'मन की बात'च्या 135 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (28.06.2026)

June 28th, 11:30 am

'मन की बात' मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 चं अर्धं वर्ष आता संपत आलं आहे. या सहा महिन्यांत आपण 'मन की बात' मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे.

पंतप्रधान डॉमिनिकाच्या पंतप्रधानांना भेटले

November 21st, 09:29 pm

गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या अनुषंगाने तेथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉमिनिकाचे पंतप्रधान रुझवेल्ट स्केरीट यांची भेट घेतली.

पंतप्रधानांना डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान

November 21st, 05:39 am

कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाच्या राष्ट्रपती सिल्व्हानी बर्टन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर प्रदान केला. हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी, कोविड-19 महामारीच्या काळात डॉमिनिकाला केलेल्या मदतीसाठी आणि भारत-डॉमिनिका संबंध बळकट करण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेसाठी दिला गेला. डॉमिनिकाचे पंतप्रधान रूझवेल्ट स्केरिट या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पंतप्रधान 16 फेब्रुवारीला टेरीच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत उद्घाटनपर भाषण करणार

February 15th, 11:32 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी द एनर्जी अँड रिसोर्सेस (टेरी) या संस्थेच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेमध्ये 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून उद्घाटनपर भाषण करणार आहेत.