India-New Zealand relations are at a turning point: PM Modi at the India-New Zealand Business Event

July 11th, 08:20 am

PM Modi interacted with leading CEOs and business leaders from India and New Zealand, highlighting the vast opportunities for trade, investment and innovation. He invited New Zealand businesses to partner India's growth story and help achieve the shared goal of doubling bilateral trade to NZD 7 billion by 2030.

Prime Minister addresses business leaders in New Zealand

July 11th, 08:16 am

PM Modi interacted with leading CEOs and business leaders from India and New Zealand, highlighting the vast opportunities for trade, investment and innovation. He invited New Zealand businesses to partner India's growth story and help achieve the shared goal of doubling bilateral trade to NZD 7 billion by 2030.

हैदराबादमधील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद

November 26th, 10:10 am

“भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी जी, सफ्रान समूहाशी संबंधित सर्व मान्यवर, आणि उपस्थित बंधू-भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन

November 26th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन केले. आजपासून भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे, सफ्रानच्या या नव्या सुविधेमुळे भारत जागतिक एमआरओ अर्थात देखभाल, दुरुस्ती आणि संधारण केंद्र म्हणून उदयाला येईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे देखभाल, दुरुस्ती आणि संधारण सुविधा केंद्र युवकांसाठी उच्च तंत्रज्ञानाधारित हवाई वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपण 24 नोव्हेंबर रोजी सफ्रानच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाशी संवाद साधला होता आणि त्यांच्याबरोबर याआधीही झालेल्या चर्चेत भारताबद्दलचा त्यांचा विश्वास आणि आशा दिसून आली होती, असे पंतप्रधान म्हणाले. सफ्रानची भारतातील गुंतवणूक देखील त्याच गतीने कायम राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांची सफ्रानच्या टीमचे नवीन सुविधेबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्लीत भारत मंडपम इथे जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या पूर्ण सत्रामध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

June 02nd, 05:34 pm

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या 81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेत आपणा सर्व अतिथींचे मी भारतात स्वागत करतो, आपले अभिनंदन करतो. 4 दशकानंतर हा कार्यक्रम भारतात होत आहे. या 4 दशकात भारतात मोठे परिवर्तन झाले आहे. आजचा भारत पूर्वीपेक्षा अनेक पटीने आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. जागतिक हवाई परिसंस्थेत आम्ही केवळ एक मोठी बाजारपेठ नव्हे तर धोरण नेतृत्व, नवोन्मेश आणि समावेशक विकासाचे प्रतीकही आहोत. जागतिक अंतराळ-हवाई वाहतूक या एकत्रित क्षेत्रात भारत आज उगवते नेतृत्व आहे. गेल्या एका दशकातली भारताची नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातली झेप सर्व परिचित आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या 81व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या पूर्ण सत्राला केले संबोधित

June 02nd, 05:00 pm

जागतिक दर्जाची हवाई पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या आणि संपर्कव्यवस्था वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) 81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या (WATS) पूर्ण सत्राला संबोधित केले. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि चार दशकांनंतर हा कार्यक्रम भारतात होत असल्याचे महत्त्व अधोरेखित केले. या काळात भारतामध्ये झालेल्या परिवर्तनीय बदलांवर त्यांनी भर दिला, आणि आजचा भारत पूर्वीपेक्षा अधिक जास्त आत्मविश्वासाने युक्त असल्याचे नमूद केले.भारत केवळ एक मोठी बाजारपेठ नसून, धोरणात्मक नेतृत्व, नवनिर्मिती आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी हवाई वाहतुकीच्या जागतिक परिसंस्थेत भारताच्या भूमिकेला अधोरेखित केले. आज भारत अवकाश-विमान वाहतुकीच्या एकत्रिकरणामध्ये जागतिक नेता म्हणून उदयास येत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. गेल्या दशकात नागरी विमान वाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती झाली आहे, जे सर्वांनाच ज्ञात असल्याचेही त्यांनी सांगितले.