पृथ्वीला सर्व जीवसृष्टीचे पालनपोषण करणारी माता मानणाऱे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी सामायिक केले
August 06th, 11:07 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. पृथ्वी ही सर्व जीवसृष्टीची पालनपोषण करणारी माता असल्याने, मानवतेने पृथ्वीसोबत सुसंवादाने राहावे आणि तिला टिकवून ठेवणाऱ्या नैतिक व्यवस्थेचा आदर केला पाहिजे. असे त्यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानणाऱ्या पृथ्वीमातेच्या वात्सल्याचे वर्णन करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
May 19th, 09:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून यामध्ये पृथ्वी माता संपूर्ण मानवतेला आपले कुटुंब मानत असल्याचे वर्णन केले आहे. पृथ्वीसाठी हे संपूर्ण विश्वच घरासमान आहे, जिथे प्रत्येक संस्कृतीला स्वतःचे महत्त्व आणि सन्मान आहे.पंतप्रधानांनी पृथ्वीच्या चिरस्थायी चैतन्यावर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
April 22nd, 11:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पृथ्वीच्या चिरस्थायी चैतन्यावर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.पंतप्रधानांनी राष्ट्राच्या शक्तीचा स्रोत म्हणून पवित्र भूमीचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
March 10th, 11:13 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राच्या शक्तीचा स्रोत म्हणून पवित्र भूमीचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.पंतप्रधानांनी भूमातेने दिलेल्या आशिर्वादांवर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
February 10th, 10:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातृभूमीने दिलेल्या आशीर्वादांचे महत्त्व विशद करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी आशीर्वाद मागणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
February 06th, 11:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या अक्षय संस्कृतीच्या ज्ञानाकडे आपले लक्ष वेधत आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेच्या समर्पणासाठी देशाच्या सामूहिक आकांक्षेचे प्रतिबिंब दर्शविणारे आवाहन केले.पंतप्रधानांचा शुभांशू शुक्ला यांच्यासोबतचा संवाद
August 19th, 09:43 am
तर तुम्हाला काही बदल जाणवत असतील, तुम्ही लोक कुठल्या प्रकारच्या अनुभवातून जाता, ते मी समजू इच्छितो.पंतप्रधानांनी अंतराळवीर शुभांशु शुक्ला याच्याशी साधला संवाद
August 19th, 09:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ नवी दिल्ली येथे अंतराळवीर शुभांशु शुक्ला याच्याशी संवाद साधला. अंतराळ प्रवासाच्या परिवर्तनकारी अनुभवाबाबत मत व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की असा महत्त्वाचा प्रवास केल्यानंतर, कोणत्याही व्यक्तीला बदल जाणवतच असेल. आणि अंतराळवीरांना हे परिवर्तन कसे वाटते आणि ते या परिवर्तनाचा कसा अनुभव घेतात हे समजून घ्यायला मला आवडेल. पंतप्रधानांच्या मतावर प्रतिक्रिया व्यक्त करत शुभांशु शुक्ला म्हणाले की अंतराळातील वातावरण अत्यंत वेगळ्या प्रकारचे असून, गुरुत्वाकर्षण शक्तीचा अभाव हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश
August 12th, 04:34 pm
64 देशांमधील 300 हून अधिक बुद्धिमान युवकांशी जोडले जाणे हा आनंददायी अनुभव आहे. 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी मी तुमचे भारतात हार्दिक स्वागत करतो. भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी , अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो. शतकानुशतके, भारतीय आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत. उदाहरणार्थ, 5 व्या शतकात, आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते असे सांगणारे ते पहिलेच होते. अक्षरशः त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला!,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिंपियाडला केले संबोधित
August 12th, 04:33 pm
भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी, अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो. भारतीय शतकानुशतकांपासून आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत, असे मोदी म्हणाले. त्यांनी आर्यभट्ट यांचे उदाहरण दिले, ज्यांनी 5 व्या शतकात शून्याचा शोध लावला आणि पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते असे विधान प्रथम केले. शब्दशः, त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला! असे पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधानांनी क्रू-9 अंतराळवीरांचे केले अभिनंदन
