डॉ. आर. बालसुब्रमण्यम आणि डॉ. जोराम अनिया यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
May 02nd, 09:40 pm
डॉ. आर. बालसुब्रमण्यम जी आणि डॉ. जोराम अनिया जी यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधानांनी डॉ.आर बालसुब्रमण्यम यांच्या ‘पॉवर विदिन: द लीडरशिप लिगसी ऑफ नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रतीवर केली स्वाक्षरी
July 17th, 09:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज डॉ. आर बालसुब्रमण्यम यांनी भेट घेतली आणि त्यांच्या ‘पॉवर विदिन: द लीडरशिप लिगसी ऑफ नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रतीवर स्वाक्षरी केली. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या प्रवासाचे वर्णन केले असून पाश्चात्य आणि भारतीय दृष्टीकोनातून त्याचा अर्थ सांगितला आहे. तसेच या दोन्हींचा समावेश करून सार्वजनिक सेवेसाठी जीवन समर्पित करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी या पुस्तकात एक मार्गदर्शक आराखडा प्रदान केला आहे.