मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स येथील दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
February 05th, 08:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयातील पूर्व जैंतिया पर्वतरांगा भागात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.त्यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना 'प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत' निधीमधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली.