पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसमधील भारतीय समुदायाला उद्देशून केलेल्या भाषणाचा अनुवाद
March 12th, 06:07 am
10 वर्षांपूर्वी याच दिवशी मी मॉरिशसला आलो होतो तेव्हा इथे येण्यापूर्वी एकच आठवडा आधी होळी साजरी केली होती. मी इथे येताना भारतातून फागुआचा उत्साह माझ्यासोबत घेऊन आलो होतो. यावेळी मी मॉरिशसमधून होळीचे रंग भारतात घेऊन जाईन. आपण एक दिवसानंतर तिथे होळी साजरी करू. 14 तारखेला चारी दिशांना रंग असतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरीशसमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
March 11th, 07:30 pm
मॉरीशसमधील त्रियानॉन कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरीशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगोलम यांच्यासह मॉरीशसमधील भारतीय समुदाय तसेच भारताचे मित्रगण यांच्या मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमात विद्यार्थी, व्यावसायिक, सामाजिक-सांस्कृतिक संघटना तसेच व्यापार क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तींसह समग्र भारतीय समुदायाने उत्साहाने भाग घेतला. मॉरीशस सरकारमधील अनेक मंत्री, संसद सदस्य तसेच इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोकूल द्वारा आयोजित मेजवानी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश
March 11th, 03:06 pm
मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात पुन्हा एकदा प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होण्याचा मला सन्मान लाभला आहे.