ओमानमधील भारतीय विद्यार्थी आणि भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर

December 18th, 12:32 pm

तुम्हा युवकांचा जोश आणि ही ऊर्जा, इथले सारे वातावरण खऱ्या अर्थाने चैतन्यमय झाले आहे. या सभागृहात पुरेशी जागा नसल्यामुळे जे बंधू आणि भगिनी आत येऊ शकले नाहीत व जवळच्या हॉल मध्ये स्क्रीनवर हा प्रोग्रॅम लाईव्ह पाहत आहेत, त्यांनाही मी नमस्कार करतो. तुम्ही कल्पना करू शकता की इथपर्यंत येऊनही त्यांना सभागृहात प्रवेश मिळू न शकल्याने त्यांच्या मनात काय भावना असतील, याची आपण कल्पनाच करू शकतो.

पंतप्रधानांनी ओमानमधील भारतीय समुदायाला केले संबोधित

December 18th, 12:31 pm

पंतप्रधानांनी आज मस्कतमध्ये भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाला संबोधित केले. या श्रोत्यांमध्ये विविध भारतीय शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे वर्ष ओमानमधील भारतीय शाळांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे, कारण यंदा या देशातील आपला 50 वा वर्धापनदिन त्या साजरा करत आहेत.

मुंबईत येथे आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल’ मध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

October 09th, 02:51 pm

माननीय पंतप्रधान कीर स्टार्मर, आरबीआयचे गव्हर्नर, फिनटेक विश्वातील नवप्रवर्तक, नेतेमंडळी, उद्योग जगतातील दिग्गज आणि गुंतवणूकदार, भगिनी आणि बंधूंनो! मुंबईत आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 कार्यक्रमाला संबोधित केले

October 09th, 02:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत पंतप्रधान मोदी यांनी उर्जावान शहर, उद्योगांचे शहर आणि अमर्याद शक्यतांचे शहर अशा शब्दांत मुंबईचे वर्णन केले. त्यांनी त्यांचे मित्र पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे खास स्वागत केले आणि ग्लोबल फिनटेक महोत्सवाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी वेळ काढल्याबद्दल विशेष उल्लेख केला.

उत्तर प्रदेशात ग्रेटर नॉयडा येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 25th, 10:22 am

यूपी इंटरनॅशनल ट्रेड शोमध्ये सहभागी झालेले सर्व व्यापारी, गुंतवणूकदार, उद्योजक आणि तरुण मित्रांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. येथे 2200 पेक्षा अधिक प्रदर्शक आपल्या उत्पादनांचे आणि सेवांचे प्रदर्शन करत आहेत, याचा मला आनंद वाटत आहे. यंदाच्या ट्रेड शोचा भागीदार देश रशिया आहे. म्हणजेच, या ट्रेड शोच्या माध्यमातून आपण काळाच्या कसोटीवर पारखलेली एक भागीदारी आणखी बळकट करत आहोत. मुख्यमंत्री योगीजींना, सरकारमधील इतर सर्व सहकाऱ्यांना आणि हितधारकांना या कार्यक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाला केले संबोधित

September 25th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन 2025 याचे आज उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व व्यापारी, गुंतवणूकदार, उद्योजक आणि तरुण प्रतिनिधींचे स्वागत केले.या कार्यक्रमात 2,200 हून अधिक प्रदर्शक त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करत आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. रशिया हा या व्यापार प्रदर्शनातील भागीदार देश आहे, जो काळाच्या कसोटीवर उतरलेल्या भागीदारीच्या सबलीकरणावर भर देतो, असे मोदींनी यावेळी अधोरेखित केले.या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शासकीय अधिकारी आणि इतर भागधारकांचे अभिनंदन केले. हा दिवस पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी आला आहे,ज्यांनी राष्ट्राला अंत्योदय - म्हणजे तळागाळातील शेवटच्या व्यक्तीचा उत्कर्ष साधण्यासाठी मार्गदर्शन केले, असे पंतप्रधानांनी नमूद केले.अंत्योदय म्हणजे विकास हा गरिबातल्या गरीबापर्यंत पोहोचणे, सर्व प्रकारच्या भेदभावाचे उच्चाटन करणे, यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि भारत आता जगाला सर्व समावेशक विकासाचे हेच प्रारुप असल्याचे दाखवून देत आहे,असे ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बेंगलुरू येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच उद्घाटन करताना केलेले भाषण

