The resolution of a 'Viksit Bharat' will definitely be fulfilled: PM Modi in Mann Ki Baat
December 28th, 11:30 am
In the year’s final Mann Ki Baat episode, PM Modi said that in 2025, India made its mark in national security, sports, science laboratories and global platforms. He expressed hope that the country is ready to move forward in 2026 with fresh resolutions. The PM also highlighted youth-centric initiatives such as the Viksit Bharat Young Leaders Dialogue, Quiz competition, Smart India Hackathon 2025 and Fit India Movement.Assam has picked up a new momentum of development: PM Modi at the foundation stone laying of Ammonia-Urea Fertilizer Project in Namrup
December 21st, 04:25 pm
In a major boost to the agricultural sector, PM Modi laid the foundation stone of Ammonia-Urea Fertilizer Project at Namrup in Assam. He highlighted the start of new industries, the creation of modern infrastructure, semiconductor manufacturing, new opportunities in agriculture, the advancement of tea gardens and their workers as well as the growing potential of tourism in Assam. The PM reiterated his commitment to preserving Assam’s identity and culture.PM Modi lays foundation stone of Ammonia-Urea Fertilizer Project of Assam Valley Fertilizer and Chemical Company Limited at Namrup, Assam
December 21st, 12:00 pm
In a major boost to the agricultural sector, PM Modi laid the foundation stone of Ammonia-Urea Fertilizer Project at Namrup in Assam. He highlighted the start of new industries, the creation of modern infrastructure, semiconductor manufacturing, new opportunities in agriculture, the advancement of tea gardens and their workers as well as the growing potential of tourism in Assam. The PM reiterated his commitment to preserving Assam’s identity and culture.हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 06th, 08:14 pm
येथे हिंदुस्तान टाइम्स शिखर परिषदेत देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आयोजकांचे आणि ज्यांनी आपले विचार मांडले त्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. थोड्याच वेळापूर्वी शोभना जींनी दोन मुद्दे मांडले, जे मी विशेष लक्षात घेतले आहेत. एक म्हणजे त्यांनी सांगितले की मागच्या वेळी मोदीजी आले होते, तेव्हा त्यांनी एक सूचना दिली होती. या देशात माध्यम संस्थांनी काय काम करावे, हे सांगण्याचे धैर्य कोणीही करू शकत नाही. पण मी ते केले होते, आणि मला आनंद आहे की शोभनाजी आणि त्यांच्या टीमने ते काम मोठ्या आवडीने केले. आणि देशाला – मी आत्ताच प्रदर्शन पाहून आलो – मी सर्वांना विनंती करतो की प्रदर्शन नक्की पाहा. या छायाचित्रकार सहकाऱ्यांनी त्या क्षणांना असे टिपले आहे की ते क्षण अमर झाले आहेत. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आणि तीही मी ज्या शब्दांत समजलो, त्यांनी म्हटले की तुम्ही पुढेही… त्या असेही म्हणू शकल्या असत्या की तुम्ही पुढेही देशाची सेवा करत राहा, पण हिंदुस्तान टाइम्सने असे म्हटले की तुम्ही पुढेही अशीच सेवा करत राहा, यासाठी मी विशेष आभार व्यक्त करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला केले संबोधित
December 06th, 08:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला संबोधित केले. त्यांनी संमेलनात उपस्थित असलेल्या देशातील आणि परदेशातील अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीची दखलपूर्ण नोंद घेतली. त्यांनी आयोजकांना तसेच या परिषदेत आपले विचार मांडलेल्या सर्वांना अभिनंदनपर शुभेच्छाही दिल्या. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दोन मुद्द्यांची आपण काळजीपूर्वक नोंद घेतली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. त्यांनी आपल्या मागील भेटीचा संदर्भ दिला, त्यावेळी आपण त्यांना माध्यम समुहांतर्फे क्वचितच हाती घेतल्या जाणार्या गोष्टीबद्दल सुचवले होते याची आठवण त्यांनी करून दिली, आणि या समुहाने ते केले, असेही त्यांनी नमूद केले. शोभना आणि त्यांच्या चमूने उत्साहाने आपली सूचना पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जेव्हा आपण प्रदर्शनाला भेट दिली, तेव्हा छायाचित्रकारांनी क्षण अशा पद्धतीने टिपले की ते अमर झाल्यासारखे वाटले असे ते म्हणाले. आपण ते प्रदर्शन पाहिले असून, सर्वांनी ते पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दुसर्या मुद्याच्या संदर्भानेही त्यांनी भाष्य केले. त्यांचे म्हणणे म्हणजे केवळ आपण देशाची सेवा करत राहावी अशी इच्छा नाही, तर हिंदुस्तान टाईम्सनेच आपण त्याच पद्धतीने सेवा करत राहावे, असे म्हटले आहे, असे म्हणत याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञताही व्यक्त केली.भूतानचे राजे (चौथे) यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी मजकूर
