वाराणसीहून चार वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 08th, 08:39 am
उत्तर प्रदेशचे उर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि विकसित भारताचा मजबूत पाया रचण्यासाठी आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या उत्कृष्ट कामाचे नेतृत्व करणारे अश्विनी वैष्णव जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमात आपल्यासोबत एर्नाकुलम इथून सहभागी झालेले केरळचे राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकर जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सुरेश गोपी जी, जॉर्ज कुरियन जी, केरळमधील या कार्यक्रमात उपस्थित असलेले इतर सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधी, फिरोजपूर इथून जोडले गेलेले केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि पंजाबचे नेते रवनीत सिंग बिट्टू जी, तेथे उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, लखनौ इथून जोडले गेलेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, इतर मान्यवर आणि काशीतील माझे कुटुंबीय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीहून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा
November 08th, 08:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. देशाच्या आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि बाबा विश्वनाथांचे पवित्र शहर असलेल्या वाराणसीतील सर्व कुटुंबांना आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या. देव दिवाळीच्या काळात झालेल्या अद्वितीय उत्सवाचे त्यांनी कौतुक केले आणि आजचा दिवसदेखील एक शुभ प्रसंग असल्याचे सांगितले. विकासाच्या या उत्सवासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देव दिवाळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या
November 05th, 10:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवदिवाळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. बाबा विश्वनाथ यांची पवित्र नगरी आज देव दिवाळीच्या अलौकिक प्रकाशानं उजळून निघाली आहे. गंगा मातेच्या काठावर काशीच्या घाटांवर प्रज्वलित केलेल्या लक्ष-लक्ष दिव्यांमध्ये सर्वांच्या सुख समृद्धीची प्रार्थना आहे. हे दिव्यत्व आणि भव्यता प्रत्येकाच्या अंतःकरणाला मंत्रमुग्ध करणारी आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.Prime Minister expresses happiness over celebration of Dev Deepawali in Varanasi
November 15th, 11:13 pm
The Prime Minister Shri Narendra Modi today expressed happiness over Kashi, glittering with millions of diyas on Dev Deepawali.कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावली निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या हार्दिक शुभेच्छा
November 15th, 04:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावलीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळी निमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
November 27th, 07:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.