्या घटनात्मक कर्तव्यांशी जोडणारेही ठरत आहे. हा काळ प्रजासत्ताकाच्या भव्य उत्सवाशी संबंधित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.Our relationship carries the permanence of platinum and the shine of silver: PM Modi at India-Germany CEOs Forum
January 12th, 01:35 pm
Addressing the India-Germany CEOs Forum, PM Modi remarked that the partnership between the two countries is a seamless one, built on shared values and mutual trust. The PM highlighted several important decisions taken, such as deeper cooperation in strategic sectors, critical and emerging technologies, and AI. He invited German precision and innovation to connect with India’s scale and speed.India and Russia are embarking on a new journey of co-innovation, co-production, & co-creation: PM Modi says during the India–Russia Business Forum
December 05th, 03:45 pm
In his address at the India–Russia Business Forum, PM Modi conveyed deep gratitude to his friend President Putin for joining the forum. He noted that discussions have commenced on a Free Trade Agreement between India and the Eurasian Economic Union. He remarked that meaningful discussions have taken place over the past two days and expressed his happiness that all areas of India–Russia cooperation were represented.रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत झालेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 05th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष माननीय व्लादिमीर पुतिन यांच्यासमवेत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या बैठकीला संबोधित केले. पंतप्रधानांनी माननीय राष्ट्राध्यक्ष पुतीन, भारत आणि परदेशातील नेते आणि सर्व मान्यवर पाहुण्यांना अभिवादन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन आपल्यासोबत मोठे शिष्टमंडळ घेऊन आले असल्याने भारत-रशिया व्यवसाय मंच हा त्यांच्या महत्त्वपूर्ण पुढाकाराचे द्योतक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी बैठकीत सहभागी होत असलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत त्यांच्यामध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी आपले मित्र राष्ट्रपती पुतीन यांचे या मंचाच्या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि त्यांचे मोलाचे विचार मांडल्याबद्दल मनापासून आभार मानले. व्यवसायासाठी सुलभ आणि खात्रीलायक अशी यंत्रणा तयार केली जात असल्याचे स्पष्ट करत त्यांनी भारत आणि युरेशियन आर्थिक संघ यांच्यात मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू झाल्याचे नमूद केले.नवी दिल्लीत एनडीटीव्ही वर्ल्ड समिट 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 17th, 11:09 pm
श्रीलंकेच्या पंतप्रधान महामहीम हरिणी अमरसूर्या महोदया, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान, माझे मित्र टोनी ऍबट महोदय, यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक महोदय, मान्यवर अतिथी, स्त्री-पुरुषहो नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2025 ला केले संबोधित
October 17th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2025 ला संबोधित केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद उत्सवाच्या वातावरणात आयोजित केली जात आहे. त्यांनी सत्राची संकल्पना अजेय भारत ची प्रशंसा केली आणि ते खरोखरच समर्पक असल्याचे नमूद केले, कारण आज भारत थांबण्याच्या मनःस्थितीत नाही. पंतप्रधान म्हणाले की भारत थांबणार नाही किंवा वेग कमीही करणार नाही, 140 कोटी भारतीय पूर्ण गतीने एकत्रितपणे पुढील वाटचाल करत आहेत.ओडिशातील झारसुगुडा येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
September 27th, 11:45 am
येथे काही तरुण बांधव अनेक कलाकृती घेऊन आलेले आहेत. ओडिशातील कला प्रेम जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. आपण दिलेली ही भेट मी आदरपूर्वक स्वीकारतो. माझे एसपीजी सहकारी या सर्व कलाकृती आपल्याकडून गोळा करतील. जर तुम्ही मागे तुमचे नाव व पत्ता लिहून दिलात, तर माझ्याकडून तुम्हाला पत्र अवश्य मिळेल. मागे एक लहान मूलही कलाकृती घेऊन उभे आहे, त्याचे हात दुखत असतील, कृपया त्याचीही मदत करा आणि वस्तू गोळा करून घ्या. मी या स्नेहपूर्ण भेटीसाठी आणि या कलाकृती भेट देणाऱ्या सर्व युवक-युवती व बालकांचे मनःपूर्वक आभार मानतो.ओदिशात झारसुगुडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 60,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