March 19th, 11:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स सहित सर्व क्रू-9 अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुरक्षित परतल्याबद्दल मनापासून अभिनंदन केले आहे. क्रू-9 अंतराळवीरांचे धैर्य, दृढनिश्चय व अंतराळ संशोधनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.पंतप्रधान 26 जुलै रोजी प्रगती मैदान येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र (IECC) संकुल राष्ट्राला समर्पित करणार
July 24th, 07:45 pm
सुमारे 123 एकर परिसर असलेले हे संकुल भारतातील सर्वात मोठे बैठक, प्रोत्साहन, परिषद आणि प्रदर्शन स्थळ((MICE) म्हणून विकसित केले आहे. कार्यक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या जागेच्या बाबतीत, जगभरातील अव्वल प्रदर्शन आणि परिषद संकुलांमधील हे एक संकुल आहे. प्रगती मैदानावर बांधण्यात आलेल्या या नवीन परिषद केंद्रात प्रदर्शन सभागृह, अॅम्फी थिएटर्स सह अनेक अत्याधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.आपल्या ग्रहाला अधिक उत्तमतेकडे नेणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने केले कौतुक
April 22nd, 09:53 am
वसुंधरा दिनाच्या आजच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पृथ्वी ही अधिक चांगली राखण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांचे कौतुक केले आहे.जी-20 शिखर परिषदेत, भारताच्या नेतृत्वासंदर्भातले बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 08th, 07:31 pm
जी-20 हा अशा देशांचा समूह आहे, ज्याचे आर्थिक सामर्थ्य जगातील एकूण सकल उत्पादनापैकी 85 टक्के सकल उत्पादनाचे प्रतिनिधित्व करतो. जी-20 अशा 20 देशांचा समूह आहे, ज्यात जगातील 75 टक्के व्यापाराचे प्रतिनिधित्व केले जाते. जी-20 अशा 20 देशांचा समूह आहे, ज्यात जगातील दोन तृतीयांश लोकवस्ती आहे. आणि आता यावर्षी भारत या जी-20 समूहाचे नेतृत्व करणार आहे, त्याचे अध्यक्षपद भूषवणार आहे.पंतप्रधानांनी भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले अनावरण
November 08th, 04:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण केले.Lifestyle of the planet, for the planet and by the planet: PM Modi at launch of Mission LiFE
October 20th, 11:01 am
At the launch of Mission LiFE in Kevadia, PM Modi said, Mission LiFE emboldens the spirit of the P3 model i.e. Pro Planet People. Mission LiFE, unites the people of the earth as pro planet people, uniting them all in their thoughts. It functions on the basic principles of Lifestyle of the planet, for the planet and by the planet.PM launches Mission LiFE at Statue of Unity in Ekta Nagar, Kevadia, Gujarat
October 20th, 11:00 am
At the launch of Mission LiFE in Kevadia, PM Modi said, Mission LiFE emboldens the spirit of the P3 model i.e. Pro Planet People. Mission LiFE, unites the people of the earth as pro planet people, uniting them all in their thoughts. It functions on the basic principles of Lifestyle of the planet, for the planet and by the planet.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रोटरी इंटरनॅशनल जागतिक परिषदेत भाषण
June 05th, 09:46 pm
जगभरातील रोटरीयन्सचा विशाल परिवार, प्रिय मित्रांनो, नमस्ते! मला रोटरी इंटरनॅशनल परिषदेला संबोधित करताना अतिशय आनंद होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोटरीशी संबंधित लोकांचा हा मेळावा एका अर्ध-जागतिक सभेसारखाच आहे. यामध्ये विविधता आणि चेतना आहे. रोटरीशी संबंधित तुम्ही सर्व लोक आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाला आहात तरी देखील तुम्ही लोकांनी स्वतःला केवळ कामापुरते मर्यादित ठेवलेले नाही. आपल्या पृथ्वीला अधिक चांगले बनवण्याच्या तुमच्या इच्छेने तुम्हा सर्वांना या मंचावर एकत्र आणले आहे. यश आणि सेवेचे हे खऱ्या अर्थाने योग्य मिश्रण आहे.रोटरी इंटरनॅशनलच्या जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन
June 05th, 09:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका चित्रफितीच्या माध्यमातून दिलेल्या संदेशाद्वारे रोटरी इंटरनॅशनलच्या जागतिक परिषदेला संबोधित केले. इतक्या मोठ्या प्रमाणातील प्रत्येक रोटरी मेळावा हा एखाद्या छोट्या -जागतिक परिषदेसारखा आहे, तिथे विविधता आणि चैतन्य आहे असे सांगत रोटेरियन्स म्हणजे रोटरीचे सदस्य हे 'खऱ्या अर्थाने यश आणि सेवेचे मिश्रण' आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.लाइफ मूव्हमेंट उपक्रमाची सुरुवात करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 05th, 07:42 pm
आजचा प्रसंग आणि आजची तारीख, दोन्ही खूप समर्पक आहेत. आपण लाईफ म्हणजे लाइफस्टाइल फॉर द एनवायरन्मेन्ट या पर्यावरण संरक्षण चळवळीचा प्रारंभ करत आहोत. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या मोहिमेचे घोषवाक्य आहे- ''केवळ एक पृथ्वी''. आणि लक्षित क्षेत्र आहे - ''निसर्गाशी सुसंवाद राखत एकरूप होत जगणे''. या वाक्यामध्ये महत्व आणि उपाय सुंदरपणे मांडले आहेत.