'विकसित भारत'चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
December 28th, 11:30 am
2025 मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा आणि जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवल्याचे पंतप्रधान मोदी मन की बातच्या या वर्षातील शेवटच्या भागात म्हणाले. 2026 मध्ये देश नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासही सज्ज असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, क्विझ स्पर्धा, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 आणि फिट इंडिया चळवळ यासारख्या युवा-केंद्रित उपक्रमांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.मन की बात’ हे देशातील लोकांच्या सामुहिक प्रयत्नांना सामान्य जनतेसमोर आणणारं एक उत्तम व्यासपीठ : पंतप्रधान मोदी
November 30th, 11:30 am
या महिन्याच्या मन की बातमध्ये, पंतप्रधान मोदींनी संविधान दिन सोहळा, वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन, अयोध्येत धर्मध्वजारोहण, आयएनएस 'माहे'चा नौदलात समावेश आणि कुरुक्षेत्र येथे झालेला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव यासह नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांवर प्रकाश टाकला. देशात यंदा झालेले अन्नधान्याचे आणि मधाचे विक्रमी उत्पादन, भारताचे क्रीडा क्षेत्रातील यश, संग्रहालये आणि नैसर्गिक शेती अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला. पंतप्रधानांनी सर्वांना काशी-तमिळ संगमचा भाग होण्याचेही आवाहन केले.गोव्यामधील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 28th, 03:35 pm
आज या पवित्र प्रसंगी मनामध्ये खोलवर शांतता भरली आहे. साधू-संतांच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर आपोआपच आध्यात्मिक अनुभव येत असतो. इथे विशाल संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांमुळे लक्षात येते की, या मठाची शतकांपासूनच प्राचीन जीवंत शक्ती आजही वृद्धिंगत होत आहे. आज या समारंभाला मला उपस्थित राहता आले, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. इथे येण्यापूर्वी मला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले. त्या शांत वातावरणाने या कार्यक्रमाच्या आध्यात्मिकतेला आणखी सखोलता प्राप्त झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधित
November 28th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी आपले मन गहन शांतीने भरले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. संतांच्या उपस्थितीत, त्यांच्या सोबत बसणे हा स्वतःच एक आध्यात्मिक अनुभव आहे, यावर त्यांनी भर दिला. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांमुळे या मठाची शतकानुशतके जुनी जिवंत शक्ती आणखी वाढली आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, आज या समारंभात लोकांमध्ये उपस्थित राहणे हे आपले भाग्य आहे. येथे येण्यापूर्वी आपल्याला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराला भेट देण्याचा सौभाग्य लाभले, असे त्यांनी सांगितले. तेथील शांतता आणि तिथल्या वातावरणामुळे या समारंभाची आध्यात्मिकता अधिक सखोल झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.उडुपी येथील श्रीकृष्ण मठातील लक्षकंठ गीता पारायण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 28th, 11:45 am
मी माझे भाषण सुरु करण्यापूर्वी — इथे काही मुलं चित्र काढून घेऊन आली आहेत. SPG चे लोक आणि स्थानिक पोलिस थोडी मदत करतील का, ती चित्रं गोळा करण्यासाठी? जर तुम्ही त्याच्या मागे तुमचा पत्ता लिहिला असेल, तर मी नक्कीच तुम्हाला आभारपत्र पाठवेन. ज्यांनी जे काही आणले असेल, ते देऊन टाका, ते गोळा करतील आणि मग तुम्ही निवांत बसू शकता. ही मुले इतकी मेहनत करतात, आणि कधी कधी, मीच त्यांच्या बाबतीत अन्याय करतो असं वाटतं, तेव्हा मला खूप वाईट वाटतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला केले संबोधित
November 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला संबोधित केले. भगवान श्रीकृष्णाचे दिव्य दर्शनाचे समाधान, श्रीमद् भगवद्गीतेच्या मंत्रांचा आध्यात्मिक अनुभव आणि इतक्या पूज्य संत आणि गुरूंची उपस्थिती, हे आपल्यासाठी एक परम भाग्य आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हे असंख्य आशीर्वादांची प्राप्ती करण्यासारखे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 25th, 10:20 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परम पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष पूज्य महंत नृत्य गोपाल दास जी, पूज्य संत समुदाय, येथे उपस्थित सर्व भक्तगण, देश आणि जगातून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनत असलेले कोट्यवधी रामभक्त, स्त्री-पुरुषहो!पंतप्रधानांनी केले अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवाला संबोधित
November 25th, 10:13 am
या प्रसंगी एका सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज अयोध्या नगरी भारताच्या सांस्कृतिक चेतनेच्या आणखी एका शिखराचा अनुभव घेत आहे. “आज संपूर्ण भारत आणि संपूर्ण जग प्रभू श्री रामाच्या भावनेने भरलेले आहे,” असे मोदी यांनी नमूद केले, आणि प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात एक अद्वितीय समाधान, अमर्याद कृतज्ञता आणि प्रचंड अलौकिक आनंद भरलेला असल्याचे अधोरेखित केले. शतकानुशतके कायम राहिलेल्या जखमा आता बऱ्या होत आहेत, शतकानुशतकांचा वेदनादायक काळ संपत आहे आणि शतकांचे संकल्प आज पूर्ण होत आहेत, यावर त्यांनी भर दिला. ही एका यज्ञाची सांगता आहे, ज्याचा अग्नी 500 वर्षे प्रज्वलित राहिला, एक असा यज्ञ जो श्रद्धेमध्ये कधीही डगमगला नाही आणि एका क्षणाकरिताही विश्वास ढळला झाला नाही, अशी घोषणा त्यांनी केली. आज प्रभू श्री रामाच्या गाभाऱ्याची अनंत ऊर्जा आणि श्री राम परिवाराचे दिव्य वैभव या धर्म ध्वजाच्या रूपात सर्वात दिव्य आणि भव्य मंदिरात स्थापित झाले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.