79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मानले जगभरातील नेत्यांचे आभार

August 15th, 07:26 pm

भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल जगभरातील नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.

मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

July 26th, 06:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवच्या माले इथल्या आपल्या भेटीदरम्यान, मालदीवच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. मालदीवच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला भारतीय पंतप्रधानांनी उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती. तसेच, राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी आदरातिथ्य केलेले पंतप्रधान मोदी हे पहिले परदेशी नेते ठरले आहेत.

भारत-मालदीव राजनैतिक संबंधांच्या 60 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विशेष टपाल तिकिटांचे प्रकाशन

July 25th, 09:08 pm

भारत-मालदीव राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांनी विशेष टपाल तिकिटे जारी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली

July 25th, 08:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माले येथील राष्ट्राध्यक्ष कार्यालयात मालदीव प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली. या बैठकीपूर्वी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले आणि रिपब्लिक स्क्वेअर येथे त्यांचे औपचारिक स्वागत केले. ही भेट स्नेहमय होती, आणि दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेल्या मैत्रीचा दाखला देणारी होती.

पंतप्रधान आणि मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीचे संयुक्तपणे केले उद्घाटन

July 25th, 08:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांनी आज माले येथे मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाच्या (एमओडी) अत्याधुनिक इमारतीचे संयुक्तपणे उद्घाटन केले.

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन

July 25th, 06:00 pm

सर्वप्रथम सर्व भारतीयांच्या वतीने मी मालदीवच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्षाच्या ऐतिहासिक वर्धापन दिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष आणि मालदीवच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो.

पंतप्रधान मोदी मालदीवमध्ये माले येथे दाथल

July 25th, 10:28 am

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही वेळापूर्वीच मालदीवमध्ये आगमन झाले. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी वैयक्तिकरित्या विमानतळावर उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले. मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात पंतप्रधान सन्माननीय पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

युनायटेड किंगडम आणि मालदीव दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे प्रस्थान निवेदन

July 23rd, 01:05 pm

भारत आणि युके दरम्यान व्यापक धोरणात्मक भागीदारी असून, अलिकडच्या वर्षांत यामध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. आमचे सहकार्य व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण, शिक्षण, संशोधन, शाश्वतता, आरोग्य आणि परस्परांच्या जनतेमधील संबंध, यासह विविध क्षेत्रांमध्ये विस्तारले आहेत. पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्या बरोबरच्या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमध्ये समृद्धी, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी परस्परांबरोबरची आर्थिक भागीदारी आणखी वाढवण्याची संधी आम्हाला मिळेल. या दौऱ्या दरम्यान, किंग चार्ल्स III (तृतीय) यांची भेट घेण्यासाठी देखील उत्सुक आहे.

पंतप्रधानांची युनायटेड किंगडम आणि मालदीव भेट (23 – 26 जुलै 2025)

July 20th, 10:49 pm

पंतप्रधान मोदी 23 - 26 जुलै दरम्यान UK ला अधिकृत भेट देणार असून मालदीवचा सरकारचे निमंत्रित अतिथी म्हणून दौरा करणार आहेत. ते पंतप्रधान स्टार्मर यांच्याशी विस्तृत चर्चा करतील तसेच CSP च्या प्रगतीचा आढावा देखील घेतील. 26 जुलै रोजी मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्य वर्धापन दिन सोहळ्याचे पंतप्रधान मोदी 'सन्माननीय अतिथी' असतील. ते मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांची भेट घेणार असून त्यांच्यात परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार

January 26th, 05:56 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि अभिनंदनासाठी आभार मानले.

घोषणा आणि करारांची सूची- मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुईझ्झू यांचा भारत दौरा (06 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2024)

October 07th, 03:40 pm

भारत आणि मालदीव्ज: व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षाविषयक भागीदारीसाठीच्या दृष्टिकोनाबाबत सहमती

भारत आणि मालदीव: सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षाविषयक भागीदारीसाठी दृष्टिकोन

October 07th, 02:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझ्झू यांनी आज, 7 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या भेटीत द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा व्यापक आढावा घेतला.दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणात मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या या देशांतील ऐतिहासिक घनिष्ठ आणि विशेष संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीची देखील त्यांनी नोंद घेतली.

मालदीवचे राष्ट्रपती एच ई मोहम्मद मुइज्जू यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त वक्तव्याचा मजकूर

October 07th, 12:25 pm

दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यमांतील आमचे सहकारी, सर्वांना नमस्कार!

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार

August 15th, 09:20 pm

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा आणि शुभसंदेश पाठवणाऱ्या विविध जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.

Heads of States attend swearing-in ceremony of the Prime Minister and Council of Ministers

June 09th, 11:50 pm

The swearing-in ceremony of Prime Minister Shri Narendra Modi and the Council of Ministers took place in Rashtrapati Bhavan on 09 June 2024. Leaders from India’s neighbourhood and the Indian Ocean region participated in the ceremony as honoured guests.

पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी विविध नेत्यांची भारतभेट

June 08th, 12:24 pm

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा 9 जून 2024 रोजी शपथविधी होणार आहे. यावेळी भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशांच्या नेत्यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंगे, मालदीव्जचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोईज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंडा आणि भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोगबे यांनी या शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले आहे.

मालदीवच्या अध्यक्षांसोबत पंतप्रधानांची भेट

December 01st, 09:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी, युएई मध्ये सीओपी -28 शिखर परिषदेच्या निमित्ताने मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली.

मालदीवच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल डॉ मोहम्मद मुइज्जू यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 01st, 09:34 am

मालदीवच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दलडॉ मोहम्मद मुइज्जू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.