
भारत-क्रोएशिया नेत्यांचे निवेदन
June 19th, 06:06 pm
क्रोएशिया प्रजासत्ताकचे पंतप्रधान महामहीम आंद्रेज प्लेन्कोविच यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी क्रोएशियाचा 18 जून 2025 रोजी सरकारी दौरा केला. दोन्ही देशांमधली वाढती उच्च स्तरीय देवाणघेवाण अधिक बळकट करण्यासाठी भारतीय पंतप्रधानांनी क्रोएशियाला दिलेली ही पहिलीच भेट होती.
मुंबईतील वेव्हज परिषदमध्ये पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
May 01st, 03:35 pm
वेव्हज परिषदे मध्ये उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, एल. मुरुगन जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सृजनशील विश्वातील सर्व मान्यवर, विविध देशांतून आलेले माहिती, संवाद, कला आणि संस्कृती विभागांचे मंत्री, विविध देशांचे राजदूत, जगभरातील सृजनशील विश्वातील चेहरे, इतर मान्यवर, बंधूंनो आणि भगिनींनो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्हज 2025 चे उद्घाटन
May 01st, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी आज साजरा होत असलेल्या महाराष्ट्र दिन आणि गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व आंतरराष्ट्रीय मान्यवर, राजदूत आणि सृजनशील उद्योगातील अग्रणींच्या उपस्थितीचे कौतुक करत, पंतप्रधानांनी या मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित केले. 100 हून अधिक देशांचे कलाकार, नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते, प्रतिभा आणि सृजनशीलतेच्या जागतिक परिसंस्थेचा पाया रचण्यासाठी एकत्र आले आहेत यावर त्यांनी भर दिला. वेव्हज ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे तर संस्कृती, सृजनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीचे प्रतिनिधित्व करणारी एक लाट आहे, असे त्यांनी नमूद केले. ही शिखर परिषद चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन आणि कथाकथनाच्या विस्तृत जगाचे प्रदर्शन करते, तसेच कलाकार आणि सर्जकांचा संवाद साधून त्यांच्या सहयोगासाठी एक जागतिक मंच प्रदान करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पंतप्रधानांनी या ऐतिहासिक प्रसंगी सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि देश-विदेशातील मान्यवर अतिथींचे हार्दिक स्वागत केले.पंतप्रधान 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र, केरळ आणि आंध्र प्रदेशला देणार भेट
April 30th, 03:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र, केरळ आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना भेट देतील. पंतप्रधान 1 मे रोजी मुंबईला भेट देतील आणि सकाळी 10:30 वाजता त्यांच्या हस्ते जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन करण्यात येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस येथे एआय-कृती शिखर परिषदेत केलेले उद्घाटनपर भाषण
February 11th, 03:15 pm
जर तुम्ही तुमचा मेडिकल रिपोर्ट एआय ऍपवर अपलोड केला तर तो तुम्हाला साध्या भाषेत कोणत्याही अडचणीविना तुमच्या आरोग्याची माहिती समजावून सांगू शकतो. पण याच ऍपला जर तुम्ही एका अशा व्यक्तीचे चित्र काढायला सांगितले जी व्यक्ती तिच्या डाव्या हाताने लिहीत आहे तर बहुधा हे ऍप उजव्या हाताने लिहीणाऱ्या माणसाचे चित्र काढेल.याचे कारण म्हणजे ते पूर्णपणे याच ट्रेनिंग डेटावर आधारित आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले पॅरिसमधील एआय-कृती शिखर परिषदेचे सह अध्यक्षपद
February 11th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ यांच्यासह पॅरिसमध्ये एआय कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवले. एक आठवडाभर चालणाऱ्या या शिखर परिषदेची 6-7 फेब्रुवारी या विज्ञान दिनी सुरुवात झाली. त्यानंतर 8-9 फेब्रुवारीला सांस्कृतिक सप्ताहांचे आयोजन झाले. जागतिक नेते, धोरणकर्ते आणि उद्योग धुरीण यांच्या उपस्थितीत एका उच्च स्तरीय कार्यक्रमात तिचा समारोप झाला.भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.
January 14th, 10:45 am
केंद्रीय मंत्री मंडळातील माझे सोबती डॉ. जितेंद्र सिंह जी, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासचिव प्रोफेसर सेलेस्ते साउलो जी, परदेशातून आलेले आपले विशेष अतिथी गण, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन जी, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा जी, इतर महानुभाव, सर्व वैज्ञानिक आणि विविध विभाग तसेच संस्थांचे अधिकारी, बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभाला केले संबोधित
January 14th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभाग घेतला.