November 11th, 12:00 pm
भारत आणि भूतान यांच्यात शतकानुशतकांपासून भावनिक आणि सांस्कृतिक बंध रुजलेले आहेत. म्हणूनच, या महत्त्वाच्या प्रसंगी सहभागी होण्यासाठी भारत आणि मी स्वतः देखील वचनबद्ध आहोत.भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
November 11th, 11:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमधील थिंपू येथील चांगलीमेथांग सेलिब्रेशन ग्राउंड येथे भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांना शुभेच्छा दिल्या. राजघराण्यातील सन्माननीय सदस्य, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि इतर उपस्थित मान्यवरांना त्यांनी आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या.प्रधानमंत्र्यांचा बिहारच्या ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ लाभार्थींशी संवाद – मराठी अनुवाद
September 26th, 03:00 pm
आता मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या निवडलेल्या लाभार्थींनी आपले अनुभव सांगायचे आहेत. मी सर्वप्रथम पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रंजीता काजी दीदींना विनंती करतो की त्या आपला अनुभव सांगावेत.PM Modi interacts with beneficiaries of Bihar's Mukhyamantri Mahila Rojgar Yojana
September 26th, 02:49 pm
While interacting with beneficiaries of Bihar’s Mukhyamantri Mahila Rojgar Yojana, PM Modi said that every initiative of the Central and State governments is aimed at women’s welfare and empowerment. Beneficiaries shared their success stories, showcasing the schemes’ impact. The PM urged women to continue sharing such inspirational accounts of how government programs are bringing positive change in society.राजस्थानमधील बांसवाडा येथे विकासकामांच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
September 25th, 02:32 pm
आपणा सर्वांना जय गुरु! राम-राम! राज्यपाल श्रीमान हरिभाऊ बागडे जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा जी, माजी मुख्यमंत्री भगिनी वसुंधराराजे जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशी जी, आमच्यासोबत जोधपूरहून उपस्थित असणारे बंधू गजेंद्र सिंह शेखावत जी आणि अश्विनी वैष्णव जी, बीकानेरहून आमच्या सोबत असणारे अर्जुन राम मेघवाल जी, येथे उपस्थित उप मुख्यमंत्री प्रेम चंद बैरवा जी, दिया कुमारी जी, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मदन राठौड़ जी, राजस्थान सरकार मधले मंत्री, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानमधील बंसवाडा येथे 1,22,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
September 25th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बंसवाडा येथे 1,22,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी बंसवाडा येथील त्रिपुरा सुंदरी मातेच्या पवित्र भूमीला भेट देण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे ते यावेळी म्हणाले. कंथाल आणि वागदची गंगा म्हणून पूजनीय असलेल्या माँ माहीचे दर्शन घेण्याची संधी आपल्याला मिळाली, असे त्यांनी सांगितले. माहीचे पाणी भारतातील आदिवासी समुदायांच्या लवचिकतेचे आणि संघर्षाचे प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी महायोगी गोविंद गुरुजी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वावर प्रकाश टाकला, ज्यांचा वारसा आजही प्रतिध्वनित होत आहे, आणि माहीचे पवित्र पाणी त्या महान गाथेची साक्ष देत आहे. मोदी यांनी माता त्रिपुरा सुंदरी आणि माता माही यांना आदरांजली वाहिली आणि भक्ती आणि शौर्याच्या भूमीतून महाराणा प्रताप आणि राजा बन्सिया भिल यांच्या प्रति आदर भाव व्यक्त केला.अरुणाचल प्रदेशात इटानगर इथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 22nd, 11:36 am
हेलिपॅडवरुन इथं मैदानापर्यंत येणे, वाटेत इतक्या सगळ्या लोकांना भेटणे, लहान-लहान मुला-मुलींच्या हातात असलेला तिरंगा; अरुणाचलमधल्या या स्वागताने माझे ह्रदय आनंदाने, अभिमानाने भरुन आले आहे! आणि हे स्वागत इतके भव्य होते की मला इथे पोहोचायला उशीर झाला. उशीरा आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. अरुणाचलची ही भूमी सुर्योदयाची धरती आहेच; देशभक्तीच्या लाटेचीही धरती आहे. तिरंग्यावरचा पहिला रंग जसा केशरी आहे; तसाच अरुणाचलचा पहिला रंगदेखील केशरी आहे. इथला प्रत्येक माणूस शौर्याचे प्रतीक आहे, साधेपणाचे प्रतीक आहे. मी अरुणाचलमध्ये बरेच वेळा आलो आहे. राजकारणात सत्तेच्या प्रवाहात नव्हतो, तेव्हाही इथे आलो आहे; म्हणूनच इथल्या खूप साऱ्या आठवणी आहेत. त्या आठवून मलाही आनंद होतो. तुमच्या सगळ्यांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी एक आठवण असते. तुमचं इतकं प्रेम मला लाभलं; जीवनात यासारखं कोणतंही मोठं सुख नाही असे मी मानतो. तवांग मठ ते नमसाईतल्या सुवर्ण पगोडापर्यंतची ही अरुणाचलची भूमी शांती आणि संस्कृती यांचा संगम आहे. भारत मातेचा अभिमान आहे, या पुण्यभूमीला माझा सश्रद्ध नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
September 22nd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी डोनयी पोलो यांना आदरांजली वाहिली आणि त्यांचे सर्वांना आशीर्वाद मिळावेत, अशी प्रार्थना केली.मणिपूरमधल्या चुराचांदपूर येथे विविध विकासकामांची पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
September 13th, 12:45 pm
व्यासपीठावर उपस्थित राज्यपाल श्रीमान अजय भल्ला जी, राज्य प्रशासनाचा अधिकारी वर्ग आणि या कार्यक्रमाला उपस्थित मणिपूरच्या माझ्या बंधू-भगिनींनो,आपणा सर्वांना नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मणिपूरमधील चुराचांदपूर इथे 7,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी
September 13th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरमधील चुराचांदपूर इथे 7,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. मणिपूरची भूमी धैर्य आणि दृढनिश्चयाची भूमी असून, मणिपूरच्या डोंगरदऱ्या म्हणजे निसर्गाने दिलेली अनमोल देणगी असल्याचे ते म्हणाले. या डोंगरदऱ्या इथल्या जनतेच्या अविरत मेहनतीचे प्रतीक आहेत, असेही ते म्हणाले. मणिपूरच्या लोकांच्या भावनेला त्यांनी सलाम केला, तसेच या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानत, त्यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.मिझोराममध्ये विकासकार्यांची पायाभरणी आणि उदघाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 13th, 10:30 am
मिझोरामचे राज्यपाल व्ही. के. सिंह जी, मुख्यमंत्री श्री लालदुहोमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री अश्विनी वैष्णव जी, मिझोराम सरकारमधले मंत्रिगण, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी, मिझोरामच्या शानदार जनतेला शुभेच्छा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरममधील आयझॉल येथे 9,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चांच्या विकासकामांचे केले भूमिपूजन आणि उद्घाटन
September 13th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिझोरममधील आयझॉल येथे 9,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, ऊर्जा, क्रीडा यासह अनेक क्षेत्रांना गती देतील. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी निळ्या पर्वतांच्या सुंदर भूमीचे रक्षण करणाऱ्या सर्वोच्च देव पाथियनला नमन केले. मिझोरमच्या लेंगपुई विमानतळावर उपस्थित असूनही खराब हवामानामुळे ते आयझॉल येथे पोहचू शकले नाहीत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तरीही या माध्यमातून लोकांचे प्रेम आणि आपुलकी अनुभवू शकत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधान 6 ऑगस्ट रोजी कर्तव्य भवनचे करणार उद्घाटन
August 04th, 05:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12:15 च्या सुमारास दिल्लीतील कर्तव्य पथ येथील कर्तव्य भवनला भेट देतील आणि त्याचे उद्घाटन करतील. त्यानंतर, पंतप्रधान संध्याकाळी सुमारे 6:30 वाजता कर्तव्य पथावर जाहीर कार्यक्रमाला संबोधित करतील.नवीकरणीय ऊर्जा क्षमता उभारण्याच्या उद्देशाने एनटीपीसी नवीकरणीय ऊर्जा कंपनी तसेच तिचे इतर संयुक्त उपक्रम (जेव्हीज)/उपकंपन्या यांच्यातील गुंतवणुकीसाठी वाढीव अधिकार प्रदान करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
July 16th, 02:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक संसदीय समितीने महारत्न दर्जाच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उद्योगांना (सीपीएसइज)अधिकार प्रदान करण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाला (एनटीपीसी) वाढीव अधिकार प्रदान करण्यास मंजुरी दिली. या मंजुरीमुळे एनटीपीसीला त्यांची उपकंपनी असलेली एनटीपीसी हरित ऊर्जा (एनजीईएल) कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यायोगे एनजीईएलला एनटीपीसी नवीकरणीय ऊर्जा (एनआरईएल) या कंपनीत तसेच तिच्या इतर संयुक्त उपक्रमांमध्ये/उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी यापूर्वी मंजूर असलेल्या 7,500 कोटी रुपयांच्या विहित मर्यादेपलीकडे जाऊन आता 20,000 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल आणि नवीकरणीय ऊर्जा (आरई)क्षमतेत भर घालण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयामुळे देशाला वर्ष 2032 पर्यंत 60 गिगावॉट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट गाठण्यात मदत होईल.2025-26 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) मंत्रिमंडळाने दिली मान्यता
May 28th, 03:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 2025-26 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या 14 वाणांसाठी किमान आधारभूत किमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.