पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसच्या अध्यक्षांनी सायप्रस आणि भारतातील प्रमुख उद्योजकांशी साधला संवाद
June 16th, 02:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांनी आज लिमासोल येथे झालेल्या गोलमेज परिषदेत सायप्रस आणि भारतातील आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधला. या बैठकीला बँकिंग, वित्तीय संस्था, उत्पादक, संरक्षण, दळणवळण, नौवहन, तंत्रज्ञान, नवोन्मेष, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान सेवा, पर्यटन आणि वाहतूक अशा विभिन्न क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.सायप्रस येथे भारत-सायप्रस व्यापार गोलमेज बैठकीतील पंतप्रधानांचे भाषण
June 15th, 11:10 pm
सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्षांचे आभार मानू इच्छितो कारण आज ते स्वतः विमानतळावर माझ्या स्वागतासाठी आले होते. त्यांनी व्यापार क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींसोबत इतकी भव्य गोलमेज बैठक आयोजित केली, त्याबद्दल देखील मी खूप आभारी आहे. त्यांनी माझ्याप्रती तसेच आपल्या भागीदारीप्रती जे सकारात्मक विचार व्यक्त केले त्याबद्दल देखील मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेला पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये दिलेले उत्तर
February 04th, 07:00 pm
आदरणीय राष्ट्रपति जी यांच्या संबोधनाबाबत आभार व्यक्त करण्यासाठी मी उपस्थित आहे. काल आणि आज,काल तर रात्री उशिरापर्यंत सर्व माननीय खासदारांनी आपले विचार मांडून हा आभार प्रस्ताव समृद्ध केला. अनेक माननीय अनुभवी खासदारांनीही आपले विचार व्यक्त केले आणि हे स्वाभाविक आहे, लोकशाहीची परंपराही आहे, जिथे आवश्यक होते तिथे प्रशंसा झाली, जिथे व्यथा जाणवली तिथे काही नकारात्मक गोष्टीही मांडल्या गेल्या आणि हे अतिशय स्वाभाविक आहे ! अध्यक्ष जी माझे मोठे भाग्य आहे की देशातल्या जनतेने मला या स्थानावर बसून राष्ट्रपती जी यांच्या संबोधनाबाबत आभार व्यक्त करण्याची 14 वेळा संधी दिली आणि म्हणूनच आज जनता जनार्दनाचेही अतिशय आदराने मी आभार मानतो आणि सदनातल्या चर्चेत जे-जे सदस्य सहभागी झाले,चर्चा समृद्ध केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत निवेदन
February 04th, 06:55 pm
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत निवेदन केले. काल आणि आज झालेल्या चर्चेत सहभागी झालेल्या संसद सदस्यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. लोकशाहीच्या परंपरेत जिथे आवश्यकता आहे तिथे कौतुकाची थाप आणि गरज असेल तिथे काही कानपिचक्या देणारी वक्तव्ये चर्चेत येणे साहजिक असल्याचे पंतप्रधान भाषणात म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शनाची संधी जनतेने चौदाव्यांदा देणे हा मी माझा सन्मान समजतो असे सांगून त्यांनी नागरिकांचेही आभार मानले आणि चर्चेत सहभागी झालेल्यांनी त्यांच्या विचारांनी आभारप्रस्तावाला नवी उंची गाठून दिली अशी टिप्पणी त्यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत प्रमुख सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद संपन्न
December 15th, 10:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. ही तीन दिवसीय परिषद 13 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 आणि 15 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीत होणाऱ्या मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे भूषवणार अध्यक्षस्थान
December 13th, 12:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 आणि 15 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीत आयोजित मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांमधील भागीदारी आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल असेल.जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या उदयोन्मुख राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 09th, 11:00 am
राजस्थानच्या विकास यात्रेतील आज एक महत्वाचा दिवस आहे. देश आणि जगभरातून खूप मोठ्या संख्येने प्रतिनिधी, गुंतवणूकदार या गुलाबी नगरीमध्ये आले आहेत. इथल्या उद्योग विश्वातील अनेक सहकारीही आज इथे उपस्थित आहेत. ‘उदयोन्मुख राजस्थान शिखर परिषदेमध्ये आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. इतक्या शानदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी राजस्थानच्या भाजपा सरकारला शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायझिंग राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेचे केले उद्घाटन
December 09th, 10:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये जयपूर येथे रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 या गुंतवणूकदार शिखर परिषदेचे आणि राजस्थान ग्लोबल बिझनेस एक्स्पो या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, आज राजस्थानच्या यशस्वी वाटचालीमधील आणखी एक विशेष दिवस आहे. त्यांनी जयपूर या गुलाबी शहरात सर्व उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील अग्रणी, गुंतवणूकदार, प्रतिनिधींचे रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 मध्ये स्वागत केले. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल राजस्थान सरकारचे देखील अभिनंदन केले.अमेरिकेमध्ये भारतीय समुदायाच्या सदस्यांशी पंतप्रधानांचा संवाद
June 24th, 07:30 am
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारतीय समुदायाच्या सदस्यांचे यूएसए मधील त्यांच्या संबंधित क्षेत्रातील यशाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना स्वातंत्र्याच्या अमृतकाळात भारताच्या वृद्धीसाठी योगदान देण्यास आमंत्रित केले. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आणि द्विपक्षीय भागीदारीच्या भविष्यातील क्षेत्रांवर प्रकाश टाकला.मध्य प्रदेश के इंदौर में मध्य प्रदेश ग्लोबल इन्वेस्टर्स समिट 2023 में प्रधानमंत्री के वीडियो संदेश का मूल पाठ
January 11th, 05:00 pm
मध्य प्रदेश गुंतवणूकदार शिखर परिषदेसाठी सर्व गुंतवणूकदार,उद्योजक यांचे खूप-खूप स्वागत ! विकसित भारत घडवण्यामध्ये मध्य प्रदेशाची महत्वाची भूमिका आहे. भक्ती, अध्यात्मापासून ते पर्यटन, कृषी शिक्षण आणि कौशल्य विकासापर्यंत मध्यप्रदेश आगळा,अद्भुत आणि सजगही आहे.पंतप्रधानांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे मध्य प्रदेश जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2023 ला व्हिडिओ संदेशाद्वारे केले संबोधित
January 11th, 11:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ संदेशाद्वारे मध्य प्रदेशातील इंदूर येथे जागतिक गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेला संबोधित केले. या शिखर परिषदेत मध्य प्रदेशातील गुंतवणुकीच्या विविध संधींचे दर्शन घडणार आहे.Our youth should be skilled, confident and practical, NEP is preparing the ground for this: PM Modi
July 07th, 02:46 pm
PM Modi inaugurated Akhil Bhartiya Shiksha Samagam on implementation of the National Education Policy in Varanasi. The Prime Minister said that the basic premise of the National Education Policy was to take education out of narrow thinking and connect it with the modern ideas of the 21st century.PM inaugurates Akhil Bhartiya Shiksha Samagam on implementation of NEP
July 07th, 02:45 pm
PM Modi inaugurated Akhil Bhartiya Shiksha Samagam on implementation of the National Education Policy in Varanasi. The Prime Minister said that the basic premise of the National Education Policy was to take education out of narrow thinking and connect it with the modern ideas of the 21st century.अटल (इनोव्हेशन मिशनच्या) नवोन्मेष अभियानाच्या विस्ताराला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
April 08th, 09:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्च 2023 पर्यंत अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. एआयएम देशात नवोन्मेषी संस्कृती आणि उद्योजकीय परिसंस्था निर्माण करण्याच्या आपल्या उद्दिष्टावर काम करेल. एआयएमद्वारे विविध कार्यक्रमांद्वारे हे केले जाईल.‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ या अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमध्ये पंतप्रधानांचे भाषण
March 03rd, 10:08 am
