पंतप्रधानांची इंडोनेशियाच्या अध्यक्षांसोबत अधिकृत चर्चा
July 07th, 02:51 pm
इंडोनेशियाच्या आपल्या अधिकृत शासकीय दौऱ्याचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांनी इस्तना मर्डेका (राष्ट्रपती भवन) येथे उत्साहात स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. जानेवारी 2025 मध्ये भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून अध्यक्ष प्रबोवो यांनी केलेल्या भारत दौऱ्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.New India's resolve helped overcome the 21st century's biggest energy crisis: PM Modi in Balotra, Rajasthan
July 04th, 12:50 pm
Addressing a public gathering in Balotra, Rajasthan, PM Modi highlighted Rajasthan's development journey, including the dedication of the Rajasthan Refinery, expansion of connectivity, water projects, renewable energy and employment initiatives. He also spoke about India's efforts to ensure energy security during the global crisis and reaffirmed the government's commitment to a self-reliant India.राजस्थानातील बालोत्रा येथे सुमारे 1.06 लाख कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी
July 04th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील बालोत्रा येथे सुमारे 1.06 लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी, या विकास प्रकल्पांमध्ये सर्वांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. रणरणत्या उन्हातही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधान, या अभूतपूर्व गर्दीला सध्याच्या शासनावर जनतेने लावलेली विश्वासाची मोहोर, असे म्हणाले. तुमच्या या अफाट पाठिंब्याबद्दल मी राजस्थानच्या मातीचा सदैव ऋणी राहीन. हे तुमचे प्रेम आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर असलेल्या अतूट विश्वासाची साक्ष देते, अशा शब्दांत मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.पंतप्रधानांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला
June 30th, 09:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्यात आज दूरध्वनीवरून संवाद झाला.सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीतील पंतप्रधानांचे भाषण
June 28th, 05:00 pm
पंतप्रधान म्हणून मी हिंदी महासागर क्षेत्रातील ज्या देशाला 2015 मध्ये सर्वप्रथम भेट दिली होती, तो देश म्हणजे 'सेशेल्स' होता. माझी ती पहिली आफ्रिका भेटही होती. मी इथे आलो कारण माझा हा दृढ विश्वास होता की, हिंदी महासागराबाबतच्या भारताच्या दृष्टिकोनात सेशेल्सला एक अतिशय विशेष स्थान आहे. आज, एका दशकानंतर जेव्हा मी इथे पुन्हा आलो आहे, तेव्हा माझा हा विश्वास पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाला आहे.India-France partnership is emerging as a strong pillar of trust, stability and cooperation: PM Modi in Paris
June 18th, 11:41 pm
Addressing the Indian community in Paris, PM Modi highlighted India’s transformative growth over the past 12 years across infrastructure, digital technology, manufacturing, defence, space, innovation, healthcare and social development. He underscored the growing strength of the India-France Strategic Partnership, praised the Indian diaspora for serving as a vital bridge between the two nations and highlighted yoga and football as bonds connecting India and France.पॅरीसमधील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन
June 18th, 09:30 pm
पंतप्रधानांनी 18 June 2026 रोजी पॅरीस इथे जमलेल्या भारतीय समुदायाला संबोधित केले. पंतप्रधानांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच उत्साहाने आणि रंगतदार स्वागत करण्यात आले. हे स्वागत मातृभूमीप्रती भारतीय समुदायाच्या मनातील आत्मीयतेचे प्रतिबिंब होते.जी-7 शिखर परिषदे निमित्त पंतप्रधानांनी घेतली संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांची भेट
June 17th, 12:38 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील एव्हियन इथे आयोजित, जी-7 शिखर परिषदेदरम्यान संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. 2026 या वर्षभरातील, उभय नेत्यांची ही तिसरी भेट होती. ही भेट भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील दृढ आणि गतिमान 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी'चं प्रतीक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कुवेतचे अमीर यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
June 09th, 03:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर, महामहिम शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
May 23rd, 04:20 pm
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.Joint Statement on the State Visit of the President of the Republic of Cyprus
May 22nd, 09:31 pm
