PM Modi reiterates commitment to Divyang empowerment on International Day of Persons with Disabilities
December 03rd, 04:09 pm
On the International Day of Persons with Disabilities, PM Modi reaffirmed his commitment to ensuring dignity, accessibility and opportunity for Divyang sisters and brothers. He noted that their creativity and determination have enabled them to excel across sectors and significantly enrich India’s progress. The PM also highlighted key initiatives taken for Divyang Kalyan and assured that these efforts will continue with even greater focus in the future.दिल्लीमध्ये यशोभूमी येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 04th, 10:45 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया जी, राज्यमंत्री चंद्र शेखर पेम्मासानी जी,विविध राज्यांचे प्रतिनिधी,परदेशातून आपले अतिथी,टेलीकॉम क्षेत्रातले मान्यवर,विविध महाविद्यालयांमधून आलेले माझे युवा मित्र,महिला आणि पुरुष वर्ग,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 62,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या युवा केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ करताना, कौशल दीक्षांत समारोह कार्यक्रमाला केले संबोधित
October 04th, 10:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे कौशल्य दीक्षांत समारोहादरम्यान 62,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी देशातील आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिकणारे लाखो विद्यार्थी, तसेच बिहारमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आठवण करून दिली की काही वर्षांपूर्वी सरकारने आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात दीक्षांत समारंभ आयोजित करण्याची नवी परंपरा सुरू केली होती. आजचा दिवस त्या परंपरेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.बिहारमधील मोतीहारी येथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 18th, 11:50 am
पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण बाबा सोमोश्वरनाथाच्या चरणी वंदन करीत आहोत आणि संपूर्ण बिहारवासियांचे जीवन सुखमय-शुभ व्हावे, यासाठी त्याने आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावेत, अशी प्रार्थना करीत आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले
July 18th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. पवित्र श्रावण महिन्यात बाबा सोमेश्वरनाथांच्या चरणी नमस्कार करत पंतप्रधानांनी आशीर्वाद मागितले आणि बिहारमधील सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली. सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही चंपारणची भूमी आहे, या भूमीने इतिहासाला आकार दिला आहे. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान, या भूमीने महात्मा गांधींना एक नवीन दिशा दिली. याच भूमीतील प्रेरणा आता बिहारचे नवे भविष्य घडवेल, असे ते म्हणाले. या विकास उपक्रमांसाठी त्यांनी उपस्थित असलेल्या सर्वांचे आणि बिहारच्या जनतेला अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
June 21st, 07:06 am
आंध्र प्रदेश चे राज्यपाल सय्यद अब्दुल नजीर जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री आणि माझे परममित्र चंद्राबाबू नायडू गारू, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी के. राममोहन नायडू जी, प्रतापराव जाधव जी, चंद्रशेखरजी भूपती राजू श्रीनिवास वर्मा जी, राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण गारू, अन्य मान्यवर तसेच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो! तुम्हा सर्वांना माझा नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित
June 21st, 06:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योगसाधना सत्रात भाग घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (120 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
March 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज या अत्यंत शुभ दिवशी मला तुमच्यासोबत 'मन की बात' करण्याची संधी मिळाली आहे. आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातली प्रतिपदा तिथी आहे. आजपासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होत आहे. भारतीय नववर्ष देखील आजपासून सुरू होत आहे. यावेळी विक्रम संवत 2082 (दोन हजार ब्याऐंशी) सुरू होत आहे. सध्या तुमची अनेक पत्रं माझ्यासमोर आहेत. काही बिहारची आहेत, काही बंगालची आहेत, काही तामिळनाडूची तर काही गुजरातची आहेत. यामध्ये लोकांनी त्यांचे विचार अतिशय मनोरंजक पद्धतीनं लिहिले आहेत. अनेक पत्रांमध्ये शुभेच्छा आणि अभिनंदनाचे संदेश देखील आहेत. पण आज मला काही संदेश तुम्हाला ऐकवावेसे वाटत आहेत -गुजरातमध्ये सूरत इथे सूरत अन्न सुरक्षा संपृक्तता मोहिमेचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
March 07th, 05:34 pm
