दिल्लीमध्ये विविध विकासकामांच्या पायाभरणी, उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
January 03rd, 01:03 pm
तुम्हा सर्वांना वर्ष 2025 च्या खूप-खूप शुभेच्छा. 2025 हे वर्ष भारताच्या विकासासाठी अनेक नवीन संधी घेऊन येत आहे. ,जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने आपला प्रवास यावर्षी आणखी वेगवान होणार आहे. आज भारत, जगात राजकीय आणि आर्थिक स्थैर्याचे प्रतीक बनत आहे. 2025 या वर्षात भारताची ही भूमिका अधिक मजबूत होईल. हे वर्ष जगात भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिक मजबूत करण्याचे वर्ष असेल, हे वर्ष भारताला जगातील सर्वात मोठे निर्मिती केंद्र बनवण्याचे वर्ष असेल, हे वर्ष, युवकांना नवीन स्टार्टअप आणि उद्यमशीलतेमध्ये वेगाने पुढे नेण्याचे वर्ष असेल , हे वर्ष कृषी क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचे वर्ष असेल. हे वर्ष महिला-प्रणित विकासाच्या आपल्या मंत्राला नवी उंची देण्याचे वर्ष असेल,हे वर्ष जीवन सुलभता वाढवण्याचे, जीवनमान उंचावण्याचे वर्ष असेल. आजचा हा कार्यक्रम देखील याच संकल्पाचा एक भाग आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
January 03rd, 12:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधितही केले. त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 2025 हे वर्ष भारताच्या विकासासाठी अफाट संधींचे वर्ष ठरेल आणि हे वर्ष देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने घेऊन जाईल, असा ठाम विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. आजच्या घडीला भारताने राजकीय आणि आर्थिक स्थैर्याचे जागतिक प्रतिक म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. आगामी वर्षात देशाची प्रतिमा आणखी मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मधील आपले संकल्पित ध्येय उद्दिष्ट देखील उपस्थितांसमोर मांडले. जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनणे, देशातल्या युवा वर्गाचे स्टार्ट - अप आणि उद्योजकतेच्या दृष्टीने सक्षमीकरण करणे, कृषी क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करणे, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्रोत्साहन देणे आणि जीवन सुलभतेवर लक्ष केंद्रित करून प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने हे वर्ष भारताचे असेल यावर त्यांनी आपल्या संबोधनात भर दिला.पंतप्रधान 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर
July 12th, 05:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलै 2024 रोजी मुंबईला भेट देणार आहेत. संध्याकाळी 5:30 च्या सुमाराला, पंतप्रधान मुंबईतील गोरेगाव स्थित नेस्को प्रदर्शन केंद्र येथे पोहोचतील. या कार्यक्रमात ते 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन ,लोकार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, संध्याकाळी 7 च्या सुमाराला पंतप्रधान, जी -ब्लॉक , वांद्रे कुर्ला संकुल, मुंबई येथे आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन करतील.