‘सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ (आरईपीएम) च्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
November 26th, 04:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 'सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेटस् (आरईपीएम म्हणजेच - निओडिमियम, लोखंड आणि बोरोन यांच्या धातुमिश्रणापासून बनवले जाणारे सर्वात मजबूत प्रकारचे स्थायी चुंबक) उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमाचे उद्दिष्ट भारतात प्रतिवर्षी 6,000 मेट्रिक टन (एमटीपीए) एकात्मिक रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट (आरईपीएम) उत्पादन क्षमता निर्माण करणे हे आहे. यामुळे भारताची आत्मनिर्भरता वाढवून जागतिक आरईपीएम बाजारपेठेत देशाला एक महत्त्वपूर्ण स्थान मिळेल.पंतप्रधान 30-31ऑक्टोबर रोजी गुजरातचा दौरा करणार
October 29th, 10:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30-31 ऑक्टोबर रोजी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान, 30 ऑक्टोबर रोजी, केवडिया येथील एकता नगर येथे जाणार असून सायंकाळी 5:15 च्या सुमाराला ते ई-बसना हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते एकता नगर येथे सायंकाळी 6:30 च्या सुमाराला 1,140 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.BJP’s connection with Delhi goes back to the Jana Sangh days and is built on trust and commitment to the city: PM Modi
September 29th, 08:40 pm
Inaugurating the Delhi BJP’s new office, PM Modi said, “On this auspicious occasion of Navratri, Delhi BJP has received its new office today. It is a moment filled with new dreams and fresh resolutions.” He added, “For us, every BJP office is no less than a shrine, no less than a temple. A BJP office is not merely a building. It is a strong link that connects the Party with the grassroots and with people’s aspirations.”PM Modi inaugurates Delhi BJP’s new office at Deendayal Upadhyaya Marg
September 29th, 05:00 pm
Inaugurating the Delhi BJP’s new office, PM Modi said, “On this auspicious occasion of Navratri, Delhi BJP has received its new office today. It is a moment filled with new dreams and fresh resolutions.” He added, “For us, every BJP office is no less than a shrine, no less than a temple. A BJP office is not merely a building. It is a strong link that connects the Party with the grassroots and with people’s aspirations.”फलनिष्पत्ती : मॉरीशसच्या पंतप्रधानांचा भारत दौरा
September 11th, 02:10 pm
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि मॉरीशस प्रजासत्ताकाचे तृतीयक शिक्षण, विज्ञान आणि संशोधन मंत्रालय यांच्यादरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेले निवेदन
September 11th, 12:30 pm
आपली संस्कृती आणि संस्कार, अनेक शतकांपूर्वीपासून भारतातून मॉरिशसमध्ये पोहोचले आहेत आणि तिथल्या जीवनाच्या प्रवाहात स्थायिक झाले आहेत. काशीमधल्या गंगेच्या अखंड, अविरत प्रवाहाप्रमाणे, भारतीय संस्कृतीचा अखंड प्रवाह मॉरिशसला समृद्ध करत आहे. आणि आज,आपण काशीमध्ये मॉरिशसमधील मित्रांचे, स्नेहींचे स्वागत करत आहोत, ही केवळ औपचारिकता नाही; तर एक आत्मिक मिलन आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो की, भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नाहीत, तर एक कुटुंब आहे.गुजरातमधील हंसलपूर येथे पर्यावरणपूरक वाहतूक उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
August 26th, 11:00 am
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, भारतातील जपानचे राजदूत केइची ओनो सान, सुजुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुजुकी सान, मारुती सुजुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हिसाशी ताकेउची सान, अध्यक्ष आर. सी. भार्गव, हंसलपूर प्रकल्पातील सर्व कर्मचारी आणि उपस्थित मान्यवर.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील हंसलपूर येथे हरित गतिशीलता उपक्रमांचे उद्घाटन
August 26th, 10:30 am
हरित ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने मोठी प्रगती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील हंसलपूर येथे हरित गतिशीलता उपक्रमांचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात भारताच्या 'मेक इन इंडिया' प्रवासात एक नवीन अध्याय जोडला जात आहे. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या सामायिक ध्येयाच्या दिशेने ही एक महत्त्वपूर्ण झेप आहे असे ते म्हणाले. आजपासून भारतात उत्पादित होणारी इलेक्ट्रिक वाहने 100 देशांमध्ये निर्यात केली जाणार आहेत यावर मोदी यांनी भर दिला. देशात हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड उत्पादन सुरू झाल्याची घोषणा त्यांनी केली. आजचा दिवस भारत आणि जपानमधील मैत्रीला एक नवीन आयाम जोडत आहे यावर भर देत, पंतप्रधानांनी भारतातील सर्व नागरिकांचे , जपानचे आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे मनापासून अभिनंदन केले.गुजरातमधील अहमदाबाद येथे विविध विकास योजनांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 25th, 06:42 pm
