India - Oman Joint Statement during the visit of Prime Minister of India, Shri Narendra Modi to Oman
December 18th, 05:28 pm
Prime Minister Narendra Modi visited Oman from 17–18 December 2025 at the invitation of Sultan Haitham bin Tarik, marking 70 years of diplomatic ties. The visit strengthened the India Oman strategic partnership with the signing of CEPA, key MoUs and adoption of a Joint Vision on Maritime Cooperation.“Maitri Parv” celebrates the friendship between India and Oman: PM Modi during community programme in Muscat
December 18th, 12:32 pm
While addressing a large gathering of members of the Indian community in Muscat, PM Modi remarked that co-existence and cooperation have been hallmarks of the Indian diaspora. He noted that over the last 11 years, India has witnessed transformational changes across perse fields. He reaffirmed India’s deep commitment to the welfare of the diaspora and invited students to participate in ISRO’s YUVIKA programme.पंतप्रधानांनी ओमानमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
December 18th, 12:31 pm
पंतप्रधानांनी आज मस्कतमध्ये भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाला संबोधित केले. या श्रोत्यांमध्ये विविध भारतीय शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे वर्ष ओमानमधील भारतीय शाळांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे, कारण यंदा या देशातील आपला 50 वा वर्धापनदिन त्या साजरा करत आहेत.वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेतील विशेष चर्चेमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 08th, 12:30 pm
मी आपले आणि सदनातील सर्व माननीय सदस्यांचे हार्दिक आभार मानतो, आपण या महत्त्वाच्या क्षणानिमित्त एक सामूहिक चर्चेचा निर्णय घेतला. ज्या मंत्राने, ज्या जयघोषाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा दिली होती, प्रेरणा दिली होती, त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला होता, त्या वंदे मातरमचे पुण्यस्मरण करणे, हे या सदनातील आपल्या सर्वांचे खूप मोठे भाग्य आहे. आणि आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की वंदे मातरमच्या 150 वर्षांनिमित्त या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार ठरत आहोत. एक असा कालखंड जो आपल्या समोर इतिहासातल्या अगणित घटना समोर घेऊन येतो. ही चर्चा सदनाची वचनबद्धता तर प्रकट करेलच त्याचसोबत आगामी पिढ्यांसाठीही, प्रत्येक पिढीसाठी शिकवण ठरू शकेल, जर आपण सर्वांनी मिळून याचा सदुपयोग केला तर.वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
December 08th, 12:00 pm
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या अत्यंत विशेष प्रसंगी, सामुहिक चर्चेचा मार्ग निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी सदनातील सर्व सन्माननीय सदस्यांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला उर्जा आणि प्रेरणा देणारा वंदे मातरम हा मंत्र आणि हे आवाहन आपण स्मरतो आहोत ही सभागृहातील सर्वांसाठी अत्यंत विशेष बाब आहे.आपल्या देशाला वंदे मातरमची ऐतिहासिक अशी 150 वी वर्षपूर्ती पाहायला मिळते आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की हा कालावधी आपल्यासमोर इतिहासातील असंख्य घटना उभ्या करतो.या चर्चेद्वारे सदनाची कटिबद्धता दर्शवण्यासोबतच जर सगळ्यांनी या चर्चेचा चांगला उपयोग करून घेतला तर ही चर्चा भविष्यातील पिढ्यांसाठी शिक्षणाचा स्त्रोत म्हणून देखील काम करू शकते यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन
December 05th, 02:00 pm
आज भारत आणि रशियाच्या तेविसाव्या शिखर परिषदेत राष्ट्रपती पुतीन यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, ज्यावेळी आमचे द्विपक्षीय संबंध अनेक ऐतिहासिक टप्प्यांदरम्यान वाटचाल करत आहेत. बरोबर 25 वर्षांपूर्वी राष्ट्रपती पुतीन यांनी आमच्या धोरणात्मक भागीदारीचा पाया घातला होता. 15 वर्षांपूर्वी 2010 मध्ये आमच्या भागीदारीला विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाला होता.PM Modi’s remarks during the joint press meet with Russian President Vladimir Putin
December 05th, 01:50 pm
PM Modi addressed the joint press meet with President Putin, highlighting the strong and time-tested India-Russia partnership. He said the relationship has remained steady like the Pole Star through global challenges. PM Modi announced new steps to boost economic cooperation, connectivity, energy security, cultural ties and people-to-people linkages. He reaffirmed India’s commitment to peace in Ukraine and emphasised the need for global unity in the fight against terrorism.गोव्यामधील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 28th, 03:35 pm
आज या पवित्र प्रसंगी मनामध्ये खोलवर शांतता भरली आहे. साधू-संतांच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर आपोआपच आध्यात्मिक अनुभव येत असतो. इथे विशाल संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांमुळे लक्षात येते की, या मठाची शतकांपासूनच प्राचीन जीवंत शक्ती आजही वृद्धिंगत होत आहे. आज या समारंभाला मला उपस्थित राहता आले, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. इथे येण्यापूर्वी मला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले. त्या शांत वातावरणाने या कार्यक्रमाच्या आध्यात्मिकतेला आणखी सखोलता प्राप्त झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधित
November 28th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी आपले मन गहन शांतीने भरले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. संतांच्या उपस्थितीत, त्यांच्या सोबत बसणे हा स्वतःच एक आध्यात्मिक अनुभव आहे, यावर त्यांनी भर दिला. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांमुळे या मठाची शतकानुशतके जुनी जिवंत शक्ती आणखी वाढली आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, आज या समारंभात लोकांमध्ये उपस्थित राहणे हे आपले भाग्य आहे. येथे येण्यापूर्वी आपल्याला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराला भेट देण्याचा सौभाग्य लाभले, असे त्यांनी सांगितले. तेथील शांतता आणि तिथल्या वातावरणामुळे या समारंभाची आध्यात्मिकता अधिक सखोल झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.उडुपी येथील श्रीकृष्ण मठातील लक्षकंठ गीता पारायण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 28th, 11:45 am
मी माझे भाषण सुरु करण्यापूर्वी — इथे काही मुलं चित्र काढून घेऊन आली आहेत. SPG चे लोक आणि स्थानिक पोलिस थोडी मदत करतील का, ती चित्रं गोळा करण्यासाठी? जर तुम्ही त्याच्या मागे तुमचा पत्ता लिहिला असेल, तर मी नक्कीच तुम्हाला आभारपत्र पाठवेन. ज्यांनी जे काही आणले असेल, ते देऊन टाका, ते गोळा करतील आणि मग तुम्ही निवांत बसू शकता. ही मुले इतकी मेहनत करतात, आणि कधी कधी, मीच त्यांच्या बाबतीत अन्याय करतो असं वाटतं, तेव्हा मला खूप वाईट वाटतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला केले संबोधित
November 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला संबोधित केले. भगवान श्रीकृष्णाचे दिव्य दर्शनाचे समाधान, श्रीमद् भगवद्गीतेच्या मंत्रांचा आध्यात्मिक अनुभव आणि इतक्या पूज्य संत आणि गुरूंची उपस्थिती, हे आपल्यासाठी एक परम भाग्य आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हे असंख्य आशीर्वादांची प्राप्ती करण्यासारखे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा'ला पंतप्रधानांनी केलेले भाषणv
November 25th, 04:40 pm
आजचा दिवस भारताच्या परंपरेचा एक अद्भुत संगम ठरला आहे. आज सकाळी मी रामायणाची नगरी अयोध्येत होतो आणि आता मी इथे गीतेची नगरी कुरुक्षेत्रात आलो आहे. आपण सर्व श्री गुरु तेग बहादुरजींच्या 350 व्या बलिदानदिनानिमित्त त्यांना वंदन करत आहोत. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व संतमहंतांना आणि उपस्थित मान्यवरांना आदरपूर्वक नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा'ला संबोधित केले
November 25th, 04:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा' निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, आजचा दिवस भारताच्या वारशाचा एक उल्लेखनीय संगम आहे. सकाळी ते रामायणाची नगरी असलेल्या अयोध्येत होते आणि आता ते गीतेची नगरी असलेल्या कुरुक्षेत्रात आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या हौतात्म्य दिनानिमित्त सर्वजण त्यांना आदरांजली वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी कार्यक्रमात संत आणि आदरणीय समुदायाच्या उपस्थितीची दखल घेतली आणि सर्वांना आदराने वंदन केले.जोहनिबर्ग येथे जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट
November 23rd, 09:41 pm
दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथे सुरु असलेल्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि कॅनडामधील भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला.आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे निवेदन
November 23rd, 12:45 pm
जोहानस-बर्ग” सारख्या जिवंत आणि सुंदर शहरात आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत सहभागी होणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या बैठकीसाठी मी आयबीएसए चे अध्यक्ष राष्ट्रपति लुला यांचे मनापासून आभार मानतो. आणि राष्ट्रपति रामाफोसा यांना आदरातिथ्याबद्दल धन्यवाद देतो.जोहान्सबर्ग येथे आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग
November 23rd, 12:30 pm
ही बैठक अत्यंत योग्य वेळी होत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की ही बैठक आफ्रिकेच्या भूमीवर झालेल्या पहिल्या जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने झाली असून ग्लोबल साउथ देशांच्या सलग चार जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा समारोप करते. या चारपैकी शेवटची तीन अध्यक्षपदे भारत - ब्राझील - दक्षिण आफ्रिका संवाद मंच (आयबीएसए) सदस्य राष्ट्रांकडे होती. या दरम्यान मानव-केंद्रित विकास, बहुपक्षीय सुधारणा आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.आंध्रप्रदेश मधल्या पुट्टपर्थी इथे श्री सत्य साई बाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यामधले पंतप्रधानांचे संबोधन
November 19th, 11:00 am
मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडू, केंद्रातले माझे सहकारी राममोहन नायडू, जी. किशन रेड्डी, भूपति राजू श्रीनिवास वर्मा, सचिन तेंडुलकर जी, उपमुख्यमंत्री पवन कल्याण जी, राज्य सरकारमधले मंत्री नारा लोकेश जी, श्री सत्य साईं सेंट्रल ट्रस्ट चे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. जे. रत्नाकर जी, कुलगरू के. चक्रवर्ती जी, ऐश्वर्या जी, इतर मान्यवर आणि स्त्री-पुरुषहो, साईं राम!श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले
November 19th, 10:30 am
भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात “साई राम” उच्चारून केली आणि पुट्टपर्थीच्या पवित्र भूमीवर सर्वांमध्ये उपस्थित राहणे हा अत्यंत भावनिक आणि अध्यात्मिक अनुभव आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. थोड्या वेळापूर्वी बाबांच्या समाधीवर पुष्पांजली वाहण्याची संधी मिळाली असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. बाबांच्या चरणांशी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर अंतःकरण भरून येते यावर त्यांनी भर दिला.गुजरातमध्ये देडियापाडा येथे जनजातीय गौरव दिन कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
November 15th, 03:15 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगदीश विश्वकर्मा जी, गुजरात सरकारमधले मंत्री नरेश भाई पटेल, जयराम भाई गामीत जी, संसदेतले माझे जुने मित्र मनसुख भाई वसावा जी, भगवान बिरसा मुंडा यांचा परिवारातले व्यासपीठावर उपस्थित सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे आदिवासी बंधुभगिनी, अन्य सर्व आदरणीय व्यक्ती आणि आत्ता देशात सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमांमधून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याशी जोडले गेलेले अनेक लोक, राज्याराज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री अशा सर्वांना जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला केले संबोधित
November 15th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. माँ नर्मदेची पवित्र भूमी आज आणखी एका ऐतिहासिक प्रसंगाची साक्षीदार होत आहे असे सांगून, मोदी यांनी भारताची एकता आणि विविधता साजरी करण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची 150 वी जयंती याच ठिकाणी साजरी करण्यात आली होती, भारत पर्वाची सुरुवात झाली होती याची आठवण करून दिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या भव्य सोहळ्यासह भारत पर्वचा समारोप होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले .या शुभ प्रसंगी त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि संपूर्ण आदिवासी पट्ट्यात स्वातंत्र्याची भावना जागृत करणाऱ्या गोविंद गुरुंचे आशीर्वाद देखील या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. व्यासपीठावरून त्यांनी गोविंद गुरुंना आदरांजली वाहिली. थोड्या वेळापूर्वी देवमोगरा मातेच्या मंदिराला भेट देण्याचा आणि पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचे सौभाग्य लाभले असे ते म्हणाले.