September 27th, 11:30 am
सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ओदिशातील जनतेने त्यावेळी विकसित ओदिशा या ध्येयाने पुढे जाण्याचा दृढ संकल्प केला होता. आज केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ओदिशा वेगाने प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असल्याचे त्यांनी समाधानाने नमूद केले. पंतप्रधानांनी ओदिशा तसेच देशाच्या विकासासाठी हजारो कोटींच्या विविध प्रकल्पांची सुरुवात झाल्याची घोषणा केली. या प्रसंगी त्यांनी बीएसएनएलच्या स्वदेशी 4G सेवांचा शुभारंभ करत बीएसएनएलचा नवा अवतार जनतेसमोर सादर केला. याशिवाय, देशभरातील आयआयटी संस्थांच्या विस्तारालाही आज औपचारिक सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. ओदिशामध्ये शिक्षण, कौशल्य विकास आणि संपर्क सुविधा यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. बेरहमपूर ते सुरत या मार्गावर धावणाऱ्या आधुनिक अमृत भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवून त्यांनी जनतेसाठी मोठी सोय उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, गुजरात मधील सुरत येथून दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीचा पंतप्रधानांनी गौरवपूर्वक उल्लेख केला. या सर्व विकास उपक्रमांबद्दल ओदिशातील जनतेचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.केंद्रीय मंत्रिमंडळाची ओडिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेशातील 4600 कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर उत्पादन एकाशांना मंजुरी
August 12th, 03:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत (आय एस एम) आणखी चार सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली.पंतप्रधानांचा 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांचा दौरा
July 17th, 11:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बिहारमधील मोतीहारी इथे सकाळी सुमारे 11.30 वाजता राज्यातल्या 7,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमात त्यांचे भाषणही होणार आहे.रोजगार मेळाव्यात 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
July 12th, 11:30 am
केंद्र सरकारी आस्थापनांमध्ये तरुणाईला कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याचा आमचा उपक्रम सातत्याने सुरू आहे. आणि आमची ओळखसुद्धा अशीच आहे – ना कागद ना खर्च! (शिफारस किंवा लाचेशिवाय निव्वळ गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारे नोकऱ्या देणे). आज 51 हजारांहून अधिक तरुण-तरुणींना नियुक्तीपत्रे दिली गेली आहेत. अशा रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुण-तरुणींना केंद्र सरकारमध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या आहेत. ही तरुणाई आता राष्ट्रनिर्मितीत मोठी भूमिका बजावत आहे. आजही आपल्यापैकी अनेकांनी भारतीय रेल्वेमध्ये आपले कार्यभार स्वीकारले आहेत. काही मित्र आता देशाच्या सुरक्षेचे रक्षक बनणार आहेत. टपाल विभागात नियुक्त झालेले मित्र गावागावात सरकारच्या सुविधा (योजना) पोहोचवतील. काहीजण ‘हेल्थ फॉर ऑल’ (सर्वांसाठी आरोग्य) या अभियानाचे शिलेदार असतील. अनेक युवक-युवती आर्थिक समावेशनाच्या इंजिनाला अधिक वेग देतील आणि बरेचसे युवक-युवती भारताच्या औद्योगिक विकासाला नवीन चालना देतील. आपले विभाग वेगवेगळे असले, पदे वेगवेगळी असली, तरी ध्येय एकच आहे. आणि ते ध्येय आपल्याला वारंवार लक्षात ठेवायचे आहे –‘राष्ट्रसेवा’! सूत्र एकच – ‘नागरिक प्रथम, Citizen First!’ आपल्याला देशवासियांच्या सेवेसाठी एक मोठे व्यासपीठ लाभले आहे. जीवनाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर मिळालेल्या या मोठ्या यशाबद्दल मी आपणा सर्व तरुणाईचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या नव्या प्रवासासाठी माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याला केले संबोधित
July 12th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याला संबोधित केले, यावेळी त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमधील 51,000 हून अधिक नवनियुक्त तरुणांना नियुक्ती पत्रेही वितरित केली. आज या युवा वर्गाची भारत सरकारच्या विविध विभागांमधील नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात होत असल्याचे त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. विविध विभागांमधील आपल्या सेवेची सुरुवात करणाऱ्या युवा उमेदवारांचे त्यांनी अभिनंदनही केले. या सर्वांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी राष्ट्रसेवा हेच त्यांचे परस्पर समान उद्दिष्ट आहे, आणि ते नागरिक प्रथम या तत्त्वावर आधारलेले आहे ही बाबही त्यांनी नमूद केली.