आव्हानात्मक जागतिक वातावरणात देशाची स्थिर प्रगती दर्शवणारे आर्थिक सर्व्हेक्षण म्हणजे 'सुधारणेच्या एक्सप्रेसचे सर्वसमावेशक चित्र’ असल्याचे पंतप्रधानांनी केले अधोरेखित

January 29th, 08:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणाने भारताच्या 'सुधारणेच्या एक्सप्रेसचे सर्वसमावेशक चित्र’ सादर केले आहे. आव्हानात्मक जागतिक वातावरणातही देशाची स्थिर प्रगती या सर्व्हेक्षणातून दिसून येते. पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, आर्थिक सर्व्हेक्षण मजबूत समग्र आर्थिक मूलभूत तत्त्वे, शाश्वत वाढीची गती आणि राष्ट्र उभारणीमध्ये नवोन्मेष, उद्योजकता आणि पायाभूत सुविधांची वाढती भूमिका अधोरेखित करते. हे सर्वेक्षण सर्वसमावेशक विकासाचे महत्त्व अधोरेखित करते, त्यामध्ये शेतकरी, एमएसएमई, युवा रोजगार आणि सामाजिक कल्याणावर लक्ष केंद्रित केले आहे. हे उत्पादन मजबूत करण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी आणि विकसित भारत बनण्याच्या दिशेने आपला प्रवास वेगवान करण्यासाठीचा आराखडा देखील मांडते, असे मोदी म्हणाले.