पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील दिब्रुगड इथे ईशान्य भारतातील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे (ELF) उद्घाटन
February 14th, 07:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड इथे ईशान्य भारतातील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे (Emergency Landing Facility - Elf - आपत्कालीन परिस्थितीत विमानं उतरवण्याच्या धावपट्ट्या) उद्घाटन झाले. ईशान्य भारताला अशी आपत्कालीन लँडिंग सुविधा मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. धोरणात्मक दृष्टिकोनातून आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात ही सुविधा अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.पंतप्रधान 14 फेब्रुवारी रोजी देणार आसामला भेट
February 13th, 11:38 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2026 रोजी आसामला भेट देतील. सकाळी 10:30 वाजता, पंतप्रधान दिब्रुगडमधील मोरन बायपासवरील आपत्कालीन लँडिंग प्लॅटफॉर्मवर (ईएलएफ) पंतप्रधान उतरतील, तेथे ते लढाऊ विमाने, वाहतूक आणि हेलिकॉप्टर यांची हवाई प्रात्यक्षिके पाहतील. दुपारी 1 वाजता, पंतप्रधान ब्रह्मपुत्रा नदीवरील कुमार भास्कर वर्मा सेतूला भेट देतील. त्यानंतर, दुपारी 1:30 वाजता, पंतप्रधान गुवाहाटीतील लाचित घाट येथे 5,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवतील.Towards 2030: A Joint India-European Union Comprehensive Strategic Agenda
January 27th, 06:48 pm
The Joint India-EU Comprehensive Strategic Agenda, endorsed at the 16th India-EU Summit held on 27 January 2026 in New Delhi, aims to further reinforce the strategic partnership by broadening, deepening and better coordinating EU-India cooperation to deliver mutually beneficial, concrete and transformative outcomes for both partners and for the wider world.India - EU Joint Statement on the State Visit of European Council President and European Commission President to India and the 16th India-EU Summit
January 27th, 06:15 pm
At the invitation of PM Modi, European Council President António Costa and European Commission President Ursula von der Leyen paid a State Visit to India as Chief Guests for the 77th Republic Day of India. During the visit, the leaders hailed the successful conclusion of negotiations on the landmark India–EU FTA and adopted the “Towards 2030: India–EU Joint Comprehensive Strategic Agenda.”यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष यांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या करार, घोषणा, इत्यादींची सूची
January 27th, 02:53 pm
2030 च्या दिशेने : भारत -यूरोपीय संघ संयुक्त सर्वसमावेशक धोरणात्मक कार्यक्रमपंतप्रधानांनी रायपूर येथील 60 व्या अखिल भारतीय पोलिस महासंचालक/ महानिरीक्षकांच्या परिषदेचे भूषवले अध्यक्षपद
November 30th, 05:17 pm
पंतप्रधानांनी पोलिसांच्या प्रति असलेली लोकांची धारणा बदलण्याची तातडीची गरज व्यक्त केली. विशेषतः युवकांमध्ये व्यावसायिकता, संवेदनशीलता आणि प्रतिसादक्षमता वाढवून हे साध्य करण्याचे त्यांनी सुचवले. त्यांनी शहरी पोलिसिंग मजबूत करणे, पर्यटन पोलिस व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे आणि वसाहतवादी कालखंडातील फौजदारी कायद्यांची जागा घेणाऱ्या नव्याने लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यासंबंधी सार्वजनिक जागरूकता वाढवण्याची गरज अधोरेखित केली.रायपूर येथे 29-30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 60 व्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषदेत पंतप्रधान होणार सहभागी
November 27th, 12:45 pm
पंतप्रधान 29-30 नोव्हेंबर 2025 रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) येथे होणाऱ्या 60 व्या अखिल भारतीय पोलिस महासंचालक/महानिरीक्षकांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत.जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन: सत्र 2
November 22nd, 09:57 pm
नैसर्गिक आपत्ती या मानवतेसाठी खूप मोठे आव्हान बनल्या आहेत. या वर्षीही नैसर्गिक आपत्तींमुळे जगातील लोकसंख्येच्या एका मोठ्या भागावर परिणाम झाला आहे. नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी जागतिक सहकार्य अधिक बळकट करण्याची गरज यावरून स्पष्ट होते.आंध्रप्रदेश मधल्या पुट्टपर्थी इथे श्री सत्य साई बाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यामधले पंतप्रधानांचे संबोधन
November 19th, 11:00 am
मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडू, केंद्रातले माझे सहकारी राममोहन नायडू, जी. किशन रेड्डी, भूपति राजू श्रीनिवास वर्मा, सचिन तेंडुलकर जी, उपमुख्यमंत्री पवन कल्याण जी, राज्य सरकारमधले मंत्री नारा लोकेश जी, श्री सत्य साईं सेंट्रल ट्रस्ट चे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. जे. रत्नाकर जी, कुलगरू के. चक्रवर्ती जी, ऐश्वर्या जी, इतर मान्यवर आणि स्त्री-पुरुषहो, साईं राम!श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले
November 19th, 10:30 am
भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात “साई राम” उच्चारून केली आणि पुट्टपर्थीच्या पवित्र भूमीवर सर्वांमध्ये उपस्थित राहणे हा अत्यंत भावनिक आणि अध्यात्मिक अनुभव आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. थोड्या वेळापूर्वी बाबांच्या समाधीवर पुष्पांजली वाहण्याची संधी मिळाली असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. बाबांच्या चरणांशी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर अंतःकरण भरून येते यावर त्यांनी भर दिला.नवा रायपूर येथे शांती शिखर- ब्रह्माकुमारी ध्यान केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 01st, 11:15 am
ॐ शांती! छत्तीसगडचे राज्यपाल रमन डेका जी, राज्याचे लोकप्रिय आणि ऊर्जावान मुख्यमंत्री विष्णू देव साय जी, राजयोगिनी भगिनी जयंती जी, राजयोगी मृत्युंजय जी, सर्व ब्रह्मकुमारी भगिनी, येथे उपस्थित असलेले इतर मान्यवर, स्त्री-पुरुष हो!पंतप्रधानांच्या हस्ते छत्तीसगढमधील नवा रायपूर येथील ‘शांती शिखर’ या ध्यान केंद्राचे उद्घाटन, ब्रह्मकुमारींनाही केले संबोधित
November 01st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज छत्तीसगढमधील नवा रायपूर येथे आध्यात्मिक शिक्षण, शांतता आणि ध्यानधारणेसाठीच्या ‘शांती शिखर’ या आधुनिक केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी ब्रह्मकुमारींना संबोधितही केले. छत्तीसगढच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली असल्याने आजचा दिवस अत्यंत विशेष आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केले. आज देशभरातील अनेक राज्ये आपला राज्य स्थापना दिवस साजरा करत असल्याचे सांगून, छत्तीसगढसोबतच, झारखंड आणि उत्तराखंड या राज्यांच्या स्थापनेलाही 25 वर्षे पूर्ण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पंतप्रधानांनी या सर्व राज्यांच्या नागरिकांना त्यांच्या राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. राज्यांचा विकास राष्ट्राच्या प्रगतीला चालना देतो, या मार्गदर्शक तत्त्वानेच प्रेरित होऊन आपण विकसित भारताच्या निर्मितीच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले
October 31st, 06:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मध्ये रोहिणी येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, आत्ताच ऐकलेल्या मंत्रांची ऊर्जा आपल्या सर्वांना अजूनही जाणवत आहे. आपण जेव्हा अशा संमेलनात येतो तेव्हा आपल्याला दैवी आणि विलक्षण अनुभव येतो, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी या भावनेचे श्रेय स्वामी दयानंद यांच्या आशीर्वादाला दिले. पंतप्रधानांनी स्वामी दयानंद यांच्या आदर्शांबद्दल आदर व्यक्त केला. उपस्थित सर्व विचारवंतांबरोबरच्या अनेक दशकांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे आपल्याला वारंवार त्यांच्यामध्ये येण्याची संधी मिळत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की जेव्हा ते त्यांना भेटतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा आणि एक अनोखी प्रेरणा निर्माण होते.दार्जिलिंग परिसरातल्या पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन
October 05th, 04:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दार्जिलिंग आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.फिलीपिन्समध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
October 01st, 03:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिलीपिन्समध्ये भूकंपामुळे झालेली जीवितहानी आणि मोठ्या नुकसानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.पंतप्रधान 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात होणार सहभागी
September 30th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10: 30 वाजता नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील. या प्रसंगी, पंतप्रधान राष्ट्रासाठी आरएसएसच्या योगदानावर प्रकाश टाकणारे विशेषत्वाने तयार केलेले स्मारक टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित करतील आणि सभेला संबोधित करतील.पंतप्रधान 11 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या दौऱ्यावर
September 10th, 01:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडला भेट देणार आहेत.पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशात पूर आणि मुसळधार पावसामुळे प्रभावित भागाची केली हवाई पाहणी
September 09th, 03:01 pm
हिमाचल प्रदेशात ढगफुटी, पाऊस आणि भूस्खलनामुळे उद्भवलेली पूर परिस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी हिमाचल प्रदेशला भेट दिली.गुजरातमधील अहमदाबाद येथे विविध विकास योजनांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 25th, 06:42 pm
तुम्ही सर्वांनी आज छान वातावरण निर्मिती केली आहे. अनेक वेळा माझ्या मनात विचार येतो की मी किती नशीबवान आहे, ज्यामुळे मला लाखो लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभत आहेत. मी तुम्हा सर्वांचे कितीही आभार मानले तरीही ते कमीच आहेत. पहा तिकडे कोणी छोटा नरेंद्र उभा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद, गुजरात येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
August 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, संपूर्ण देश सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाने भरलेला आहे. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आज गुजरातच्या प्रगतीशी जोडलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे. त्यांनी सांगितले की, अनेक प्रकल्प जनतेच्या चरणी समर्पित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे आणि या विकास उपक्रमांसाठी त्यांनी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन केले.