Prime Minister extends his gratitude to world leaders and citizens for their warm wishes
June 10th, 11:50 pm
The Prime Minister expressed his profound gratitude to world leaders and people from all walks of life for their warm wishes and congratulatory messages. Deeply touched by the greetings, he stated that it is a privilege to serve Bharat and contribute to the nation's development journey. Emphasizing that the trust of the people is his greatest source of strength, the Prime Minister reaffirmed his full commitment to working with even greater dedication to realize the vision of a Viksit Bharat, fulfill the aspirations of 140 crore Indians, and further strengthen India's global partnerships.लोकशाही मार्गाने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरातील नेत्यांकडून अभिनंदन
June 10th, 02:08 pm
लोकशाही मार्गाने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील अनेक देशांच्या आणि सरकारांच्या प्रमुखांकडून अभिनंदनाचे संदेश प्राप्त झाले आहेत.डेन्मार्कच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल मेटे फ्रेडरिक्सन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
June 03rd, 06:45 pm
मेटे फ्रेडरिक्सन यांची डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.भारत आणि डेन्मार्क यांच्यात परस्पर विश्वास, सामायिक मूल्ये आणि शाश्वत भविष्यासाठी असलेल्या समान वचनबद्धतेवर आधारित एक मजबूत व दीर्घकालीन भागीदारी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आणि दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणासाठी हे सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या निमित्ताने दाखल झालेल्या डेन्मार्कच्या हंगामी पंतप्रधानांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
May 19th, 06:40 pm
यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला आणि सामायिक कृतीक्रमाच्या संदर्भात झालेल्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. पर्यावरण आणि हवामानबदलाच्या क्षेत्रांत सहयोगाला प्राधान्य देणाऱ्या भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीत झालेल्या प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. दोन्ही देशांमध्ये हरित व्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी संसाधनांचे एकत्रीकरण करण्यालाही यात प्राधान्य देण्यात आले आहे. 2020 मध्ये हरित धोरणात्मक भागीदारीचा प्रारंभ झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये नियमितपणे झालेल्या उच्चस्तरीय आदान-प्रदानाची उजळणी करत दोन्ही नेत्यांनी येथून पुढे नवीन आणि उगवत्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत, तसेच संदेशवहन, प्रगत संशोधन, स्टार्टअप आणि शैक्षणिक आदान-प्रदान यांच्या बाबतीत सहयोग अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला. संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांत सहकार्य करण्याबद्दलही त्यांनी चर्चा केली. गुजरातमध्ये जीआयएफटी शहरात व्यवसाय करण्यासाठी पंतप्रधानांनी डेन्मार्कच्या कंपन्यांना निमंत्रणही दिले.तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेतील संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 19th, 04:25 pm
लोकशाही, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीयतेप्रति असलेली सामायिक वचनबद्धता आपल्या दोन्ही देशांना नैसर्गिक भागीदार बनवते. तंत्रज्ञान व शाश्वतता यांमधील सामायिक प्राधान्यक्रम आपल्या संबंधांना अनेक संधी देऊन परिपूर्ण करतात. म्हणूनच, आठ वर्षांपूर्वी, नॉर्डिक देशांसोबतच्या संबंधांना अधिक ऊर्जा देण्यासाठी आणि गती देण्यासाठी आपण ही शिखर परिषद घेत आहोत.पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा ( 15 मे - 20 मे, 2026)
May 11th, 09:00 pm
पंतप्रधान मोदी 15 मे ते 20 मे 2026 या कालावधीत युएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतील आणि विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण करतील. नेदरलँड्समध्ये पंतप्रधान राजा विलेम-अलेक्झांडर यांची भेट घेतील आणि पंतप्रधान रॉब जेटन यांच्याशी चर्चा करतील. स्वीडनमध्ये ते पंतप्रधान क्रिस्टरसन यांच्याशी संवाद साधतील. नॉर्वेमध्ये ते राजा हॅराल्ड 5 वे यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर, ते इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करण्यासाठी इटलीला भेट देतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये उपस्थितांना संबोधित करणार
September 24th, 06:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:15 वाजता नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
September 16th, 07:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
April 15th, 06:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसेच जागतिक घडामोडींवर चर्चा केली.न्यूज18 रायझिंग भारत शिखर परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण
April 08th, 08:30 pm
या शिखर परिषदेद्वारे तुम्ही मला देश आणि जगभरातील आदरणीय पाहुण्यांशी तसेच तुमच्या प्रेक्षकांशी जोडण्याची संधी दिल्याबद्दल मी नेटवर्क 18 चे आभार मानतो. तुम्ही या वर्षीच्या शिखर परिषदेला भारताच्या तरुणांच्या आकांक्षांशी जोडले आहे, याचा मला आनंद आहे. या वर्षीच्या सुरुवातीला, विवेकानंद जयंतीला, विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग येथेच भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी, मला तरुणांच्या डोळ्यात स्वप्नांची चमक, त्यांच्या दृढनिश्चयाची ताकद आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची त्यांचा ध्यास दिसला. जर आपण 2047 पर्यंत भारताला कोणत्या उंचीवर नेण्याची आपली आकांक्षा आहे आणि आपण ज्या पथदर्शीचे अनुसरण करत आहोत त्याचा विचार जर आपण प्रत्येक पावलागणिक करत राहिलो तर 'अमृत' नक्कीच उदयास येईल. आणि हे 'अमृत' 'अमृत काल' च्या पिढीला ऊर्जा आणि दिशा तसेच भारताला गती प्रदान करेल. मी या शिखर परिषदेबद्दल तुमचे अभिनंदन करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज 18 रायझिंग भारत शिखर परिषदेला केले संबोधित
April 08th, 08:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे न्यूज18 रायझिंग भारत शिखर परिषदेला संबोधित केले. या परिषदेच्या माध्यमातून भारत आणि जगभरातील आदरणीय अतिथींशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी नेटवर्क18 चे आभार मानले. या वर्षीची शिखर परिषद भारताच्या युवकांच्या आकांक्षांवर केंद्रित असल्याचे त्यांनी कौतुक केले. या वर्षीच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भारत मंडपम येथे आयोजित 'विकसित भारत युवा नेता संवाद 'चे महत्त्व अधोरेखित करताना, त्यांनी भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी युवकांची स्वप्ने , दृढनिश्चय आणि आवड यांचा उल्लेख केला. त्यांनी 2047 पर्यंत भारताच्या प्रगतीच्या रुपरेषेबाबतवर भर देत सांगितले की प्रत्येक टप्प्यावर निरंतर विचारमंथन केल्याने मौल्यवान विचार अभ्यासपूर्ण माहिती मिळेल. ही माहिती अमृत काळातील पिढीला ऊर्जा देईल , मार्गदर्शन करेल आणि गतिमान करेल असे त्यांनी नमूद केले. त्यांनी शिखर परिषदेच्या यशासाठी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला
April 20th, 06:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मेटे फ्रेडरिक्सन यांचे अभिनंदन.
December 15th, 11:01 pm
डेन्मार्कच्या पंतप्रधानपद म्हणून मेटे फ्रेडरिक्सन पुन्हा निवडून आल्या आहेत. त्याबदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.नवी दिल्लीत झालेल्या पीएम किसान सन्मान संमेलन 2022 च्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 17th, 11:11 am
सर्व दिशांनी उत्सवांची लगबग, जल्लोश ऐकू येतो आहे. दिवाळी उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. आणि एक असा प्रसंग आहे, की या एकाच परिसरात, एकाच ठिकाणी, एकाच व्यासपीठावर स्टार्ट अप्स देखील आहेत आणि देशातील लाखो शेतकरीही आहेत. एका अर्थाने हा समारंभ म्हणजे, ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’ या मंत्राचं एक चालतंबोलतं जिवंत रूपच आहे.PM inaugurates PM Kisan Samman Sammelan 2022 at Indian Agricultural Research Institute, New Delhi
October 17th, 11:10 am
The Prime Minister, Shri Narendra Modi inaugurated PM Kisan Samman Sammelan 2022 at Indian Agricultural Research Institute in New Delhi today. The Prime Minister also inaugurated 600 Pradhan Mantri Kisan Samruddhi Kendras (PMKSK) under the Ministry of Chemicals & Fertilisers. Furthermore, the Prime Minister also launched Pradhan Mantri Bhartiya Jan Urvarak Pariyojana - One Nation One Fertiliser.दुसरी भारत-नॉर्डिक शिखर परिषद
May 04th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन, आईसलँडच्या पंतप्रधान कतरिन जोकोब्सदोतीर, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गेर स्टोर, स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालिना अँडरसन आणि फिनलँडच्या पंतप्रधान सॅना मरीन यांच्यासह दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले.डेन्मार्कची राणी मार्गरेट II यांनी पंतप्रधानांचे केले स्वागत
May 04th, 08:05 am
डेन्मार्कच्या राणी मार्गरेट द्वितीय यांनी आज कोपनहेगन येथील ऐतिहासिक अमालीनबोर्ग पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.कोपनहेगन येथील भारतीय समुदायांशी पंतप्रधानांचा संवाद
May 03rd, 09:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांच्यासह कोपनहेगन येथील बेल्ला केंद्र येथे भारतीय समुदायाला संबोधित करून त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थी, संशोधक,विविध व्यावसायिक आणि व्यापार क्षेत्रातील भारतीय समुदायाचे एक हजारहून अधिक सदस्य या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.भारत-डेन्मार्क बिझनेस फोरममध्ये पंतप्रधान मोदींनी घेतला सहभाग
May 03rd, 07:40 pm
कोपनहेगन येथे भारत-डेन्मार्क बिझनेस फोरममध्ये पंतप्रधान मोदींनी व्यवसाय क्षेत्रातील अग्रणींना संबोधित केले. आपल्या भाषणात, पंतप्रधान म्हणाले, आजकाल FOMO किंवा 'गमावण्याची भीती' ही संज्ञा सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. भारतातील सुधारणा आणि गुंतवणुकीच्या संधी पाहता, मी असे म्हणू शकतो की जे लोक आपल्या देशात गुंतवणूक करत नाहीत. ते नक्कीच चांगली संधी चुकवत आहेत.डेन्मार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यमांना दिलेले निवेदन
May 03rd, 07:11 pm
आपले आणि आपल्या चमूला हार्दिक धन्यवाद! आपल्या या सुंदर देशाला मी पहिल्यांदाच भेट देत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारतामध्ये आपले स्वागत करण्याची संधी मला प्राप्त झाली होती. या दोन्ही दौर्यांमुळे आपण आपले संबंध अधिक घनिष्ठ बनवून त्यांना गती देऊ शकलो. आपल्या दोन्ही देशात लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि कायद्याचे राज्य यासारखी सामायिक मुल्ये आहेत. त्याचबरोबर आपल्या दोन्ही देशांमध्ये अनेक पूरक बलस्थानेही आहेत.