आज देशातील आणि गुजरातच्या जनतेने मला तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिली आहे हे माझे सद्भाग्य आहे. आणि त्यानंतर, ही माझी सुरतची पहिली भेट आहे. गुजरातने जे काही निर्माण केले, ते देशाने प्रेमाने स्वीकारले. मी तुमचा कायम ऋणी राहीन, माझे आयुष्य घडवण्यात तुम्ही खूप मोठे योगदान दिले आहे. आज, जेव्हा मी सुरतला आलो आहे, तेव्हा मला सुरतचा आत्मा जाणवत नाही किंवा तो मला दिसत नाही हे कसे शक्य आहे? काम आणि दान, या दोन गोष्टी सुरतला अधिक विशेष बनवतात. एकमेकांच्या पाठिशी उभे राहणे, सर्वांच्या विकासाचा आनंद साजरा करणे, हे आपल्याला सुरतच्या ठायी ठायी आढळते. आजचा हा कार्यक्रम सुरतच्या याच आत्म्याला,या भावनेला पुढे नेणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सूरत अन्न सुरक्षा संतृप्तता अभियान कार्यक्रमाचा प्रारंभ
March 07th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सूरत मधील लिंबायत येथे सूरत अन्न सुरक्षा संतृप्तता अभियान कार्यक्रमाचा प्रारंभ केला. पंतप्रधानांनी 2.3 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभ वितरित केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी सूरत शहराच्या अनोख्या स्वभावावर भर देताना तेथील कामाचा आणि औदार्याचा मजबूत पाया अधोरेखित केला. शहराचे सार विसरता येत नाही कारण ते सामूहिक समर्थनाद्वारे आणि सर्वांचा विकास साजरा करण्यातून परिभाषित केले आहे असे ते म्हणाले.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिलेले उत्तर
February 06th, 04:21 pm
आदरणीय राष्ट्रपती जी यांनी भारताच्या कामगिरीविषयी,जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षांविषयी आणि भारताच्या जनसामान्यांचा आत्मविश्वास, विकसित भारत हा संकल्प या सर्व विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे आणि देशाला आगेकूच करण्यासाठी दिशाही दाखवली आहे. आदरणीय राष्ट्रपती जी यांचे भाषण प्रेरकही होते, प्रभावीही होते आणि भविष्यासाठी काम करण्याकरिता आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शन करणारेही होते. आदरणीय राष्ट्रपती जी यांच्या संबोधनासाठी धन्यवाद देण्याकरिता मी उपस्थित आहे.Prime Minister Shri Narendra Modi’s reply to the Motion of Thanks on the President’s Address in Rajya Sabha
February 06th, 04:00 pm
PM Modi, replying to the Motion of Thanks on the President’s Address in Rajya Sabha, highlighted India’s development journey under his government since 2014. He emphasized Sabka Saath, Sabka Vikas as the guiding principle, focusing on inclusive growth, SC/ST/OBC empowerment, Nari Shakti, and economic self-reliance through initiatives like MUDRA and PM Vishwakarma Yojana.कैथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया द्वारा आयोजित ख्रिसमस समारंभातील पंतप्रधानांचे भाषण
December 23rd, 09:24 pm
आता तीन-चार दिवसापूर्वीच मी माझे सहकारी भारत सरकारमधील मंत्री जॉर्ज कुरियन जी यांच्याकडे ख्रिसमस निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आणि आज तुमच्या समवेत उपस्थित राहण्याचा आनंद मिळत आहे. कैथलिक बिशप्स कौन्फरन्स औफ इंडिया- सीबीसीआय चे हे आयोजन ख्रिसमसच्या आनंदात तुमच्याबरोबर सहभागी होण्याची ही संधी, हा दिवस आपणा सर्वांसाठी अविस्मरणीय राहणार आहे. ही संधी यासाठी देखील खास आहे, कारण याच वर्षी सीबीसीआय च्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त मी सीबीसीआय आणि त्यांच्याशी संलग्न सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या नाताळ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
December 23rd, 09:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील सीबीसीआय केंद्र परिसरातील ‘कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित केलेल्या नाताळ साजरा करण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. भारतातील कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयामध्ये होणा-या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. कार्डिनल, बिशप आणि चर्चमधील प्रमुख नेत्यांसह ख्रिश्चन समुदायातील प्रमुख नेत्यांशीही यावेळी पंतप्रधानांनी संवाद साधला.संविधानाच्या स्वीकाराला 75 वर्ष झाल्यानिमित्त लोकसभेत झालेल्या विशेष चर्चेमधले पंतप्रधानांचे संबोधन
December 14th, 05:50 pm
आपणा सर्वांसाठी आणि सर्व देशवासीयांसाठी इतकेच नव्हे तर जगभरातल्या लोकशाहीप्रेमी नागरिकांसाठीही हा अभिमानाचा क्षण आहे. लोकशाहीचा हा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा करण्याची ही वेळ आहे. संविधानाचा 75 वर्षांचा अविस्मरणीय प्रवास आणि जगातल्या सर्वात महान आणि विशाल लोकशाहीचा प्रवास, यामागे असलेली आपल्या संविधान निर्मात्यांची दूर दृष्टी, आपल्या संविधान निर्मात्यांचे योगदान घेऊन आपण आज आगेकूच करत आहोत. 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उत्सव साजरा करण्याचा हा क्षण आहे.संसदही या उत्सवात सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करत आहे याचा मला आनंद आहे. मी सर्व माननीय सदस्यांचे आभार मानतो. ज्यांनी या उत्सवात सहभाग घेतला त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.संविधान स्विकृतीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला केले संबोधित
