पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्या देशमुखचे ग्रँडमास्टर झाल्याबद्दल अभिनंदन केले.

July 29th, 06:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्या देशमुख हिचे 2025 फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकण्याबरोबरच ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तिची हि कामगिरी अनेकजणांना प्रेरणा देईल आणि युवावर्गामध्ये बुद्धिबळ या खेळाविषयी लोकप्रियता आणखी वाढेल. असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावणाऱ्या दिव्या देशमुखचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

July 28th, 06:29 pm

फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावल्याबद्दल दिव्या देशमुख हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. “कोनेरू हम्पी हिनेही संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा”, असे मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये ब्लिट्झ उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवल्याबद्दल दिव्या देशमुखचे केले अभिनंदन

June 19th, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचे लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये ब्लिट्झ उपांत्य फेरीच्या सेकंड लेगमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या हौ यिफान’वर ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले.