नवी दिल्लीत ज्ञान भारतम् वरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
September 12th, 04:54 pm
आज विज्ञान भवन भारताच्या सुवर्ण भूतकाळाच्या पुनरुज्जीवनाचा साक्षीदार बनत आहे. काही दिवसांपूर्वीच, मी ज्ञान भारतम् अभियानाची घोषणा केली होती. आणि आज, इतक्या कमी वेळात, आपण ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहोत. त्याचे संकेतस्थळही नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हा काही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नाही; ज्ञान भारतम् अभियान ही भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतनेची घोषणा बनत आहे. हजारो पिढ्यांचे चिंतन, भारताचे महान ऋषीमुनी, आचार्य आणि विद्वानांचे ज्ञान आणि संशोधन, आपली ज्ञान परंपरा, आपला वैज्ञानिक वारसा, हे सर्व आपण ज्ञान भारतम् अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात आणणार आहोत. मी या अभियानासाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. मी ज्ञान भारतमच्या संपूर्ण चमूला आणि संस्कृती मंत्रालयालाही शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
September 12th, 04:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ग्यान भारतम या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले.या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज विज्ञान भवन भारताच्या सोनेरी भूतकाळाचे पुनरुत्थान पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ग्यान भारतम मिशनची घोषणा केली होती आणि इतक्या कमी कालावधीत ही ग्यान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या मिशनशी संबंधित पोर्टलचेही उद्घाटन केल्याची मोदी यांनी माहिती दिली. हा कोणताही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नसून, ग्यान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतना यांचा उद्घोष बनेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी हजारो पिढ्यांच्या चिंतनशील परंपरेवर विचार व्यक्त केले. त्यांनी भारताच्या महान ऋषी, आचार्य आणि विद्वानांच्या ज्ञान आणि संशोधनाचा गौरव केला, तसेच भारताची ज्ञान परंपरा आणि वैज्ञानिक वारसा यावर भर दिला. मोदी म्हणाले की, ग्यान भारतम मिशनच्या माध्यमातून हा वारसा डिजिटाइज केला जात आहे. त्यांनी या मिशनसाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि संपूर्ण ग्यान भारतम टीम तसेच संस्कृती मंत्रालयाला शुभेच्छा दिल्या.गुजरातमधील हंसलपूर येथे पर्यावरणपूरक वाहतूक उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
August 26th, 11:00 am
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, भारतातील जपानचे राजदूत केइची ओनो सान, सुजुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुजुकी सान, मारुती सुजुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हिसाशी ताकेउची सान, अध्यक्ष आर. सी. भार्गव, हंसलपूर प्रकल्पातील सर्व कर्मचारी आणि उपस्थित मान्यवर.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील हंसलपूर येथे हरित गतिशीलता उपक्रमांचे उद्घाटन
August 26th, 10:30 am
हरित ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने मोठी प्रगती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील हंसलपूर येथे हरित गतिशीलता उपक्रमांचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात भारताच्या 'मेक इन इंडिया' प्रवासात एक नवीन अध्याय जोडला जात आहे. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या सामायिक ध्येयाच्या दिशेने ही एक महत्त्वपूर्ण झेप आहे असे ते म्हणाले. आजपासून भारतात उत्पादित होणारी इलेक्ट्रिक वाहने 100 देशांमध्ये निर्यात केली जाणार आहेत यावर मोदी यांनी भर दिला. देशात हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड उत्पादन सुरू झाल्याची घोषणा त्यांनी केली. आजचा दिवस भारत आणि जपानमधील मैत्रीला एक नवीन आयाम जोडत आहे यावर भर देत, पंतप्रधानांनी भारतातील सर्व नागरिकांचे , जपानचे आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे मनापासून अभिनंदन केले.भारत टेक्स 2025 मधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 16th, 04:15 pm
आज, भारत मंडपम्, दुसऱ्या भारत टेक्स प्रदर्शनाच्या आयोजनाचा साक्षीदार होते आहे. त्यामध्ये आपल्या परंपरांसोबतच विकसित भारताच्या संधींचे दर्शन होते आहे. आपण ज्या रोपाचे बीज रोवले, ते आज वटवृक्ष होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, ही देशासाठी नक्कीच समाधानाची बाब आहे. भारत टेक्स आता एक मोठा जागतिक कार्यक्रम बनू पाहातो आहे. यावेळी मूल्य साखळीची संपूर्ण श्रेणी, त्याच्याशी निगडीत 12 समूह एकाच वेळी इथे सहभागी होत आहेत. अक्सेसरीज, कपडे, यंत्रसामग्री, रसायने आणि रंग देखील यामध्ये प्रदर्शित केले जात आहेत. जगभरातले धोरणकर्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग नेतृत्वासाठी सगहभाग, सहकार्य आणि भागीदारीसाठी, भारत टेक्स हे मजबूत व्यासपीठ होत आहे. या आयोजनासाठी सर्वच भागदारांचे प्रयत्न खूप कौतुकास्पद आहेत, या कामाशी निगडीत असलेल्या सर्व लोकांना मनपासून खूप खूप शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत टेक्स 2025 मंचाला केले संबोधित
February 16th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आयोजित भारत टेक्स 2025 या वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने भरवलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली. आपल्या संबोधनातून त्यांनी भारत टेक्स 2025 या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे स्वागत केले. हे या उपक्रमाचे दुसरे पर्व असून, भारत मंडपम हा यंदाच्या पर्वाचा साक्षीदार असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या वारशाचे दर्शन तर घडलेच, आणि त्याच वेळी विकसित भारताच्या भवितव्याची झलकही पाहायला मिळली, आपल्या भारतासाठी ही अभिमानाची बाब असल्याची भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. भारत टेक्स आता भव्य स्वरुपातील जागतिक वस्त्रोद्योग सोहळा झाला असल्याच्या शब्दांत पंतप्रधानांनी या उपक्रमाचे महत्व अधोरेखीत केले. मूल्यसाखळीच्या परिघाशी जोडलेल्या सर्व बारा घटकांचे प्रतिनिधी यंदाच्या उपक्रमात सहभागी झाले असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. या उपक्रमाच्या निमित्ताने उपयुक्त पुरक साधने , कपडे, यंत्रसामुग्री, रसायने आणि कापडांसाठीचे रंग या आणि अशा इतर घटकांचे प्रदर्शन भरवले असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारत टेक्स हा उपक्रम जगभरातील धोरणकर्ते, या उद्योग क्षेत्रातील अग्रणी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकरता परस्पर सहकार्य आणि भागिदारी प्रस्थापित करण्याच्यादृष्टीने परस्परांसोबत जोडून घेण्यासाठीचा एक मजबूत मंच बनला असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक हितधारकाने केलेल्या प्रयत्नांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.जिनोम इंडियाप्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात पंतप्रधानांचे विचार
January 09th, 06:38 pm
आज भारताने संशोधनाच्या जगात एक अतिशय ऐतिहासिक पाऊल उचललेआहे. जीनोम इंडिया प्रकल्पाला पाच वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, कोविडच्या आव्हानांना न जुमानता, आपल्या शास्त्रज्ञांनी मोठ्या मेहनतीने हा प्रकल्प पूर्ण केला आहे. मला आनंद आहे की आयआयएससी, आयआयटी, सीएसआयआर आणि ब्रिक यांसारख्या देशातील 20 हूनअधिक आघाडीच्या संशोधन संस्थांनी या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या प्रकल्पाचा डेटा, 10,000 भारतीयांचा जीनोम क्रम, आता भारतीय जैविक डेटा सेंटरमध्ये उपलब्ध आहे. मला विश्वास आहे की हा प्रकल्प जैवतंत्रज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरेल. या प्रकल्पाशी संबंधित सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो.जिनोम इंडिया प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेले विचार
January 09th, 05:53 pm
जिनोम इंडिया प्रकल्पाचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आज आपले विचार व्यक्त केले. भारताने संशोधन क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे, असे पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. जिनोम इंडिया प्रकल्पाला 5 वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती आणि आपल्या शास्त्रज्ञांनी प्रामाणिकपणे काम केले आणि कोविड महामारीने उभ्या केलेल्या आव्हानानंतरही हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला, असे ते म्हणाले.Prime Minister condoles passing away of former Prime Minister Dr. Manmohan Singh
December 26th, 11:11 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the passing away of former Prime Minister, Dr. Manmohan Singh. India mourns the loss of one of its most distinguished leaders, Dr. Manmohan Singh Ji, Shri Modi stated.पंतप्रधानांनी घेतली इटलीच्या पंतप्रधानांची भेट
November 19th, 08:34 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या दोन पंतप्रधानांची गेल्या दोन वर्षांतील ही पाचवी भेट आहे. आजच्या भेटीआधी जून 2024 मध्ये इटलीत पुगलिया येथे पंतप्रधान मेलोनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी 7 शिखर परिषदेनिमित्त या दोन नेत्यांची भेट झाली होती. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत जी 7 चे नेतृत्व करत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान मेलोनी यांचे अभिनंदन केले.India is emerging as a hub of global trade and manufacturing: PM Modi