December 14th, 05:47 pm
संविधान स्विकृतीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत विशेष चर्चासत्राला संबोधित केले. आपण लोकशाहीचा हा उत्सव साजरा करत आहोत, ही भारतातील सर्व नागरिकांसाठी आणि लोकशाहीचा आदर करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांसाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे असे उद्गार मोदी यांनी सभागृहाला संबोधित करताना काढले. आपल्या राज्यघटनेच्या 75 वर्षांच्या या उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण प्रवासात आपल्या राज्यघटनेच्या रचनाकारांची दूरदृष्टी, द्रष्टेपणाचे आणि प्रयत्नांचे आभार मानून ते म्हणाले की, 75 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. हा सोहळा साजरा करण्यात संसद सदस्यही सहभागी होत आहेत आणि आपले विचार व्यक्त करत आहेत याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला तसेच त्यांचे आभार मानले आणि अभिनंदन केले.स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मजकूर
December 11th, 05:00 pm
मी लाल किल्ल्यावरून बोलताना नेहमी एका गोष्टीचा उल्लेख केला आहे तो तुमच्या लक्षात असेलच. हे म्हणालो होतो ‘सबका प्रयास’, आजचा भारत सर्वांच्या प्रयत्नांनीच जलद गतीने प्रगती करू शकतो. आजचा हा दिवस याचेच उदाहरण आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’च्या या ग्रँड फिनाले ची मला बरेच दिवसांपासून प्रतीक्षा होती. जेव्हा जेव्हा मला तुमच्यासारख्या युवा नवोन्मेषकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते, मला खूप काही जाणून घेण्याची शिकण्याची आणि समजून घेण्याची नामी संधी मिळते. माझ्या तुम्हा सगळ्यांकडून खूप काही अपेक्षा देखील असतात. 21 व्या शतकातील भारताकडे पाहण्याचा तुम्हा सर्व नवोन्मेषकांचा दृष्टिकोन वेगळाच आहे आणि म्हणूनच तुमचे पर्याय देखील वेगळेच असतात. म्हणूनच जेव्हा तुमच्यासमोर नवीन आव्हाने उभी राहतात तेव्हा तुम्ही त्यांचे नवीन आणि अनोख्या प्रकारचे उत्तर शोधून काढता. मी यापूर्वी देखील अनेक हॅकेथॉन’चा भाग झालो होतो. तुम्ही माझी कधीही निराशा केली नाही. नेहमीच माझा विश्वास वाढवला आहे. तुमच्या पूर्वीचे जे संघ होते, त्यांनी पर्याय शोधून काढले होते. आज ते पर्याय वेगवेगळ्या मंत्रालयात खूप कमी येत आहेत. आता या हॅकेथॉन मध्ये देशाच्या विविध भागातून आलेले संघ काय करत आहेत? मी मी तुमच्या नवोन्मेषाबाबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. चला तर मग सुरुवात करू, सर्वप्रथम कोण आमच्याशी संवाद साधणार आहे?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मधील सहभागींशी साधला संवाद
December 11th, 04:30 pm
नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये तरुण नवोन्मेषकर्त्यांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधला. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात आपण दिलेल्या 'सबका प्रयास' या मंत्राचा पुनरुच्चार केल्याची आठवण पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना करून दिली. आजचा भारत सबका प्रयास अर्थात सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी प्रगतीच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करू शकतो आणि आजचा उपक्रम हे त्याचेच उदाहरण आहे, असे ते म्हणाले. आपण स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होतो असे सांगून पंतप्रधान म्हणाले की युवा नवोन्मेषीच्या बरोबर असताना आपल्याला नेहमीच काहीतरी शिकण्याची आणि त्यांच्याकडून काहीतरी नवीन गोष्ट समजून घेण्याची संधी मिळते. आपल्याला तरुण नवोन्मेषांकडून खूप अपेक्षा असून त्यांच्याकडे एकविसाव्या शतकातील भारताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले. तुमचे उपाय वेगळे असतात आणि म्हणूनच जेव्हा एखादे नवीन आव्हान उभे राहते तेव्हा तुम्ही नवीन आणि अभिनव उपाय सादर करता असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही हॅकेथॉनला आपण उपस्थित होतो याचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की या उपक्रमातून मिळालेल्या यशाने आपल्याला कधीच निराश केले नाही. “तुम्ही माझा विश्वास वाढवला आहे”, हे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की याआधीचे अभिनव उपाय विविध मंत्रालयांमध्ये अंमलात आणले जात आहेत. आपल्याला सहभागींबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल असे सांगत पंतप्रधानांनी संवादाला सुरुवात केली.पंतप्रधानांनी सुगम्य भारत अभियानाला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा
December 03rd, 04:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुगम्य भारत अभियानाला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. दिव्यांग भगिनी आणि बंधूंसाठी सुलभता,समानता आणि संधी वाढवण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.दिव्यांग भगिनी आणि बंधूंच्या मनोधैर्याचे आणि कर्तृत्वाचे कौतुक करताना मोदी यांनी आपल्या सर्वांना त्याचा अभिमान वाटतो असे नमूद केले.