पंतप्रधानांनी परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांना वाहिली आदरांजली
April 01st, 10:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते करुणा, नम्रता आणि मानवतेसाठी अखंड सेवाभावाचे मूर्तिमंत रूप म्हणून लोकांच्या सदैव स्मरणात राहतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. स्वामीजींनी आपले संपूर्ण आयुष्य इतरांच्या उत्थानासाठी समर्पित केले. खरे मोठेपण हे दुसऱ्यांच्या सेवेतच असते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. शिक्षण, समाजकल्याण आणि अध्यात्म या क्षेत्रांतील त्यांचे योगदान अतुलनीय असून समाजावर त्याचा कायमस्वरूपी प्रभाव पडला आहे, असे मोदी यांनी नमूद केले. शिक्षण, सामाजिक कल्याण आणि अध्यात्म या क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे समाजावर दीर्घकालीन ठसा उमटला आहे.आजही त्यांचे जीवन असंख्य व्यक्तींना निःस्वार्थीपणा आणि सेवाभावाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरणीय, परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगालू यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
April 01st, 09:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांच्या जयंतीच्या विशेष प्रसंगी त्यांना आदरांजली वाहिली आहे. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगालू हे करुणा आणि अविरत सेवेचे दीपस्तंभ होते, आपल्या निःस्वार्थ कृतीतून समाज कसा बदलू शकतो हे त्यांनी दाखवून दिले, असे पंतप्रधानांनी त्यांच्या असामान्य सेवाकार्याबद्दल आदरभावना व्यक्त करताना म्हटले आहे.