वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या 2277.397 कोटी रुपयांच्या खर्चाच्या "क्षमता बांधणी आणि मानव संसाधन विकास" या योजनेला मंत्रीमंडळाने दिली मंजुरी
September 24th, 05:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पंधराव्या वित्त आयोगाच्या 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी एकूण 2277.397 कोटी रुपयांच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग / वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (DSIR/CSIR) क्षमता बांधणी आणि मानव संसाधन विकास या विषयावरील योजनेला मान्यता देण्यात आली आहे.