आंध्र प्रदेशातील अमरावती येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि प्रकल्पांचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 02nd, 03:45 pm
आंध्र प्रदेशचे राज्यपाल सैयद अब्दुल नजीर जी, मुख्यमंत्री आणि माझे मित्र चंद्राबाबू नायडू जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी मंत्री, उत्साही उप-मुख्यमंत्री पवन कल्याण जी, राज्य सरकारचे मंत्री, सर्व खासदार आणि आमदार आणि आंध्र प्रदेशातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशात अमरावती येथे, 58,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकासकामांची केली पायाभरणी आणि उद्घाटन
May 02nd, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात अमरावती येथे 58,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले. अमरावतीच्या या पवित्र भूमीवर उभे राहून, आपल्याला केवळ एक शहर दिसत नाही, तर एक स्वप्न साकार होताना दिसत आहे—एक नवीन अमरावती, एक नवीन आंध्र, अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. अमरावती ही एक अशी भूमी आहे जिथे परंपरा आणि प्रगती या परस्परांसोबत वाटचाल करतात, बौद्ध वारशाची शांतता आणि एका विकसित भारताची ऊर्जा या दोहोंचा अंगिकार केला जातो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे, ते प्रकल्प केवळ काँक्रीटच्या संरचना नाहीत, तर आंध्र प्रदेशच्या आकांक्षा आणि भारताच्या विकासाच्या दृष्टीकोनाचा मजबूत पाया आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान वीरभद्र, भगवान अमरलिंगेश्वर आणि तिरुपती बालाजी यांना वंदन करून पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनाही शुभेच्छा दिल्या.उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे विविध प्रकल्पांचा शिलान्यास आणि नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 11th, 11:00 am
व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, उपस्थित असलेले मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, बनास दुग्धालयाचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी आणि येथे इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आलेले माझे सर्व कुटुंबिय,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
April 11th, 10:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. काशीसोबत आपले गहीरे नाते असल्याचे ते म्हणाले. इथले लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखेच आहेत आणि त्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपण त्यांचा अत्यंत आभारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लोकांनी दिलेल्या याच प्रेम आणि पाठबळामुळे आपण धन्य झालो असल्याचेही त्यांनी नमूद केले. काशी आपली आहे आणि आपण काशीचे आहोत, असेही ते म्हणाले. उद्या हनुमान जन्मोत्सवाचा शुभ प्रसंग आहे, याचा उल्लेख करत काशीमध्ये संकट मोचन महाराजांच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळणे, हे आपले भाग्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हनुमान जन्मोत्सवापूर्वी, काशीतील नागरिक विकासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 20th, 11:45 am
दोन दिवस आधीच आपण सगळ्यांनी विश्वकर्मा पुजेचा सण साजरा केला. आणि आज वर्ध्याच्या पावन भूमीवर आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या यशाचा उत्सव साजरा करत आहोत. आजचा दिवस यासाठीही विशेष आहे कारण 1932 मध्ये याच दिवशी महात्मा गांधी यांनी अस्पृश्यतेविरोधात मोहीमेला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याचा हा उत्सव, विनोबा भावे यांच्या साधनेचे ठिकाण, महात्मा गांधी यांची कर्मभूमी, वर्ध्याची ही भूमी, हे यश आणि प्रेरणेचा असा काही संगम आहे, जो विकसित भारताच्या आपल्या संकल्पाला नवी ऊर्जा देईल. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आपण कष्टातून समृद्धीचा, या कौशल्याने एक चांगल्या उद्याचा जो संकल्प केला आहे, वर्ध्यातील बापूंची प्रेरणा या संकल्पांना सिद्धीस नेण्याचे माध्यम ठरतील. मी या योजनेशी संबंधित सर्व लोकांचे, देशभरातील सर्व लाभार्थ्यांचे या निमित्ताने अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला केले संबोधित
September 20th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास’ योजना आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू केली. त्यांनी पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कर्जे जारी केली आणि पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत वर्षभरातील प्रगतीचे प्रतीक म्हणून समर्पित तिकिटाचे अनावरणदेखील केले. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपरेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणी केली.यावेळी आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली.गुजरातमध्ये अहमदाबाद येथील विकासकार्यांची पायाभरणी/उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 12th, 10:00 am
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रतजी, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेलजी, संसदेतील माझे सहकारी आणि गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सी.आर.पाटील आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले सर्व राज्यपाल, आदरणीय मुख्यमंत्रीगण, संसद सदस्य, आमदार, मंत्रीगण आणि मला माझ्यासमोर दिसत आहेत,ते 700 हून अधिक ठिकाणांहून तेथील खासदारांच्या नेतृत्वात, तेथील मंत्र्यांच्या नेतृत्वात लाखो लोक आज या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. कदाचित रेल्वेच्या इतिहासात एकाच वेळी भारताच्या कानाकोपऱ्यात इतका मोठा कार्यक्रम कधी झालेला नसेल. 100 वर्षांत पहिल्यांदाच असा कार्यक्रम होत असेल. या भव्य प्रमाणातील आयोजनासाठी मी रेल्वे विभागाचे देखील खूप खूप अभिनंदन करतो.गुजरातमध्ये अहमदाबाद येथे पंतप्रधानांच्या हस्ते 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण
March 12th, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये अहमदाबाद येथील समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या परिचालन नियंत्रण केंद्रात 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधा, जोडणी सुविधा आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांसह विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी आज 10 नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या सेवेची देखील सुरुवात केली.बिहारमध्ये औरंगाबाद येथे विविध प्रकल्पांची सुरुवात करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 02nd, 03:00 pm
बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरजी, मुख्यमंत्री नितीश कुमारजी तसेच येथे बसलेले सर्व ज्येष्ठ नेते, सर्वांची नावे मी घेत नाही. पण जुन्या सर्व सहकाऱ्यांशी आज भेट झाली आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्व मान्यवर येथे आला आहात त्यांचे, जनता जनार्दनाचे मी हार्दिक अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील औरंगाबाद येथे सुमारे 21,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी
March 02nd, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील औरंगाबाद येथे 21,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे आणि नमामि गंगे या क्षेत्रांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी एका छायाचित्र प्रदर्शनालाही भेट दिली.पंतप्रधानांनी गुजरातमधील केवडिया येथे आरोग्य वन, आरोग्य कुटीर, एकता मॉल आणि बाल पोषण उद्यानचे केले उद्घाटन
October 30th, 03:11 pm
आरोग्य वनात 17 एकर क्षेत्रात 380 विविध प्रजातींची 5 लाख रोपे आहेत. आरोग्य कुटीर येथे सांथीगिरी कल्याण केंद्र नावाची पारंपरिक उपचार सुविधा आहे, जी आयुर्वेद, सिद्ध, योग आणि पंचकर्म यावर आधारित आरोग्य सेवा पुरवेल.