आयएनएस विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 20th, 10:30 am

आजचा हा दिवस अद्भुत आहे, आजचा हा क्षण संस्मरणीय आहे, हे दृश्य अद्भुत आहे. आज माझ्या एका बाजूला अथांग समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या वीर सैनिकांचे अथांग सामर्थ्य आहे. आज माझ्या एका बाजूला अनंत क्षितिज आहे तर दुसऱ्या बाजूला अनंत शक्तींना सामावून घेणारे हे विशाल, विराट आयएनएस विक्रांत आहे. सागराच्या पाण्यावर सूर्याच्या किरणांची ही चमक एका प्रकारे वीर जवानांनी उजळवलेले दिवाळीचे दिवे आहेत. या आमच्या अलौकिक दीपमाळा आहेत, यावेळी नौदलाच्या तुम्हा सर्व शूर सैनिकांमध्ये मी दिवाळीचे पवित्र पर्व साजरे करत आहे हे माझे भाग्य आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयएनएस विक्रांतवर साजरी केली दिवाळी

October 20th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी करताना सशस्त्र दलाच्या जवानांना संबोधित केले. आजचा दिवस म्हणजे एक उल्लेखनीय दिवस, एक उल्लेखनीय क्षण आहे आणि समोर एक उल्लेखनीय दृश्य आहे असे नमूद करून, मोदी यांनी एका बाजूला विशाल महासागर आणि दुसरीकडे भारतमातेच्या शूर सैनिकांची अफाट शक्ती असल्याचे अधोरेखित केले. एका बाजूला अनंत क्षितिज आणि अमर्याद आकाश आहे, तर दुसऱ्या बाजूला आयएनएस विक्रांतची प्रचंड शक्ती आहे, जी अनंत शक्तीचे मूर्त रूप आहे, असे त्यांनी नमूद केले. समुद्रावरील सूर्यप्रकाशाची चमक दीपावलीच्या वेळी शूर सैनिकांनी लावलेल्या दिव्यांशी मिळती जुळती आहे, त्यामुळे दिव्यांची दिव्य माला तयार होते असं ते म्हणाले. भारतीय नौदलाच्या शूर जवानांमध्ये ही दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणे हा आपला बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले.

राजस्थानातील पोखरण येथे ‘एक्सरसाइज भारत शक्ती’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 12th, 02:15 pm

राजस्थानचे मुख्यमंत्री श्रीमान भजनलाल जी शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजनाथ सिंह जी, गजेंद्र शेखावत जी, कैलाश चौधरी जी, पीएसए प्राध्यापक अजय सूद जी, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, वरिष्ठ अधिकारीवर्ग, तिन्ही सेनेतील सर्व शूर वीर.... आणि इथे उपस्थित असलेले पोखरणच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो !

राजस्थानातील पोखरण येथे 'भारत शक्ती "या तिन्ही सैन्यदलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेचांच्या सराव कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी

March 12th, 01:45 pm

इथे आज दिसलेले शौर्य आणि कौशल्य हे नव्या भारताची हाक आहे. “आज पुन्हा एकदा पोखरण भारताच्या आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि त्याच्या वैभवाच्या त्रिवेणीचे साक्षीदार बनले आहे”, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे तेच पोखरण आहे ज्याने भारताची अणुचाचणी पाहिली आणि आज आपण स्वदेशीकरणाच्या सामर्थ्याचे साक्षीदार झालो आहोत असे ते पुढे म्हणाले.