The development of Chandigarh has always been the absolute priority of our government: PM Modi

July 17th, 02:08 pm

Launching multiple development projects in Chandigarh, PM Modi asserted that the development of Chandigarh has always been an absolute priority of the current government. He detailed the massive structural changes implemented in the region over the past decade. Congratulating the residents on the inauguration of healthcare, education and infrastructure projects, he also praised the city for striving to improve its cleanliness rankings.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंदीगडमध्ये आरोग्यसेवा, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

July 17th, 01:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगडमध्ये आरोग्य, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. सुनियोजित राष्ट्रीय विकासाचे एक आदर्श उदाहरण अशी या शहराची ओळख असून येथील उत्तम जीवनशैली आणि सुलभ जीवनमानासाठी देखील ते ओळखले जाते यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रावर 'माँ चंडी'ची दैवी कृपा असल्याचे सांगत, त्यांनी या शहराच्या निरंतर आणि सुनियोजित विकासाप्रति प्रशासनाची असलेली दृढ कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. चंदीगडच्या विकासाला विद्यमान सरकारचे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे, असे मोदी म्हणाले.

India-France partnership is emerging as a strong pillar of trust, stability and cooperation: PM Modi in Paris

June 18th, 11:41 pm

Addressing the Indian community in Paris, PM Modi highlighted India’s transformative growth over the past 12 years across infrastructure, digital technology, manufacturing, defence, space, innovation, healthcare and social development. He underscored the growing strength of the India-France Strategic Partnership, praised the Indian diaspora for serving as a vital bridge between the two nations and highlighted yoga and football as bonds connecting India and France.

पॅरीसमधील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन

June 18th, 09:30 pm

पंतप्रधानांनी 18 June 2026 रोजी पॅरीस इथे जमलेल्या भारतीय समुदायाला संबोधित केले. पंतप्रधानांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच उत्साहाने आणि रंगतदार स्वागत करण्यात आले. हे स्वागत मातृभूमीप्रती भारतीय समुदायाच्या मनातील आत्मीयतेचे प्रतिबिंब होते.

नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वाययुजीएम (युग्म) बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 29th, 11:01 am

आज येथे सरकार, शिक्षण क्षेत्र, विज्ञान आणि संशोधनाशी संबंधित विविध क्षेत्रातील मंडळी खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ही एकजूट, हे ऐक्य, यालाच युग्म असे म्हणतात. हे एक असे युग्म आहे ज्यामध्ये विकसित भारताच्या भविष्यकालीन तंत्रज्ञानाशी संबंधित भागधारक एकत्र आले आहेत, एकजूट झाले आहेत. भारताची नवोन्मेष क्षमता आणि गहन-तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भारताचे स्थान बळकट करण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत त्यांना या कार्यक्रमाच्या आयोजनाद्वारे आणखी बळकटी मिळेल असा विश्वास मला वाटतो. आज आयआयटी कानपूर आणि आयआयटी मुंबई या संस्थांमध्ये कृत्रिम प्रज्ञा , गुप्तहेर यंत्रणा आणि जैवविज्ञान, जैव तंत्रज्ञान तसेच आरोग्य आणि वैद्यकीय सेवा यांच्याशी संबंधित सुपर हब्सची सुरुवात होत आहे. आज वाधवानी नवोन्मेष नेटवर्कची देखील सुरुवात झाली आहे. अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेसोबत मिळून संशोधनाला चालना देण्याचा देखील निर्धार करण्यात आला आहे. या प्रयत्नासाठी वाधवानी प्रतिष्‍ठानचे, आमच्या आयआयटी संस्थांचे, आणि इतर सर्व भागधारकांचे मी अभिनंदन करतो. तुमची समर्पणवृत्ती आणि सक्रियतेमुळे खासगी आणि सरकारी क्षेत्राने एकत्र येऊन देशाच्या शिक्षण प्रणालीमध्ये अनेक सकारात्मक बदल केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘युग्म’ नवोन्मेष परिषदेला केले संबोधित

April 29th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित युग्म नवोन्मेष परिषदेला संबोधित केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी सरकारी अधिकारी, शैक्षणिक संस्था आणि विज्ञान आणि संशोधन व्यावसायिकांच्या महत्त्वपूर्ण मेळाव्यावर प्रकाश टाकला आणि युग्म - विकसित भारतासाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या उद्देशाने एक सहकार्य - म्हणून हितधारकांच्या मिलाफावर भर दिला. या कार्यक्रमाद्वारे भारताची नाविन्यपूर्ण क्षमता आणि सखोल तंत्रज्ञानातील त्याची भूमिका वाढविण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आयआयटी कानपूर आणि आयआयटी मुंबई येथे कृत्रिम प्रज्ञा , सक्षम प्रणाली आणि जैवविज्ञान, जैवतंत्रज्ञान, आरोग्य आणि औषध यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सुपर हबच्या उदघाटनाचा त्यांनी उल्लेख केला. राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या सहयोगातून संशोधनाला चालना देण्याच्या बांधिलकीला दुजोरा देणाऱ्या वाधवानी नवोन्मेष नेटवर्कच्या उदघाटनाचाही त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी वाधवानी प्रतिष्‍ठान, आयआयटी आणि या उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सर्व हितधारकांचे अभिनंदन केले. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमधील सहयोगाद्वारे देशाच्या शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आणि सक्रिय भूमिकेबद्दल त्यांनी रोमेश वाधवानी यांचे विशेष कौतुक केले.

पंतप्रधान 29 एप्रिल रोजी वाययुजीएम परिषदेत होणार सहभागी

April 28th, 07:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे वाययुजीएम, युग्म परिषदेत सहभागी होणार आहेत. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.