'मन की बात'च्या 134 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (31.05.2026)
May 31st, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत आपल्या देशातले लोक देशहितासाठी, समाजहितासाठी अशा काही अद्भूत गोष्टी करत आहेत की, जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ऍथलेटिक्समधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची येथे नॅशनल सिनियर ऍथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. यादरम्यान चार वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये चार राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदरवीर सिंह, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार. या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 3 मार्च रोजी गीर इथे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची 7 वी बैठक संपन्न
March 03rd, 04:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची 7वी बैठकही झाली.