At the invitation of PM Modi, Cyprus President Nikos Christodoulides is on a State Visit to India, during which they held discussions on a wide range of issues. The two leaders agreed to elevate the bilateral Comprehensive Partnership to a Strategic Partnership and welcomed the significant progress made in the implementation of the India-Cyprus Joint Action Plan 2025-2029. President Christodoulides congratulated PM Modi on the successful hosting of the AI Impact Summit 2026.इटलीच्या पंतप्रधानांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन
May 20th, 05:00 pm
रोम, हे जगातील शाश्वत शहर म्हणून ओळखले जाते. भारतातील माझा लोकसभा मतदारसंघ, काशी, हे देखील एक शाश्वत आणि चिरंतन शहर मानले जाते. जेव्हा दोन संस्कृती एकत्र येतात, तेव्हा संवाद केवळ कार्यक्रम पत्रिकेपुरता मर्यादित राहत नाही. यामध्ये इतिहासाची खोली, भविष्याची दूरदृष्टी आणि मैत्रीची सहजता, या तिन्ही गोष्टी एकत्र दिसून येतात.नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 18th, 04:44 pm
मी गेल्या वर्षीच नॉर्वेच्या दौऱ्यावर येणार होतो, मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे तो दौरा मला स्थगित करावा लागला. त्या कठीण कालखंडात नॉर्वेने दहशतवादाविरोधात भारतासोबत खंबीरपणे उभे राहून खऱ्या मैत्रीची प्रचिती दिली. आज नॉर्वेमध्ये आलेलो असताना, त्या वेळी दाखवलेल्या एकजुटीबाबत मी मनापासून आभार व्यक्त करतो.भारताच्या पंतप्रधानांच्या नेदरलँड्स भेटीनिमित्त भारत-नेदरलँड्स संयुक्त निवेदन
May 17th, 03:45 am
16 मे रोजी सकाळी नेदरलँड्सचे राजे विलियम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांनी द्विपक्षीय बैठकीसाठी हेग येथील ह्युस्टन बॉस रॉयल पॅलेस येथे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. महाराजांनी पंतप्रधान मोदींसमवेत भोजन घेतले.रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
May 14th, 04:43 pm
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्यांचा केला निषेध, शांतता आणि प्रादेशिक स्थिरतेला भारताच्या समर्थनाचा केला पुनरुच्चार
May 05th, 01:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत.भारत आणि कोरिया प्रजासत्ताक यांच्यातील विशेष धोरणात्मक भागीदारीसाठी संयुक्त धोरणात्मक दृष्टिकोन
April 20th, 10:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून, कोरिया प्रजासत्ताकचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी 19 ते 21 एप्रिल 2026 या कालावधीत भारताचा औपचारिक दौरा केला. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर इतक्या लवकर भारताला भेट देणारे ते कोरियाचे पहिले राष्ट्रपती ठरले. राष्ट्रपती ली जे म्युंग यांच्यासोबत मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि कोरियाच्या अग्रणी कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश असलेले एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ होते.पश्चिम आशियामध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे लोकसभेत निवेदन
March 23rd, 02:15 pm
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आणि त्यामुळे भारतासमोर निर्माण झालेली आव्हाने यावर बोलण्यासाठी या प्रतिष्ठित सदनात मी उपस्थित आहे. सध्याची पश्चिम आशियाची परिस्थिती चिंताजनक आहे. मागच्या दोन -- तीन आठवड्यांमध्ये जयशंकर जी आणि हरदीप पुरी जी यांनी या विषयावर सदनाला आवश्यक ती माहिती दिली आहे. या संकटाला आता 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. याचा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर, लोकांच्या जीवनावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे म्हणूनच संपूर्ण जग, या संकटावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी सर्व संबंधित पक्षांना आवाहन करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पश्चिम आशियातील संघर्षावर लोकसभेत निवेदन
March 23rd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर आणि त्यामुळे भारतासमोर उभ्या राहिलेल्या व्यापक आव्हानांवर आज लोकसभेत निवेदन केले. हे संकट आता तीन आठवड्यांहून अधिक काळ सुरू राहिले असून, त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि मानवी जीवनावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहेत, असे नमूद करत पंतप्रधानांनी या समस्येच्या तातडीने निराकरणावर भर दिला. परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करताना मोदी म्हणाले, संपूर्ण जग सर्व पक्षांना हे संकट लवकरात लवकर सोडवण्याचे आवाहन करत आहे.पंतप्रधानांनी जॉर्डनच्या राजांशी साधला संवाद
March 19th, 07:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे राजे महामहिम अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला; यावेळी आगामी सणांच्या निमित्ताने एकमेकांत शुभेच्छांची देवाणघेवाण केली, तसेच पश्चिम आशिया क्षेत्रातील बदलत्या सुरक्षा परिस्थितीवर उभय नेत्यांनी चर्चा केली.