तुम्ही सर्वांनी आज छान वातावरण निर्मिती केली आहे. अनेक वेळा माझ्या मनात विचार येतो की मी किती नशीबवान आहे, ज्यामुळे मला लाखो लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभत आहेत. मी तुम्हा सर्वांचे कितीही आभार मानले तरीही ते कमीच आहेत. पहा तिकडे कोणी छोटा नरेंद्र उभा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद, गुजरात येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
August 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, संपूर्ण देश सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाने भरलेला आहे. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आज गुजरातच्या प्रगतीशी जोडलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे. त्यांनी सांगितले की, अनेक प्रकल्प जनतेच्या चरणी समर्पित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे आणि या विकास उपक्रमांसाठी त्यांनी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन केले.पंतप्रधान 25-26 ऑगस्ट रोजी गुजरातच्या दौऱ्यावर
August 24th, 01:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 आणि 26 ऑगस्ट रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता ते अहमदाबादमधील खोडलधाम मैदानावर 5,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील. या वेळी ते एका जाहीर सभेलाही संबोधित करतील.इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
August 23rd, 10:10 pm
येथे जागतिक परिस्थिती, भू-अर्थशास्त्र यावर सविस्तर चर्चा झाली आहे आणि जेव्हा आपण जागतिक संदर्भात पाहतो तेव्हा आपल्याला भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद लक्षात येते. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. आपण लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. तज्ज्ञ म्हणत आहेत की जागतिक विकासात भारताचे योगदान लवकरच सुमारे 20 टक्के असणार आहे. ही वाढ, ही लवचिकता, जी आपण भारताच्या अर्थव्यवस्थेत पाहत आहोत, ती गेल्या दशकात भारताने मिळवलेल्या स्थूल-आर्थिक स्थिरतेमुळे आहे. आज आपली राजकोषीय तूट 4.4% पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. आणि हे असे घडत आहे जेव्हा आपण कोविडच्या इतक्या मोठ्या संकटाचा सामना केला आहे. आज आपल्या कंपन्या भांडवली बाजारातून विक्रमी निधी उभारत आहेत. आज आपल्या बँका पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत. महागाई खूप कमी आहे, व्याजदर कमी आहेत. आज आपली चालू खात्यातील तूट नियंत्रणात आहे. परकीय चलन साठा देखील खूप मजबूत आहे. इतकेच नाही तर दरमहा लाखो देशांतर्गत गुंतवणूकदार एस.आय.पी. द्वारे बाजारात हजारो कोटी रुपये गुंतवत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे आयोजित इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला केले संबोधित
August 23rd, 05:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड लीडर्स फोरमसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागतही केले. हा उपक्रम अतिशय योग्य वेळी आयोजित केला असल्याचेही त्यांनी नमूद केले, आणि त्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आयोजकांची प्रशंसाही केली. मागच्या आठवड्यातच आपण लाल किल्ल्यावरून पुढच्या पिढीच्या सुधारणांबद्दल (नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स) भाषण केले होते आणि हा मंच त्याच भावनेला अधिक बळ देत आहे, असे त्यांनी सांगितले.For the benefits of central schemes to reach Bengal, a BJP government is essential: PM Modi in Kolkata
August 22nd, 06:00 pm
PM Modi addressed an overflowing crowd gathered at a public meeting in Kolkata where he declared that Bengal’s rise is essential for India’s rise. He firmly reassured, “The BJP government at the Centre has continuously supported Bengal’s growth. From highways to railways, Bengal has received three times more funds than under UPA. But the biggest challenge is that funds sent from Delhi are looted by the state government and not spent on people’s welfare. Instead, they are siphoned off to TMC cadres,” he said.PM Modi’s Kolkata rally: Call for a Viksit Bangla, real ‘poriborton’ and end of TMC’s misrule!
August 22nd, 05:57 pm
PM Modi addressed an overflowing crowd gathered at a public meeting in Kolkata where he declared that Bengal’s rise is essential for India’s rise. He firmly reassured, “The BJP government at the Centre has continuously supported Bengal’s growth. From highways to railways, Bengal has received three times more funds than under UPA. But the biggest challenge is that funds sent from Delhi are looted by the state government and not spent on people’s welfare. Instead, they are siphoned off to TMC cadres,” he said.पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 22nd, 05:15 pm
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी शांतनु ठाकुर जी, रवनीत सिंह जी, सुकांता मुजुमदार जी, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते शुवेंदु अधिकारी जी, संसदेतील माझे सोबती शौमिक भट्टाचार्य जी, उपस्थित अन्य लोकप्रतिनिधी गण, बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 5,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
August 22nd, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 5,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, पश्चिम बंगालच्या विकासाला गती देण्याची संधी त्यांना पुन्हा एकदा मिळाली आहे. नोआपारा ते जय हिंद विमानतळ या कोलकाता मेट्रो प्रवासाचा अनुभव सामायिक करताना मोदी म्हणाले की, या प्रवासात त्यांनी अनेक सहकाऱ्यांशी संवाद साधला आणि कोलकात्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी सहा पदरी उन्नत कोना एक्सप्रेसवेची पायाभरणी देखील केली. या हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी त्यांनी कोलकात्याच्या जनतेचे आणि पश्चिम बंगालच्या सर्व नागरिकांचे हार्दिक अभिनंदन केले.We are making Delhi a model of growth that reflects the spirit of a developing India: PM Modi
August 17th, 12:45 pm
During the inauguration of road projects worth ₹11,000 crore in Delhi, PM Modi said that the Dwarka Expressway and UER-II will enhance convenience for the people of Delhi and the entire NCR. He highlighted that a key feature of the UER is its role in freeing Delhi from garbage mounds, with millions of tonnes of waste material used in its construction. The PM also urged that “Vocal for Local” should become a life mantra for every citizen.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले 11,000 कोटी रुपयांच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन
August 17th, 12:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील रोहिणी येथे सुमारे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी या ठिकाणांच्या वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाकडे लक्ष वेधले. या द्रुतगती मार्गाचे नाव द्वारका आहे आणि हा कार्यक्रम रोहिणी येथे आयोजित केला जात आहे. पंतप्रधानांनी जन्माष्टमीच्या उत्सवाच्या भावनेवर प्रकाश टाकला आणि आपण स्वतः द्वारकाधीशांच्या भूमीतून आलो आहेत या योगायोगाचा त्यांनी उल्लेख केला. संपूर्ण वातावरण भगवान श्रीकृष्णाच्या भावनेने ओथंबून गेले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधानांनी दिल्लीत स्वच्छ तसेच हरित शहरी वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी विजेवर चालणाऱ्या बसेस हिरवा झेंडा दाखवून केल्या रवाना
June 05th, 12:46 pm
शाश्वत विकास आणि स्वच्छ शहरी वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकारने सुरु केलेल्या उपक्रमांतर्गत विजेवर चालणाऱ्या (इलेक्ट्रिक)बसेसना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.