October 25th, 11:20 am
Addressing the 18th Asia-Pacific Conference of German Business, PM Modi remarked, India is becoming a prime center of persification and de-risking and is emerging as a hub of global trade and manufacturing. Given this scenario, now is the most opportune time for you to make in India, and make for the world.जमैकाचे पंतप्रधान डॉ. अँड्र्यू हॉलनेस यांच्या अधिकृत भारत दौऱ्यादरम्यान (30 सप्टेंबर - 3 ऑक्टोबर 2024) करण्यात आलेले सामंजस्य करार
October 01st, 12:30 pm
भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि जमैकाचे पंतप्रधान कार्यालय यांच्यात आर्थिक समावेशकता आणि सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाला चालना देणाऱ्या यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सामायिक करण्याच्या क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करारआर्थिक सर्वेक्षण अहवाल आपल्या अर्थव्यवस्थेची विद्यमान बलस्थाने अधोरेखित करतो आणि सरकारने राबवलेल्या विविध सुधारणांची परिणतीही दाखवतो - पंतप्रधान
July 22nd, 07:15 pm
आर्थिक सर्वेक्षण अहवाल आपल्या अर्थव्यवस्थेची विद्यमान बलस्थाने अधोरेखित करतो आणि सरकारने राबवलेल्या विविध सुधारणांची फलनिष्पत्ती प्रदर्शित करतो, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.जी - 7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात द्विपक्षीय बैठकीचे आयोजन
June 14th, 11:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीमध्ये अपुलिया येथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. पंतप्रधान पदावर सलग तिसऱ्यांदा नियुक्त झाल्याबद्दल इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. जी-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी मेलोनी यांचे आभार मानले आणि परिषद यशस्वीपणे संपन्न झाल्याबद्दल प्रशंसा केली.PM Modi interacts with the Indian community in Paris
July 13th, 11:05 pm
PM Modi interacted with the Indian diaspora in France. He highlighted the multi-faceted linkages between India and France. He appreciated the role of Indian community in bolstering the ties between both the countries.The PM also mentioned the strides being made by India in different domains and invited the diaspora members to explore opportunities of investing in India.Today's Aatmanirbhar Bharat Package is a continuation of the Government's effort to help all sections of the society: PM
November 12th, 10:29 pm
The Prime Minister Shri Narendra Modi has said that today's Aatmnirbhar Bharat package is a continuation of the government's effort to help all sections of the society.We are focussing on making tax-paying seamless, painless, faceless: PM Modi
August 13th, 11:28 am
PM Narendra Modi rolled out a taxpayers charter and faceless assessment on Thursday as part of the government's effort to easing the compliance for assessees and reward the honest taxpayer. He also launched the Transparent Taxation - Honoring The Honest platform, in what he said will strengthen efforts of reforming and simplifying the country's tax system.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “पारदर्शक करप्रणाली –प्रामाणिकांचा सन्मान” मंचाचे उद्घाटन करप्रणाली निरंतर, त्रासरहित, चेहराविरहीत करण्याचे लक्ष्य : पंतप्रधान पंतप्रधान म्हणाले, करदात्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी, देशातील 130 कोटी नागरिकांपैकी केवळ 1.5 कोटी करदाते
August 13th, 10:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज “पारदर्शक करप्रणाली – प्रामाणिकतेचा सन्मान” मंचाचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.Prime Minister reviews “Project Arth Ganga” : Correcting imbalances; connecting people
May 15th, 08:43 pm
Prime Minister Shri Narendra Modi today reviewed the plans being envisaged for implementing “Project Arth Ganga”.We are focusing on formalization and modernization of Indian economy: PM Modi
December 20th, 11:01 am
PM Modi addressed centenary celebrations of ASSOCHAM. He said it takes four words to say ‘Ease of Doing Business’, but rankings improve when the government and entire system works day in and out, by going to the grassroots level. The PM mentioned India as one of the most business friendly nations and cited the country stands at 63rd position in the Ease of Doing Business rankings.