सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीतील पंतप्रधानांचे भाषण

June 28th, 05:00 pm

पंतप्रधान म्हणून मी हिंदी महासागर क्षेत्रातील ज्या देशाला 2015 मध्ये सर्वप्रथम भेट दिली होती, तो देश म्हणजे 'सेशेल्स' होता. माझी ती पहिली आफ्रिका भेटही होती. मी इथे आलो कारण माझा हा दृढ विश्वास होता की, हिंदी महासागराबाबतच्या भारताच्या दृष्टिकोनात सेशेल्सला एक अतिशय विशेष स्थान आहे. आज, एका दशकानंतर जेव्हा मी इथे पुन्हा आलो आहे, तेव्हा माझा हा विश्वास पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाला आहे.

युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दीपावलीचा समावेश झाल्याचे पंतप्रधानांकडून स्वागत

December 10th, 12:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दीपावलीचा समावेश झाल्याबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला.