पंतप्रधानांनी घेतली भारत सरकारच्या सचिवांची दुसरी उच्चस्तरीय बैठक
July 28th, 08:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7,लोक कल्याण मार्ग येथील आपल्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या सचिवांसोबत दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, आणि तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालये आणि विभागांच्या भविष्यातील कार्यसूचीचा आढावा घेतला. विकसित भारत उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीला गती देण्यावर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले.रोजगार मेळावा अंतर्गत पंतप्रधान 24 जानेवारी रोजी नवनियुक्त 61,000 हून जास्त युवकांना नियुक्ती पत्रे करणार वितरित
January 23rd, 05:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या 61,000 हून अधिक तरुणांना 18 व्या रोजगार मेळ्यात नियुक्तीपत्रे वितरित करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.