या अर्थसंकल्पात ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ बाबत जे निर्णय घेतले गेले आहेत, ते आपल्या उद्योग आणि अर्थव्यवस्था, दोन्हीसाठी फार महत्वपूर्ण आहेत. मेक इन इंडिया मोहीम आज 21व्या शतकातील भारताची गरज देखील आहे आणि यामुळे आपल्याला जगात आपले सामर्थ्य दाखविण्याची संधी देखील मिळते. एखाद्या देशातून कच्चा माल बाहेर जातो आणि त्यापासून बनविलेल्या वस्तू आयात करतो, तर त्या देशासाठी हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो.'मेक इन इंडिया फॉर वर्ल्ड' या विषयावर उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) वेबिनारमध्ये पंतप्रधानांचे मार्गदर्शन
March 03rd, 10:07 am
आज उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन (डीपीआयआयटी) विभागातर्फे आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधानांनी संबोधित केलेले हे आठवे अर्थसंकल्पोत्तर वेबिनार आहे. वेबिनारची संकल्पना 'मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड' अर्थात जगासाठी मेक इन इंडीया अशी होती.‘आझादी का अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 20th, 10:31 am
कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्लाजी, राजस्थानचे राज्यपाल श्री कलराज मिश्र जी, राजस्थानचे मुख्यमंत्री श्री अशोक गहलोत जी, गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्र भाई पटेल जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री किशन रेड्डी जी, भूपेंद्र यादव जी, अर्जुन राम मेघवाल जी, पुरषोत्तम रुपाला जी आणि श्री कैलाश चौधरी जी,राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री'आझादी के अमृतमहोत्सव से स्वर्णिम भारत की ओर' (स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताच्या दिशेने) या उपक्रमाच्या राष्ट्रीय प्रारंभ सोहळ्यात पंतप्रधानांचे बीजभाषण
January 20th, 10:30 am
'आझादी के अमृतमहोत्सव से स्वर्णिम भारत की ओर' (स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाकडून स्वर्णिम भारताच्या दिशेने) या उपक्रमाच्या राष्ट्रीय प्रारंभ सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीजभाषण केले. तसेच यावेळी ब्रह्मकुमारी समुदायाच्या सात कार्यक्रमांचाही पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राजस्थानचे राज्यपाल कालराज मिश्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी, भूपेंद्र यादव, अर्जुनराम मेघवाल, परषोत्तम रुपाला, कैलाश चौधरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 12th, 03:02 pm
पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल तमिलसाई जी, मुख्यमंत्री एन रंगासामी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नारायण राणेजी, अनुराग ठाकुरजी, निशीत प्रमाणिकजी, भानु प्रताप सिंह वर्माजी, पुदुचेरी सरकारमधील वरिष्ठ मंत्री, खासदार, आमदार, देशाच्या अन्य राज्यांमधील मंत्री आणि माझ्या युवा मित्रांनो! वणक्कम! तुम्हा सर्वाना राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा !पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
January 12th, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले.आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमा दरम्यान, पंतप्रधानांनी “माझ्या स्वप्नातील भारत ” आणि “भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे दुर्लक्षित नायक ” या विषयावरील निवडक निबंधांचे प्रकाशन केले. या दोन विषयांवर 1 लाखांहून अधिक तरुणांनी सादर केलेल्या निबंधांमधून हे निबंध निवडण्यात आले आहेत . पुदुच्चेरी येथे सुमारे 122 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह स्थापन करण्यात आलेल्या सूक्ष्म, लघु , मध्यम उद्योग मंत्रालयाच्या तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. पुदुच्चेरी सरकारने सुमारे 23 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या पेरुंथलैवर कामराजर मणिमंडपम - खुल्या रंगमंदिरासह प्रेक्षागृहाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, नारायण राणे, भानु प्रताप सिंह वर्मा आणि निसिथ प्रामाणिक, डॉ तमिलीसाई सौंदर्यराजन, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी, राज्यमंत्री आणि संसद सदस्य उपस्थित होते.