August 10th, 01:30 pm

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिध्दरमैया, केंद्रातील माझे सहकारी मनोहरलाल खट्टर, एच डी कुमारस्वामी, अश्विनी वैष्णव, व्ही सोमण्णा, शोभा जी, उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार, कर्नाटक सरकारचे मंत्री बी. सुरेश, विरोधी पक्षनेते आर अशोक, खासदार तेजस्वी सूर्या, डॉक्टर मंजूनाथ, आमदार विजयेंद्र येडियुरप्पा, आणि कर्नाटकमधील माझ्या बंधू, भगिनींनो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकमधील बंगळूरु इथे सुमारे 22,800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

August 10th, 01:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकमध्ये बंगळूरु इथे सुमारे 7,160 कोटी रुपये खर्चाच्या बंगळूरु मेट्रोच्या यलो लाइनचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी 15,610 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बंगळूरु मेट्रो टप्पा -3 प्रकल्पाची पायाभरणीही केली. यासोबतच त्यांनी के.एस.आर. रेल्वे स्थानकावर तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडाही दाखवला.

कुवेतमधील भारतीय समुदायाशी संवादाचा कार्यक्रम ‘हाला मोदी’ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

December 21st, 06:34 pm

मी आत्ताच अवघ्या अडीच तासांपूर्वी कुवेतला पोहोचलो आणि इथे पाऊल ठेवल्यापासून आजूबाजूला एक वेगळीच आपुलकी, एक वेगळीच मायेची ऊब जाणवत आहे. तुम्ही सर्व भारतातील विविध राज्यांतून आला आहात. पण तुम्हा सगळ्यांकडे बघून असं वाटतंय की जणू भारताचे लघुरूपच (मिनी इंडिया) माझ्यासमोर उभे राहिले आहे. इथे भारताच्या उत्तर-दक्षिण-पूर्व पश्चिमे कडील प्रत्येक प्रदेशातून वेगवेगळ्या भाषा आणि बोली बोलणारे लोक माझ्यासमोर दिसत आहेत. पण प्रत्येकाच्या हृदयात एकच पडसाद आहे…. प्रत्येकाच्या हृदयात एकच निनाद आहे - भारत मातेचा विजय असो….,.भारत मातेचा विजय असो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमध्ये 'हाला मोदी' या कार्यक्रमात भारतीय समुदायाला केले संबोधित

December 21st, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतमधील शेख साद अल - अब्दुल्ला या क्रीडा संकुलात आयोजित 'हाला मोदी' या विशेष कार्यक्रमात मोठ्या संख्येने आलेल्या, कुवेतमध्ये स्थायिक भारतीय समुदायाला संबोधित केले. कुवेतमधील तिथल्या समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

India - Sri Lanka Joint Statement: Fostering Partnerships for a Shared Future

December 16th, 03:26 pm

Prime Minister of India His Excellency Shri Narendra Modi and President of Sri Lanka His Excellency Anura Kumara Dissanayake had comprehensive and fruitful discussions at their meeting in New Delhi on 16 December 2024, during the latter’s State Visit to the Republic of India.

दुसऱ्या भारत - कॅरिकॉम परिषदेतील पंतप्रधानांच्या उद्घाटनपर भाषणाचा मराठी अनुवाद

November 21st, 02:15 am

राष्ट्राध्यक्ष इरफान अली आणि पंतप्रधान डिकन मिशेल यांच्यासह दुसऱ्या भारत – कॅरिकॉम परिषदेचे आयोजन करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी, कॅरिकॉम परिवारातल्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि परिषेदच्या उत्कृष्ट आयोजनासाठी राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांचे विशेष आभार मानतो.

PM Modi attends Second India CARICOM Summit

November 21st, 02:00 am

PM Modi and Grenada PM Dickon Mitchell co-chaired the 2nd India-CARICOM Summit in Georgetown. PM Modi expressed solidarity with CARICOM nations for Hurricane Beryl's impact and reaffirmed India's commitment as a reliable partner, focusing on development cooperation aligned with CARICOM's priorities.

पंतप्रधानांनी न्यूयॉर्क, अमेरिकेमधील भारतीय समुदायाला उद्देशून केलेले भाषण

September 22nd, 10:00 pm

नमस्कार अमेरिका, आता आपले नमस्ते देखील बहुराष्ट्रीय बनले आहे, स्थानिक ते जागतिक, आणि हे सर्व तुम्ही केले आहे. भारताला हृदयात ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयाने ते केले आहे.

पंतप्रधानांनी न्यूयॉर्कमधील भारतीय समुदायाला केले संबोधित

September 22nd, 09:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये लाँग आयलंड येथे, एका कार्यक्रमात भारतीय समुदायाच्या भव्य मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमाला 15,000 हून अधिक लोक उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला केलेले संबोधन

September 26th, 11:04 am

आजच्या रोजगार मेळाव्यात ज्या उमेदवारांना सरकारी सेवेची नियुक्तीपत्र मिळाली आहेत, त्या सर्वांचे खूप - खूप अभिनंदन.कठोर मेहनती नंतर आपणाला हे यश प्राप्त झाले आहे.लाखो उमेदवारांमधुन आपली निवड झाली आहे म्हणूनच या यशाचे आपल्या जीवनात मोठे महत्व आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळ्याला केले संबोधित

September 26th, 10:38 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत रोजगार मेळ्यांतर्गत नवनियुक्त उमेदवारांना सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वितरण केले आणि उमेदवारांना संबोधितही केले. देशभरातून निवडले गेलेले कर्मचारी टपाल विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये सरकारी सेवेत रुजू होणार आहेत. देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळे आयोजित करण्यात आले आहेत.

ऑस्ट्रेलियातील सिडनी इथल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 23rd, 08:54 pm

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि माझे प्रिय मित्र अँथनी अल्बनीज, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान मान्यवर स्कॉट मॉरिसन, न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर क्रिस मिन्स, परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, दूरसंवाद मंत्री मिशेल रोलेन्ड, ऊर्जा मंत्री क्रिस बोवेन, विरोधी पक्षनेते पीटर डटन, परराष्ट्र उपमंत्री टीम वॉट्स, न्यू साउथ वेल्सच्या मंत्रिमंडळाचे उपस्थित आदरणीय सदस्य, पॅरामाटाचे संसद सदस्य डॉ अँड्रू चार्लटन, येथे उपस्थित असलेले ऑस्ट्रेलियाचे सर्व संसद सदस्य, महापौर, उप महापौर, कौन्सिलर्स आणि ऑस्ट्रेलियात राहत असलेले आणि मोठ्या संख्येने उपस्थित अनिवासी भारतीय, आपणा सर्वांना माझा नमस्कार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भारतीय समुदायाबरोबर साधला संवाद

May 23rd, 01:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आज (23 मे, 2023) भारतीय समुदायाबरोबर संवाद साधला. सिडनीमधील कुडोस बँक एरिना भागात झालेल्या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 11th, 11:00 am

आज 11 मे हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात अभिमानास्पद दिवसांपैकी एक आहे. आज भारतातील शास्त्रज्ञांनी पोखरणमध्ये अशी कामगिरी केली होती, ज्यामुळे भारतमातेच्या प्रत्येक अपत्याची मान अभिमानाने उंचावली होती. अटलजींनी भारताच्या यशस्वी अणुचाचणीची घोषणा केली तो दिवस माझ्यासाठीही अविस्मरणीय आहे. पोखरण अणुचाचणीद्वारे भारताने आपली वैज्ञानिक क्षमता तर सिद्ध केलीच, पण जागतिक स्तरावर भारताला एक नवी उंचीही मिळवून दिली. अटलजींच्याच शब्दात सांगायचे तर, आम्ही आमच्या अथक प्रवासात कधी विश्रांती घेतली नाही. कोणत्याही आव्हानासमोर शरणागती पत्करली नाही. मी सर्व देशवासियांना आजच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.