यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष यांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या करार, घोषणा, इत्यादींची सूची

January 27th, 02:53 pm

2030 च्या दिशेने : भारत -यूरोपीय संघ संयुक्त सर्वसमावेशक धोरणात्मक कार्यक्रम

भारत-जॉर्डन व्यापार बैठकीत पंतप्रधानांचे संबोधन

December 16th, 12:24 pm

जगात अनेक देशांच्या सीमा जोडलेल्या असतात तर काही देशांच्या बाजारपेठा जोडल्या जातात. परंतू भारत आणि जॉर्डन यांचे संबंध असे आहेत जिथे ऐतिहासिक विश्वास आणि भविष्यातील आर्थिक संधी यांचे एकत्रीकरण होते.

पंतप्रधान मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी भारत-जॉर्डन व्यापार मंचाला केले संबोधित

December 16th, 12:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी आज अम्मान येथे भारत-जॉर्डन व्यापार मंचाला संबोधित केले. या मंचाला युवराज हुसेन आणि जॉर्डनचे व्यापार व उद्योग, तसेच गुंतवणूक मंत्री उपस्थित होते. राजे अब्दुल्ला द्वितीय आणि पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील व्यापार संबंध वृद्धिंगत करणे, आवश्यक असल्यावर सहमती व्यक्त केली आणि दोन्ही देशांच्या उद्योजकांना क्षमता व संधींचे रूपांतर विकास आणि समृद्धीमध्ये करण्याचे आवाहन केले. जॉर्डनचे मुक्त व्यापार करार आणि भारताची आर्थिक शक्ती यांच्या संयोगातून दक्षिण आशिया आणि पश्चिम आशिया व त्यापुढील प्रदेशांदरम्यान एक आर्थिक मार्गिका तयार केली जाऊ शकते, असे जॉर्डनच्या राजांनी नमूद केले.

15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेतील संयुक्त निवेदन: आपल्या भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी भागीदारी

August 29th, 07:06 pm

जपानचे पंतप्रधान महामहीम इशिबा शिगेरू यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानला अधिकृत कार्य भेट दिली. 29 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी पंतप्रधान मोदींचे स्वागत पंतप्रधान इशिबा यांनी पंतप्रधान कार्यालयात (कांटेई) केले, जिथे त्यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दोन्ही पंतप्रधानांनी शिष्टमंडळ-स्तरीय चर्चा केली. यावेळी त्यांनी भारत आणि जपानमधील दीर्घकाळापासून कायम राहिलेल्या मैत्रीची आठवण केली, जी ऐतिहासिक संबंध, सामायिक मूल्ये आणि हितसंबंध, समान धोरणात्मक दृष्टिकोन आणि परस्परांबद्दलचा आदर यामध्ये रुजलेली आहे. दोन्ही पंतप्रधानांनी गेल्या दशकात भारत-जपान भागीदारीने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे कौतुक केले आणि आगामी दशकात परस्पर सुरक्षितता आणि समृद्धी साधण्यासाठी धोरणात्मक आणि दूरगामी भागीदारी मजबूत करण्याच्या मार्गांवर रचनात्मक चर्चा केली.

फलनिष्पत्ती सूची : पंतप्रधानांचा जपान दौरा

August 29th, 06:23 pm

• आर्थिक भागीदारी, आर्थिक सुरक्षा, गतिशीलता, पर्यावरणीय शाश्वतता, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, आरोग्य, व्यक्ती -व्यक्ती आणि राज्य-प्रांत सहभाग या आठ प्रयत्नरेषांमध्ये आर्थिक आणि कार्यात्मक सहकार्यासाठी 10 वर्षांचे धोरणात्मक प्राधान्य

जपानच्या पंतप्रधानांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना निवेदन

August 29th, 03:59 pm

आज आम्ही आमच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीत एका नवीन आणि सोनेरी अध्यायाचा मजबूत पाया रचला आहे. आम्ही आगामी दशकासाठी एक रूपरेषा आखली आहे. आमच्या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी गुंतवणूक, नवोन्मेष, आर्थिक सुरक्षा, पर्यावरण, तंत्रज्ञान, आरोग्य, गतिशीलता, लोकांमधील आदानप्रदान आणि राज्य-प्रादेशिक भागीदारी या प्रमुख बाबी आहेत. आम्ही आगामी दहा वर्षांमध्ये जपानमधून भारतात 10 ट्रिलियन येन गुंतवणुकीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. भारत आणि जपानमधील लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्स यांना जोडण्यावर विशेष भर दिला जाईल.

फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांच्या भारत दौऱ्यातल्या फलनिष्पत्तींची सूची

August 25th, 01:58 pm

भारत सरकार आणि फिजी प्रजासत्ताक सरकार यांच्यात फिजीमधील सुपर-स्पेशालिटी रुग्णालयाचे डिझाइन, बांधकाम, कार्यान्वयन, ऑपरेशन आणि देखभालीसाठी सामंजस्य करार.

पंतप्रधानांच्या हस्ते, उद्या दिनांक 17 ऑगस्ट रोजी दिल्लीत 11,000 कोटी रुपये खर्चाच्या महामार्ग प्रकल्पांचे होणार उद्घाटन

August 16th, 11:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता दिल्लीतील रोहिणी येथून सुमारे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करतील. पंतप्रधान याप्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील.

