घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
July 02nd, 07:34 am
घानाचे राष्ट्रपती जॉन द्रामनी महामा यांच्या आमंत्रणाचा मान राखत मी 2 आणि 3 जुलै रोजी घाना देशाला भेट देईन. जगाच्या दक्षिणेकडील देशांपैकी घाना हा आपला महत्त्वाचा भागीदार देश आहे आणि हा देश आफ्रिकन महासंघ तसेच पश्चिम आफ्रिकी राष्ट्रांचा आर्थिक समुदाय यामध्ये महत्वाची भूमिका निभावतो.उभय देशांमधील ऐतिहासिक बंध आणखी दृढ करण्यासाठी आणि गुंतवणूक, उर्जा, आरोग्य, सुरक्षा, क्षमता निर्मिती तसेच विकासविषयक भागीदारी या क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दालने खुली करण्यासाठी मी उत्सुक आहे. सहकारी लोकशाही देश असलेल्या घानाच्या संसदेत भाषण करणे हा माझा सन्मान असेल असे मी समजतो.पंतप्रधानांचा घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया दौरा (02 - 09 जुलै )
June 27th, 10:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 02-03 जुलै 2025 दरम्यान घानाला भेट देतील. पंतप्रधानांचा घानाचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा असेल. तीन दशकांनंतर भारताचे पंतप्रधान घानाला भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान घानाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करून मजबूत द्विपक्षीय भागीदारीचा आढावा घेतील आणि आर्थिक, ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य आणि विकास सहकार्य भागीदारीद्वारे ती वाढवण्यासाठी अन्य मार्गांवर चर्चा करतील. हा दौरा दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि ECOWAS [पश्चिम आफ्रिकन देशांचा आर्थिक समुदाय] आणि आफ्रिकन संघासोबत भारताचे संबंध मजबूत करण्याप्रति सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल.