Text of PM’s remarks during delegation-level talks with PM Abiy Ahmed Ali of Ethiopia
December 17th, 09:12 am
Prime Minister Narendra Modi’s remarks during delegation-level talks with PM Abiy Ahmed Ali of Ethiopia.Joint Statement on the visit of PM Modi to the Hashemite Kingdom of Jordan
December 16th, 03:56 pm
At the invitation of HM King Abdullah II, PM Modi visited Jordan on December 15-16, 2025. Both the leaders positively assessed the multi-faceted India-Jordan relations that span across various areas of cooperation including political, economic, defence, security, culture and education among others. They also appreciated the excellent cooperation between the two sides at the bilateral level and in multilateral forums.Visit of Prime Minister Narendra Modi to Jordan, Ethiopia, and Oman
December 11th, 08:43 pm
PM Modi will visit Jordan, Ethiopia and Oman from December 15 – 18, 2025. In Jordan, the PM will meet His Majesty King Abdullah II bin Al Hussein to review the India-Jordan relations. In Ethiopia, the PM will hold discussions with Ethiopian PM Abiy Ahmed Ali on all aspects of India – Ethiopia bilateral ties. During the PM's visit to Oman, both sides will comprehensively review the bilateral partnership and exchange views on various issues.हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 06th, 08:14 pm
येथे हिंदुस्तान टाइम्स शिखर परिषदेत देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आयोजकांचे आणि ज्यांनी आपले विचार मांडले त्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. थोड्याच वेळापूर्वी शोभना जींनी दोन मुद्दे मांडले, जे मी विशेष लक्षात घेतले आहेत. एक म्हणजे त्यांनी सांगितले की मागच्या वेळी मोदीजी आले होते, तेव्हा त्यांनी एक सूचना दिली होती. या देशात माध्यम संस्थांनी काय काम करावे, हे सांगण्याचे धैर्य कोणीही करू शकत नाही. पण मी ते केले होते, आणि मला आनंद आहे की शोभनाजी आणि त्यांच्या टीमने ते काम मोठ्या आवडीने केले. आणि देशाला – मी आत्ताच प्रदर्शन पाहून आलो – मी सर्वांना विनंती करतो की प्रदर्शन नक्की पाहा. या छायाचित्रकार सहकाऱ्यांनी त्या क्षणांना असे टिपले आहे की ते क्षण अमर झाले आहेत. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आणि तीही मी ज्या शब्दांत समजलो, त्यांनी म्हटले की तुम्ही पुढेही… त्या असेही म्हणू शकल्या असत्या की तुम्ही पुढेही देशाची सेवा करत राहा, पण हिंदुस्तान टाइम्सने असे म्हटले की तुम्ही पुढेही अशीच सेवा करत राहा, यासाठी मी विशेष आभार व्यक्त करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला केले संबोधित
December 06th, 08:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला संबोधित केले. त्यांनी संमेलनात उपस्थित असलेल्या देशातील आणि परदेशातील अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीची दखलपूर्ण नोंद घेतली. त्यांनी आयोजकांना तसेच या परिषदेत आपले विचार मांडलेल्या सर्वांना अभिनंदनपर शुभेच्छाही दिल्या. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दोन मुद्द्यांची आपण काळजीपूर्वक नोंद घेतली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. त्यांनी आपल्या मागील भेटीचा संदर्भ दिला, त्यावेळी आपण त्यांना माध्यम समुहांतर्फे क्वचितच हाती घेतल्या जाणार्या गोष्टीबद्दल सुचवले होते याची आठवण त्यांनी करून दिली, आणि या समुहाने ते केले, असेही त्यांनी नमूद केले. शोभना आणि त्यांच्या चमूने उत्साहाने आपली सूचना पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जेव्हा आपण प्रदर्शनाला भेट दिली, तेव्हा छायाचित्रकारांनी क्षण अशा पद्धतीने टिपले की ते अमर झाल्यासारखे वाटले असे ते म्हणाले. आपण ते प्रदर्शन पाहिले असून, सर्वांनी ते पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दुसर्या मुद्याच्या संदर्भानेही त्यांनी भाष्य केले. त्यांचे म्हणणे म्हणजे केवळ आपण देशाची सेवा करत राहावी अशी इच्छा नाही, तर हिंदुस्तान टाईम्सनेच आपण त्याच पद्धतीने सेवा करत राहावे, असे म्हटले आहे, असे म्हणत याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञताही व्यक्त केली.India and Russia are embarking on a new journey of co-innovation, co-production, & co-creation: PM Modi says during the India–Russia Business Forum
December 05th, 03:45 pm
In his address at the India–Russia Business Forum, PM Modi conveyed deep gratitude to his friend President Putin for joining the forum. He noted that discussions have commenced on a Free Trade Agreement between India and the Eurasian Economic Union. He remarked that meaningful discussions have taken place over the past two days and expressed his happiness that all areas of India–Russia cooperation were represented.रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत झालेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 05th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष माननीय व्लादिमीर पुतिन यांच्यासमवेत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या बैठकीला संबोधित केले. पंतप्रधानांनी माननीय राष्ट्राध्यक्ष पुतीन, भारत आणि परदेशातील नेते आणि सर्व मान्यवर पाहुण्यांना अभिवादन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन आपल्यासोबत मोठे शिष्टमंडळ घेऊन आले असल्याने भारत-रशिया व्यवसाय मंच हा त्यांच्या महत्त्वपूर्ण पुढाकाराचे द्योतक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी बैठकीत सहभागी होत असलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत त्यांच्यामध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी आपले मित्र राष्ट्रपती पुतीन यांचे या मंचाच्या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि त्यांचे मोलाचे विचार मांडल्याबद्दल मनापासून आभार मानले. व्यवसायासाठी सुलभ आणि खात्रीलायक अशी यंत्रणा तयार केली जात असल्याचे स्पष्ट करत त्यांनी भारत आणि युरेशियन आर्थिक संघ यांच्यात मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू झाल्याचे नमूद केले.‘सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ (आरईपीएम) च्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
November 26th, 04:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 'सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेटस् (आरईपीएम म्हणजेच - निओडिमियम, लोखंड आणि बोरोन यांच्या धातुमिश्रणापासून बनवले जाणारे सर्वात मजबूत प्रकारचे स्थायी चुंबक) उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमाचे उद्दिष्ट भारतात प्रतिवर्षी 6,000 मेट्रिक टन (एमटीपीए) एकात्मिक रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट (आरईपीएम) उत्पादन क्षमता निर्माण करणे हे आहे. यामुळे भारताची आत्मनिर्भरता वाढवून जागतिक आरईपीएम बाजारपेठेत देशाला एक महत्त्वपूर्ण स्थान मिळेल.अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 25th, 10:20 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परम पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष पूज्य महंत नृत्य गोपाल दास जी, पूज्य संत समुदाय, येथे उपस्थित सर्व भक्तगण, देश आणि जगातून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनत असलेले कोट्यवधी रामभक्त, स्त्री-पुरुषहो!पंतप्रधानांनी केले अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवाला संबोधित
November 25th, 10:13 am
या प्रसंगी एका सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज अयोध्या नगरी भारताच्या सांस्कृतिक चेतनेच्या आणखी एका शिखराचा अनुभव घेत आहे. “आज संपूर्ण भारत आणि संपूर्ण जग प्रभू श्री रामाच्या भावनेने भरलेले आहे,” असे मोदी यांनी नमूद केले, आणि प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात एक अद्वितीय समाधान, अमर्याद कृतज्ञता आणि प्रचंड अलौकिक आनंद भरलेला असल्याचे अधोरेखित केले. शतकानुशतके कायम राहिलेल्या जखमा आता बऱ्या होत आहेत, शतकानुशतकांचा वेदनादायक काळ संपत आहे आणि शतकांचे संकल्प आज पूर्ण होत आहेत, यावर त्यांनी भर दिला. ही एका यज्ञाची सांगता आहे, ज्याचा अग्नी 500 वर्षे प्रज्वलित राहिला, एक असा यज्ञ जो श्रद्धेमध्ये कधीही डगमगला नाही आणि एका क्षणाकरिताही विश्वास ढळला झाला नाही, अशी घोषणा त्यांनी केली. आज प्रभू श्री रामाच्या गाभाऱ्याची अनंत ऊर्जा आणि श्री राम परिवाराचे दिव्य वैभव या धर्म ध्वजाच्या रूपात सर्वात दिव्य आणि भव्य मंदिरात स्थापित झाले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.जोहान्सबर्ग येथील जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली जपानच्या पंतप्रधानांची भेट
November 23rd, 09:46 pm
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान साने ताकाची यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. 29 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान ताकाची यांच्यासोबत झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर झालेली पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती.जी 20 शिखर परिषद 2025 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 23rd, 09:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर इटालियन प्रजासत्ताकच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. याआधी जून मध्ये कॅनडा मध्ये काननास्किस येथे झालेल्या जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी संवाद साधला होता.जोहनिबर्ग येथे जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट
November 23rd, 09:41 pm
दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथे सुरु असलेल्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि कॅनडामधील भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला.जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट
November 21st, 10:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांची आज दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. 2020 मध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत संबंध वाढल्यानंतर गेल्या पाच वर्षांत भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सहकार्य वाढत असल्याबद्दल तसेच सहकार्यात येणाऱ्या विविधतेबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. भारतातील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी भारतासोबत एकजुटता व्यक्त केली. दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईला बळकटी देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी वचनबद्धता व्यक्त केली.पंतप्रधानांच्या हस्ते 8 नोव्हेंबर रोजी “कायदेविषयक मदत वितरण प्रणालींचे मजबुतीकरण” या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेचे होणार उद्घाटन
November 06th, 02:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता सर्वोच्च न्यायालय येथे आयोजित “कायदेशीर मदत वितरण प्रणालींचे मजबुतीकरण” या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने (एनएएलएसए) तयार केलेल्या कम्युनिटी मेडीएशन ट्रेनिंग मोड्यूलच्या कार्याची सुरुवात करतील. याप्रसंगी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधान सानई ताकाईची यांच्याशी सौहार्दपूर्ण संवाद साधला
October 29th, 01:14 pm
पंतप्रधान सानई ताकाईची यांनी पदभार ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.आयएनएस विक्रांतवर साजऱ्या केलेल्या दिवाळी क्षणांची झलक पंतप्रधानांकडून सामाईक
October 21st, 09:30 am
भारतीय नौदलासमवेत आयएनएस विक्रांतवर साजऱ्या केलेल्या दिवाळी क्षणांची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केली. मोदींनी, एका बाजूला विशाल महासागर आणि दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या शूर सैनिकांची अफाट ताकद असल्याचे अधोरेखित करत हा दिवस, एक उल्लेखनीय दिवस, एक उल्लेखनीय क्षण आणि उल्लेखनीय दृश्य असल्याचे नमूद केले. एका बाजूला अनंत क्षितिज आणि अमर्याद आकाश आहे तर दुसऱ्या बाजूला अनंत शक्तीचे प्रतीक असलेली आयएनएस विक्रांतची प्रचंड ताकद असल्याचं त्यांनी नमूद केले. समुद्रावरील सूर्यप्रकाशाचे किरण दीपावलीच्या वेळी शूर सैनिकांनी प्रज्वलित केलेल्या दिव्यांशी मेळ राखत आहेत, जणू दिव्यांची दिव्य माळच तयार होते आहे, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. भारतीय नौदलातील शूर जवानांसमवेत दिवाळी साजरी करणे हा त्यांना मिळालेला मान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.आयएनएस विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 20th, 10:30 am
आजचा हा दिवस अद्भुत आहे, आजचा हा क्षण संस्मरणीय आहे, हे दृश्य अद्भुत आहे. आज माझ्या एका बाजूला अथांग समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या वीर सैनिकांचे अथांग सामर्थ्य आहे. आज माझ्या एका बाजूला अनंत क्षितिज आहे तर दुसऱ्या बाजूला अनंत शक्तींना सामावून घेणारे हे विशाल, विराट आयएनएस विक्रांत आहे. सागराच्या पाण्यावर सूर्याच्या किरणांची ही चमक एका प्रकारे वीर जवानांनी उजळवलेले दिवाळीचे दिवे आहेत. या आमच्या अलौकिक दीपमाळा आहेत, यावेळी नौदलाच्या तुम्हा सर्व शूर सैनिकांमध्ये मी दिवाळीचे पवित्र पर्व साजरे करत आहे हे माझे भाग्य आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयएनएस विक्रांतवर साजरी केली दिवाळी
October 20th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी करताना सशस्त्र दलाच्या जवानांना संबोधित केले. आजचा दिवस म्हणजे एक उल्लेखनीय दिवस, एक उल्लेखनीय क्षण आहे आणि समोर एक उल्लेखनीय दृश्य आहे असे नमूद करून, मोदी यांनी एका बाजूला विशाल महासागर आणि दुसरीकडे भारतमातेच्या शूर सैनिकांची अफाट शक्ती असल्याचे अधोरेखित केले. एका बाजूला अनंत क्षितिज आणि अमर्याद आकाश आहे, तर दुसऱ्या बाजूला आयएनएस विक्रांतची प्रचंड शक्ती आहे, जी अनंत शक्तीचे मूर्त रूप आहे, असे त्यांनी नमूद केले. समुद्रावरील सूर्यप्रकाशाची चमक दीपावलीच्या वेळी शूर सैनिकांनी लावलेल्या दिव्यांशी मिळती जुळती आहे, त्यामुळे दिव्यांची दिव्य माला तयार होते असं ते म्हणाले. भारतीय नौदलाच्या शूर जवानांमध्ये ही दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणे हा आपला बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले.इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
October 17th, 04:22 pm
इजिप्तचे परराष्ट्र मंत्री डॉ. बदर अब्देलअती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी गाझा शांतता करारात इजिप्तच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल राष्ट्रपती अब्दुल फत्तेह अल सिसी यांचे अभिनंदन केले. हा करार प्रदेशात कायमची शांतता प्रस्थापित करण्यास मदत करेल,अशी आशा व्यक्त केली. परराष्ट्रमंत्री अब्देलअती यांनी पंतप्रधानांना त्यांच्या भारत भेटीदरम्यान आयोजित होणाऱ्या पहिल्या भारत–इजिप्त धोरणात्मक संवादाची माहिती दिली.