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांसोबत पूर्ण सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रारंभिक भाषण (28 फेब्रुवारी 2025)

February 28th, 01:50 pm

मी तुम्हा सर्वांचे भारतात हार्दिक स्वागत करतो. ईयू कॉलेज ऑफ कमिशनर्सचा एकाच देशासोबत इतक्या व्यापक स्तरावरचा हा सहभाग अभूतपूर्व आहे.

नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये आयोजित ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025‘ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 17th, 11:00 am

मागच्यावेळी ज्यावेळी मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो होतो, त्यावेळी लोकसभा निवडणुकांना काही फार अवधी राहिलेला नव्हता. त्यावेळी आपल्या सर्वांवर असलेल्या विश्वासामुळे मी म्हटले होते की, पुढच्यावेळीही भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये मी जरूर उपस्थित राहीन. देशाने तिस-यांदा आम्हाला आशीर्वाद दिला आहे. तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा मला इथे आमंत्रित केले आहे, त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन

January 17th, 10:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 या भारतातील सर्वात मोठ्या मोबिलिटी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सलग तिसऱ्यांदा आपल्या सरकारला निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की, या वर्षी या प्रदर्शनाची व्याप्ती खूप वाढली असून राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात इतर दोन ठिकाणी देखील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले गेल्या वर्षी 800 प्रदर्शक सहभागी झाले होते आणि 2.5 लाख लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली . मोदी यांनी नमूद केले की, पुढल्या 5 दिवसांमध्ये अनेक नवीन वाहने इथे प्रदर्शित केली जातील आणि अनेक प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यातून हे दिसून येते की भारतात मोबिलिटीच्या भविष्याशी संबंधित खूप सकारात्मकता आहे, असे ते म्हणाले. प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट दिल्याचा उल्लेख करताना, मोदी म्हणाले , भारताचा वाहन निर्मिती उद्योग विलक्षण आहे आणि भविष्यासाठी सज्ज आहे .यावेळी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जानेवारी रोजी करणार भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन

January 16th, 04:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे भारतातील सर्वात मोठे मोबिलिटी प्रदर्शन भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमध्ये 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

January 05th, 12:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली इथे 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. प्रादेशिक दळणवळणीय जोडणीचा विस्तार करणे आणि नागरिकांसाठी प्रवासात सुलभता सुनिश्चित करणे हे या प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साहिबाबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस स्थानकापर्यंत नमो भारत रेल्वे गाडीने प्रवास देखील केला.

जागतिक सरकार शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 14th, 02:30 pm

जागतिक सरकार शिखर परिषदेत मुख्य भाषण देणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.आणि हे भाग्य मला दुसऱ्यांदा मिळत आहे. या निमंत्रणासाठी आणि शानदार स्वागतासाठी मी महामहिम शेख मोहम्मद बिन रशीद जी यांचा खूप खूप आभारी आहे.मी माझे बंधू महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद यांचेही आभार मानतो. अलीकडच्या काळात त्यांना अनेकदा भेटण्याची संधी मला मिळाली. ते केवळ दूरदृष्टी असलेले नेतेच नाहीत तर संकल्प आणि वचनबद्धता दर्शवणारे देखील नेते आहेत.

जागतिक सरकार शिखर परिषद 2024 मध्ये पंतप्रधान सहभागी

February 14th, 02:09 pm

संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि दुबईचे शासक महामहीम शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुबई येथे जागतिक सरकार शिखर परिषदेत सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले. भविष्यातील सरकारांना आकार देणे या परिषदेच्या संकल्पनेवर पंतप्रधानांनी विशेष मुख्य भाषण केले . 2018 मधील जागतिक सरकार शिखर परिषदेला देखील पंतप्रधान सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी या शिखर परिषदेत 10 राष्ट्राध्यक्ष आणि 10 पंतप्रधानांसह 20 जागतिक नेते सहभागी झाले. या जागतिक परिषदेला120 हून अधिक देशांची सरकारे आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

The speed and scale of our govt has changed the very definition of mobility in India: PM Modi

February 02nd, 04:31 pm

Prime Minister Narendra Modi addressed a program at India’s largest and first-of-its-kind mobility exhibition - Bharat Mobility Global Expo 2024 at Bharat Mandapam, New Delhi. Addressing the gathering, the Prime Minister congratulated the motive industry of India for the grand event and praised the efforts of the exhibitors who showcased their products in the Expo. The Prime Minister said that the organization of an event of such grandeur and scale in the country fills him with delight and confidence.

पंतप्रधानांनी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 ला संबोधित पंतप्रधानांनी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 ला संबोधित केलेकेले

February 02nd, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मध्ये भारत मंडपम येथे ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024’, या ‘मोबिलिटी प्रदर्शना निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. हे भारतातील सर्वात मोठे आणि अशा प्रकारचे पहिलेच प्रदर्शन आहे. पंतप्रधानांनी यावेळी प्रदर्शनाला भेट देऊन निरीक्षणही केले.

पंतप्रधान 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

January 11th, 11:12 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांचे दुपारी 12:15 च्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून प्रवाससुद्धा करणार आहेत. नवी मुंबई येथे दुपारी 4:15 च्या सुमारास, पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात ते विविध विकासकामांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील.