पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन

July 24th, 04:00 pm

आपण मनापासून केलेल्या स्वागतासाठी आणि भव्य सत्कारासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे. आज आपण चेकर्समध्ये इतिहास घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहोत. भारत आणि ग्रेट ब्रिटन मिळून नव्या अध्यायाची सुरुवात करीत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांची घेतली भेट

July 24th, 03:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 आणि 24 जुलै 2025 या कालावधीत युनायटेड किंग्डमच्या आपल्या अधिकृत भेटीदरम्यान, आज युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची भेट घेतली. बकिंगहॅमशायरमधील चेकर्स येथील युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर पंतप्रधान स्टार्मर यांनी मोदी यांचे हार्दिक स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली तसेच शिष्टमंडळ स्तरावरील चर्चाही झाली.